

जगभर दरवर्षी सुमारे 20 लाख लोक यकृत विकारांमुळे मृत्युमुखी पडतात, जे एकूण मृत्यूंपैकी सुमारे 4% आहेत. यकृत हे शरीरातील सर्वात महत्त्वाचे अवयव असून ते 500 हून अधिक कार्ये पार पाडते – जसे की पचन, विषारी पदार्थांचे विघटन, रक्त शुद्धीकरण, खनिज संचय आणि पित्त तयार करणे.
कॉफीमध्ये क्लोरोजेनिक अॅसिडसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात जे यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. नियमित 2 कप कॉफी प्याल्यास यकृत फायब्रॉसिस, नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) आणि लिव्हर कॅन्सरचा धोका कमी होतो. डिकॅफिनेटेड कॉफी देखील तितकीच उपयुक्त आहे. मात्र, कॉफी साखर व क्रीमशिवाय पिणे अधिक फायदेशीर ठरते.
ग्रीन टीमध्ये ईजीसीजी (EGCG) सारखे कैटेचिन्स आढळतात जे लिपिड मेटाबॉलिझम सुधारतात आणि यकृतातील चरबी साचण्यास प्रतिबंध करतात. याशिवाय, त्यातील पॉलीफेनोलिक अँटीऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करून यकृताचे संरक्षण करतात. दिवसाला 1-2 कप ग्रीन टी पिणे लाभदायक आहे.
बीटरूट ज्यूसमध्ये नायट्रेट्स व बीटालाइन्ससारखे अँटीऑक्सिडंट्स असतात जे यकृतातील सूज आणि विषारी घटक दूर करण्यास मदत करतात. आठवड्यातून 1-2 वेळा बीटरूट शॉट्स पिणे उपयुक्त असते. 2019 च्या अभ्यासानुसार यकृताच्या सूजेला बीटरूट ज्यूसने आराम मिळतो.
2021 च्या अभ्यासानुसार ओलोंग टी आणि डार्क टी यकृतातील चरबी व सूज कमी करण्यात मदत करतात. तसेच, चहा पचन सुधारण्यात आणि गट मायक्रोबायोटा संतुलित ठेवण्यात उपयुक्त आहे. दिवसाला 2-3 कप साखरविरहित चहा पिणे यकृतासाठी फायदेशीर ठरते.