Maharashtra Covid 19 Cases | JN.1 व्हेरिएंटची लागण झपाट्याने, महाराष्ट्रात ८६ नवे कोरोना रुग्ण, सक्रिय रुग्णसंख्या ३८३ वर

Maharashtra Covid 19 Cases | देशात कोरोना व्हेरिएंट्स LF.7, XFG, JN.1 आणि NB.1.8.1 आढळले
Maharashtra Covid 19 Cases
Maharashtra Covid 19 CasesCanva
Published on
Updated on

Maharashtra Covid 19 Cases

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. बुधवारी एकाच दिवशी 86 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, त्यामुळे राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या 383 वर पोहोचली आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधिक 36 रुग्ण सापडले, तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 24, पुणे महापालिकेत 9 रुग्ण सापडले. सुदैवाने बुधवारी कोणताही मृत्यू नोंदवण्यात आलेला नाही.

Maharashtra Covid 19 Cases
Mumbai Gangster News | गँगस्टर रवी पुजारीची हत्या प्रकरणात निर्दोष मुक्तता

सध्या राज्यात ILI (Influenza like Illness) आणि SARI (Severe Acute Respiratory Infection) अंतर्गत सर्वेक्षणाद्वारे कोविड चाचण्या केल्या जात आहेत. या चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार सुरू केले जातात. सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत असल्यामुळे आरोग्य विभागाने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.

2025 सालाच्या जानेवारीपासून आतापर्यंत राज्यात 8,868 चाचण्या करण्यात आल्या असून, त्यापैकी 521 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत 132 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Maharashtra Covid 19 Cases
Mumbai Mango News | मे महिन्याच्या पावसात एपीएमसीतील हापूस व्यापार्‍यांचे 125 कोटींचे नुकसान

सहव्याधींमुळे 6 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये नेफ्रोटिक सिंड्रोम, कर्करोग, ब्रेन स्ट्रोक, डायबेटिक किटोअॅसीडोसीस, इंटरस्टिशियल लंग डिजीज यांसारख्या गंभीर आजारांनी बाधित रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, देशभरात कोरोनाचे चार नवे व्हेरिएंट LF.7, XFG, JN.1 आणि NB.1.8.1 सापडले असून याचा अभ्यास आयसीएमआरमार्फत सुरू आहे. त्यामधील JN.1 हा ओमिक्रॉनच्या BA.2.86 व्हेरिएंटचा स्ट्रेन असून, तो अधिक वेगाने पसरत असला तरी गंभीर आजार घडवत नाही. जागतिक आरोग्य संघटनेने डिसेंबर 2023 मध्ये याला ‘इंटरेस्ट व्हेरिएंट’ म्हणून घोषित केलं आहे.

Covid 19 JN.1 Variant : काय आहे JN.1 व्हेरिएंट?

  • JN.1 व्हेरिएंट हा ओमिक्रॉनच्या BA.2.86 या प्रकाराचा उपप्रकार (sub-variant) आहे.

  • याला "पिरोला" (Pirola) असेही म्हटले जाते.

  • ऑगस्ट 2023 मध्ये JN.1 पहिल्यांदा आढळला, तर डिसेंबर 2023 मध्ये WHO ने तो "Variant of Interest" घोषित केला.

  • या व्हेरिएंटमध्ये 30 पेक्षा अधिक म्युटेशन्स असून, त्यामुळे तो सहजपणे पसरतो.

  • लक्षणे बहुतेक सौम्यच असतात – सर्दी, ताप, खोकला, थकवा आदी.

  • गंभीर लक्षणे आणि हॉस्पिटलायझेशन फार कमी प्रमाणात आढळते.

  • जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ याने याला फारसा धोकादायक मानलेले नाही.

  • सावधगिरी आवश्यक – मास्क, स्वच्छता आणि बूस्टर डोस घ्या.

  • ICMR भारतात याचा अभ्यास करत आहे.

  • लक्षणे दिसल्यास त्वरित कोविड चाचणी करून उपचार घ्या.

Maharashtra Covid 19 Cases
थायरॉईड समस्या आणि दिनचर्या

भारतात आढळलेले चार नवे कोविड व्हेरिएंट्स

  1. JN.1: ओमिक्रॉन BA.2.86 चा उपप्रकार. या व्हेरिएंटमध्ये सुमारे 30 म्युटेशन्स असून, त्यामुळे तो अधिक वेगाने पसरतो. लक्षणे सौम्य असून, काही रुग्णांमध्ये सतत सौम्य ताप आणि पचनाशी संबंधित त्रास दिसून आला आहे.

  2. LF.7: भारतामध्ये गुजरातमध्ये चार प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ही उपप्रकार ओमिक्रॉनशी संबंधित असून, लक्षणे सौम्य आहेत.

  3. NB.1.8.1: तमिळनाडूमध्ये एप्रिलमध्ये एक प्रकरण आढळले आहे. ही उपप्रकार देखील ओमिक्रॉनशी संबंधित असून, लक्षणे सौम्य आहेत.

  4. XFG: ही उपप्रकार देखील ओमिक्रॉनशी संबंधित असून, सध्या भारतात आढळलेली आहे. लक्षणे सौम्य आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news