OnePlus च्या ‘या’ मोबाईलवर १२ हजारांची बंपर सवलत; १६ GB रॅम-५१२ GB स्टोअरेजसह खरेदीची सुवर्णसंधी

OnePlus च्या ‘या’ मोबाईलवर १२ हजारांची बंपर सवलत; १६ GB रॅम-५१२ GB स्टोअरेजसह खरेदीची सुवर्णसंधी

OnePlus smartphone price cut : कंपनीकडून 'लाईफटाईम डिस्प्ले वॉरंटी'
Published on

नवी दिल्ली : प्रिमियम स्मार्टफोन प्रेमींसाठी वनप्लसने आनंदाची बातमी आणली आहे. दमदार फीचर्स आणि स्टायलिश लूकसाठी ओळखल्या जाणाऱ्या OnePlus 13 वर सध्या जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. विशेषतः या फोनच्या १६ GB रॅम आणि ५१२ GB स्टोअरेज व्हेरिएंटवर ग्राहकांना मोठी बचत करण्याची संधी आहे. या ऑफरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या फोनवर कंपनी 'लाईफटाईम डिस्प्ले वॉरंटी' देखील प्रदान करत आहे.

किंमतीत मोठी कपात

OnePlus 13 च्या खरेदीवर तुम्ही ॲमेझॉनच्या माध्यमातून थेट १२,००० रुपयांची बचत करू शकता. या स्मार्टफोनची मूळ लाँच किंमत ७९,९९९ रुपये होती, मात्र सध्या हा फोन अवघ्या ६७,९९९ रुपयांत उपलब्ध आहे. उच्च क्षमतेचा स्मार्टफोन शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक 'अल्टिमेट' डील ठरू शकते.

OnePlus च्या ‘या’ मोबाईलवर १२ हजारांची बंपर सवलत; १६ GB रॅम-५१२ GB स्टोअरेजसह खरेदीची सुवर्णसंधी
Indian economy strength | बाजार दोलायमान; पण भारत मजबूत!

‘असे’ आहेत धमाकेदार फीचर्स

  • डिस्प्ले : या फोनमध्ये ६.८२ इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो १२० Hz रिफ्रेश रेट आणि ProXDR सारख्या प्रगत तंत्रज्ञानाला सपोर्ट करतो.

  • प्रोसेसर : हा फोन अत्याधुनिक 'Qualcomm Snapdragon 8 Elite' या शक्तिशाली प्रोसेसरवर चालतो, ज्यामुळे गेमिंग आणि मल्टीटास्किंगचा अनुभव अधिक वेगवान होतो.

  • सुरक्षा : फोनला IP68 आणि IP69 रेटिंग मिळाले आहे, ज्यामुळे हा डिव्हाइस पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहतो.

  • बॅटरी आणि चार्जिंग : यात ६००० mAh ची अजस्त्र बॅटरी देण्यात आली असून, १०० W वायर्ड आणि ५० W वायरलेस फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.

OnePlus च्या ‘या’ मोबाईलवर १२ हजारांची बंपर सवलत; १६ GB रॅम-५१२ GB स्टोअरेजसह खरेदीची सुवर्णसंधी
Accident Alert Cyber ​​Scam | अपघाताचा फोन आणि खातं रिकामं

प्रोफेशनल कॅमेरा सेटअप

फोटोग्राफीची आवड असलेल्या युजर्ससाठी या फोनच्या मागील बाजूस ५० MP + ५० MP + ५० MP असा ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात ५० MP चा मुख्य अल्ट्रा-वाईड, ५० MP टेलीफोटो आणि ५० MP वाईड अँगल लेन्सचा समावेश आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ३२ MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित OxygenOS 15 वर काम करतो, जो युजर्सला अत्यंत स्मूथ इंटरफेस प्रदान करतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news