Amazon Layoffs 2025 | आता ई-कॉमर्समध्येही AI ची एंट्री! अमेझॉनची मोठी घोषणा; AI मुळे HR विभागातील 15 टक्के कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात!

Amazon Layoffs 2025 | जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अमेझॉनने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांची मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
amazon
amazonAI Image
Published on
Updated on

Amazon Layoffs 2025

जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अमेझॉनने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांची मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. उपलब्ध माहितीनुसार, कंपनीच्या एचआर विभागातील जवळपास 15 टक्के कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता आहे. या मोठ्या बदलामागे सर्वात मोठे कारण आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI चा वाढता वापर.

amazon
PM Kisan 21st Installment | पीएम किसान योजनेतील मोठा बदल; पीएम किसानचा 21वा हप्ता थेट खात्यात! तुम्हाला नाही मिळाला? तर मग ही बातमी तुमच्यासाठी

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जैसी यांनी या बदलाचे संकेत दिले आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, “AI हे भविष्यातील ओळख असेल. जे कर्मचारी या बदलासोबत स्वतःला जुळवून घेणार नाहीत, त्यांना कंपनीत आपली जागा टिकवणे कठीण जाईल.” जैसी यांच्या या इशाऱ्यावरून अमेझॉन आता पूर्णपणे AI आणि ऑटोमेशन वर आपला जोर देत असल्याचे स्पष्ट होते.

AI आणि ऑटोमेशनकडे अमेझॉनचा कल

अमेझॉनचे सध्याचे उद्दिष्ट आहे की, कंपनीची संपूर्ण कार्यपद्धती अधिक कार्यक्षम आणि स्वयंचलित व्हावी. यामुळे एका बाजूला कंपनीच्या खर्चात मोठी कपात होईल, तर दुसरीकडे निर्णय प्रक्रियेत आणि कामात वेग वाढवता येईल. याचा थेट परिणाम HR विभागातील पारंपरिक कामांवर झाला आहे.

भरती प्रक्रिया, कर्मचारी व्यवस्थापन आणि कार्यमूल्यांकन यांसारखी अनेक कामे आता AI आणि ऑटोमेशनद्वारे केली जात आहेत. परिणामी, ही कामे करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांची गरज कमी झाली आहे. या छाटणीचा सर्वाधिक परिणाम ‘People eXperience and Technology’ (PXT) या टीमवर होणार आहे. ही टीम एचआर व्यवस्थापनाशी संबंधित तांत्रिक आणि अनुभव आधारित काम पाहते.

amazon
India Respond To Donald Trump: सर्व काही भारतीय ग्राहकांसाठी.... रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याच्या ट्रम्प दाव्यावर भारताचं आलं उत्तर

गुंतवणूक AI आणि क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये

अमेझॉनने या वर्षी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनी AI आणि क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात 100 अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक करणार आहे. याचा मुख्य उद्देश नवीन डेटा सेंटर्स तयार करणे आणि अंतर्गत एआय सिस्टम्स अधिक शक्तिशाली बनवणे हा आहे.

सीईओ अँडी जैसी यांनी हे स्पष्ट केले आहे की, “AI च्या मदतीने कंपनी आपली उत्पादकता आणि कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढवू शकते. परंतु याच कार्यक्षमतेतील वाढीमुळे अनेक विभागांमध्ये मानवबळाची गरज कमी होईल.” याचाच अर्थ, ही छाटणी केवळ खर्चात कपात करण्यासाठी नसून, भविष्यातील AI युगाशी जुळवून घेण्यासाठी उचललेले एक धोरणात्मक पाऊल आहे.

amazon
Rajmargyatra App | NHAI चे 'राजमार्गयात्रा' ॲप प्रवाशांसाठी वरदान; आता राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास होणार 'स्मार्ट' आणि सुरक्षित!

भारतीय कर्मचाऱ्यांवरही परिणाम होण्याची शक्यता

Fortune च्या अहवालानुसार, या छाटणीमुळे सुमारे 15 टक्क्यांपर्यंत HR कर्मचारी आपली नोकरी गमावतील, मात्र अधिकृत आकडेवारी जाहीर झालेली नाही. या वर्षभरात अमेझॉनने लॉजिस्टिक्स, कॉर्पोरेट सेवा आणि टेक्नॉलॉजी विभागांमध्येही लहान-लहान टप्प्यांमध्ये कपात केली आहे.

अमेझॉनमध्ये होत असलेल्या या बदलांचा परिणाम केवळ अमेरिकेतच नाही, तर जगभरातील शाखांवर होऊ शकतो. तंत्रज्ञानाच्या बदलत्या युगात "AI शिकणे म्हणजेच नोकरी टिकवणे" हा संदेश स्पष्टपणे दिला आहे. AI च्या वेगवान वाढीमुळे आता अनेक कंपन्या तंत्रज्ञानावर आधारित कामकाजाला प्राधान्य देत आहेत आणि त्यामुळे मानवी कामांची गरज काही प्रमाणात कमी होत आहे. अमेझॉनची ही छाटणी त्याच दिशेने जागतिक स्तरावर झालेले एक मोठे आणि महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news