रील्सचा जलवा मोठ्या पडद्यावर..! TV वर स्क्रोल करा Instagram

पुढारी वृत्तसेवा

मोबाईलच्या छोट्या स्क्रीनला सुट्टी!

आता इन्स्टाग्राम रील्स पाहण्यासाठी मोबाईलच्या छोट्या स्क्रीनवर अवलंबून राहण्याची गरज नाही.

स्मार्ट टीव्हीवर 'इन्स्टाग्राम टीव्ही'

मेटा कंपनीने गुगल टीव्ही वापरकर्त्यांसाठी खास 'Instagram TV' ॲप जागतिक स्तरावर लाँच केले आहे.

लिव्हिंग रूममध्ये मनोरंजन

तुमच्या सोफ्यावर आरामात बसून आता स्मार्ट टीव्हीच्या मोठ्या स्क्रीनवर तुमचे आवडते रील्स आणि व्हिडीओ पाहता येतील.

कास्टिंगची कटकट संपली

पूर्वी टीव्हीवर इन्स्टाग्राम पाहण्यासाठी 'स्क्रीन मिररिंग' किंवा 'कास्टिंग' करावे लागायचे, आता त्याची गरज उरलेली नाही.

रिमोटने करा कंट्रोल

हे ॲप गुगल टीव्हीसाठी खास डिझाइन केलेले आहे, त्यामुळे तुम्ही टीव्ही रिमोटनेच रील्स स्क्रोल करू शकता.

प्ले आणि पॉजची सुविधा

रिमोटच्या मदतीने तुम्ही सहजपणे व्हिडीओ प्ले, पॉज किंवा पुढचे रील्स पाहण्याचा आनंद घेऊ शकता.

मित्रांच्या पोस्टही दिसणार

केवळ रील्सच नाही, तर तुमच्या मित्रांनी शेअर केलेले फोटो आणि पोस्ट्स देखील मोठ्या स्क्रीनवर पाहता येतील.

अनुभव आता अधिक समृद्ध

मोठ्या पडद्यावर हाय-डेफिनिशन रील्स पाहण्याचा अनुभव मोबाईलपेक्षा कितीतरी पटीने वेगळा आणि मजेशीर असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.