Breast Cancer Nanotechnology: ब्रेस्ट कॅन्सरवर IIT अन् ऑस्ट्रेलियन विद्यापीठांनी मिळून तयार केलं नॅनो टेक्नॉलॉजी इंजेक्शन

आता ब्रेस्ट कॅन्सर सेलपर्यंत कॅन्सरचं औषध थेट पोहचवता येणार आहे.
Breast Cancer Nanotechnology:
Breast Cancer Nanotechnology:pudhari photo
Published on
Updated on

Breast Cancer Nanotechnology: भारताच्या IIT मद्रास आणि दोन ऑस्ट्रेलियन विद्यापीठांनी मिळून एक नॅनो टेक्नॉलॉजी इंजेक्शन तयार केलं आहे. या अत्यंत छोट्या निडल सिस्टमद्यावेर आता ब्रेस्ट कॅन्सर सेलपर्यंत कॅन्सरचं औषध थेट पोहचवता येणार आहे. त्यामुळे इतर चांगल्या आरोग्यदायी सेल्सचे नुकसान होणे टळणार आहे.

Breast Cancer Nanotechnology:
Eggs Cancer Truth: अंडी खाल्याने कॅन्सर होतो का... FSSAI स्पष्टच सांगितलं!

हे नॅनो टेक्नॉलॉजी बेस इंजेक्शन भारताच्या आयआयटी मद्रास ऑस्ट्रेलियाच्या मोनाश विद्यापीठ डैकीन विद्यापीठ यांनी मिळून तयार केलं आहे. या नॅनो टेक्नॉलॉजी इंजेक्शन डिलिव्हरी सिस्टममध्ये अँटी कॅन्सर ड्रग्जचा पॅक, डॉक्सोरुबिकीन (doxorubicin) हे एका विशेष प्रोटेक्टिव्ह बबल्समध्ये असतात.

Breast Cancer Nanotechnology:
Mohan Bhagwat | कॅन्सर हा एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून संपूर्ण कुटुंबावर आघात करणारा आजार : सरसंघचालक मोहन भागवत

प्रभावी उपचार

याबाबत बोलताना आयआयटी मद्रासचे असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर स्वाती सुधाकर यांनी सांगितलं की, 'आता आम्ही या निडलच्या मदतीनं औषध थेट सेलपर्यंत पोहचवू शकतो. याद्वारे औषध त्वरित पोहचणार आहे. याच्या शाश्वत परिणामांसाटी ते एका बबलमध्ये रॅप केलेले असते आणि त्यानंतर ते आत पुश केलं जातं. लॅब टेस्टमध्ये हे औषध ब्रेस्ट कॅन्सर सेल्सची वाढ थांबवतं, या सेल्स मारतं अन् ट्युमरमधील नवीन ब्लड व्हेसल्स ब्लॉक करते.'

Breast Cancer Nanotechnology:
kolhapur | ...आत ड्रेनेजचा कॅन्सर... वर डांबराची मलमपट्टी?

ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण अधिक

महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर हा सर्वात कॉमन कॅन्सर प्रकार आहे. याचे रूग्ण शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात जास्त प्रमाणात आढळतात. चेन्नईत महिला कॅन्सर रूग्णांमध्ये २८ टक्के या ब्रेस्ट कॅन्सरच्या पीडित आहेत. त्याच्या खालोखाल cervix हा १४ टक्के ओव्हरी ६ तर corpus uteri ४ टक्के या कॅन्सर प्रकारांचा समावेश होतो.

कॅन्सरवरील पारंपरिक उपचार पद्धती जसे की केमोथेअरपी आणि रेडिएशन यामुळे नॉन कॅन्सर टिशूंना देखील हानी पोहचते. त्यामुळे अनेक साईड इफेक्ट देखील होतात.

Breast Cancer Nanotechnology:
Nasal Cancer: सतत नाक चोंदतय.... नाकाचा कॅन्सर तर नाही ना...? जाणून घ्या लक्षणे

२३ पट अधिक प्रभावी

दरम्यान आयआयटी आणि ऑस्ट्रेलियन विद्यापीठांनी तयार केलेल्या या निडलद्वारे केलेल्या प्रायोगिक उपचारांचे रिझल्ट हे पीर रिव्ह्यू जर्नल मध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्यामध्ये अॅडव्हान्स मटेरिअल इंटरफेसेस नुसत्या औषध उपचारांपेक्षा या निडलचा वापर करून केलेल्या उपचार हे २३ पट चांगले ठरले आहेत.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार औषधाची कमी मात्रा वापरून देखील याची संभाव्य परिणामकारकता चांगली आहे. यात थर्मल स्टॅबिलिटी आणि दीर्घकाळ म्हणजे जवळपास ७०० तास औषध रिलीज करण्याची क्षमता देखील आहे. सध्याच्या नॅनोकॅरिअरचे बस्ट रिलीज अन् खराब सुसंगतता हे दोष देखील यात दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. याबाबतचे पुढच्या चाचण्यांसाठी ही प्रणाली तयार असल्याचं देखील शोधकर्त्यांचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news