

Car AC summer mileage tips
मे-जून महिन्यात देशात उष्णतेची तीव्रता शिगेला पोहोचते. अशा गरम हवामानात कार चालवताना एसी (AC) वापरणे अपरिहार्य होते. मात्र, अनेकांना भीती असते की, एसीमुळे कारच्या मायलेजवर देखील परिणाम होईल. पण जर तुम्हाला गाडीत थंडावा हवाच आहे आणि कारने मायलेजही दिले पाहिजे. तर कार नेमक्या किती वेगाने चालवणे आवश्यक आहे.
उन्हाळ्यात एसी वापरावाच लागतो, पण योग्य ड्रायव्हिंग शैली आणि वेग सांभाळल्यास तुमच्या कारच्या मायलेजमध्ये फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे गरज आहे ती फक्त 'स्मार्ट ड्रायव्हिंगची'. चला तर जाणून घेऊया स्मार्ट ड्रायव्हिंग कसे करायचे.
उन्हाळ्यात कारचा केबिन फारच गरम होतो. उष्णतेपासून मुक्ती मिळवण्यासाठी AC (एसी) हीच एकमेव सोय असते. मात्र एसी वापरल्याने गाडीच्या इंधनावर अधिक ताण येतो, आणि परिणामी मायलेज 5 ते 20% पर्यंत घटू शकतो.
कारचा एसी चालवताना कॉप्रेसरला इंजिनकडून अतिरिक्त ऊर्जा लागते. इंजिन जास्त काम करत असल्याने इंधनाची खपत वाढते आणि मायलेज कमी होतो. याचा थेट परिणाम तुमच्या इंधन खर्चावर होतो.
तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात कारमध्ये एसी वापरताना कारचा वेग शहरात 40 ते 60 किमी/तास तर एक्सप्रेसवेवर १०० च्या आसपास वेग ठेवणे सर्वात योग्य आहे. या वेगावर इंजिनला फारसा ताण येत नाही. कॉप्रेसर सुद्धा नियंत्रितपणे काम करतो. त्यामुळे मायलेजमध्ये मोठी घट टाळता येते.
ACचा फॅन स्पीड मध्यम ठेवावा.
कार सुरू करताच लगेच एसी चालू करू नये.
कारचा वेग सतत बदलू देऊ नका.
टायरमध्ये योग्य हवा भरलेली असावी.