Google’s Nano Banana Pro : काय सांगता? गुगलचे नवे टूल हस्ताक्षरातील गणिताचे प्रश्न सोडवते!

व्‍हिडिओ पाहून अनेक युजर्सही झाले अचंबित, काही व्‍यक्‍त केली नकारात्‍मक प्रतिक्रिया
Google’s Nano Banana Pro : काय सांगता? गुगलचे नवे टूल हस्ताक्षरातील गणिताचे प्रश्न सोडवते!
image x
Published on
Updated on

Google’s Nano Banana Pro : गुगलचे नवीन 'नॅनो बनाना प्रो' नावाचे टूल हे सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. कारणही तसेच आहे. एका युजरने खुलासा दिला की, हे टूल प्रत्यक्ष हस्ताक्षरात लिहिलेले अक्षर किती अचूकपणे वाचू शकते आणि त्या हस्ताक्षरातून प्रतिमा तयार करू शकते.

वापरकर्त्याच्या हस्ताक्षराची हुबेहुब नक्कल

X (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केलेल्या एका चित्रात दाखवले आहे की, हे टूल हस्ताक्षरात लिहिलेल्या प्रश्नाचा फोटो विश्लेषण करून तो प्रश्न सोडवते. महत्त्वाचे म्हणजे, या टूलने फक्त गणिताचा प्रश्न सोडवला नाही, तर त्याने वापरकर्त्याच्या स्वतःच्या हस्ताक्षराची नक्कल केली. "गुगलचे नॅनो बनाना प्रो हे आतापर्यंतचे सर्वोत्तम इमेज जनरेशन एआय (AI) आहे," अशी पोस्ट @immasiddx या युजरने शेअर केली आहे.

Google’s Nano Banana Pro : काय सांगता? गुगलचे नवे टूल हस्ताक्षरातील गणिताचे प्रश्न सोडवते!
viral video : "माझ्या बहिणीला भूक लागली असती तर...." : एका भावाच्या कृतीने इंटरनेटवर मारली बाजी 

त्याच हस्ताक्षरात सोडवले गणित...

पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आपल्या नोट्सचा एक साधा फोटो अपलोड केल्यानंतर ‘नॅनो बनाना प्रो’ ने हस्ताक्षरातील प्रश्न किती सहजपणे सोडवला. मी त्याला एका प्रश्नाचा फोटो दिला, आणि त्याने तो माझ्या मूळ हस्ताक्षरातच ते गणित सोडवले. विद्यार्थ्यांना हे नक्कीच आवडेल. टूलने फोटोवर सहज प्रक्रिया केली आणि त्याच हस्ताक्षरात उत्तर तयार केले, माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच चांगले होते, असेही युजरने म्हटलं आहे. दरम्यान, ही पोस्ट २१ नोव्हेंबर २०२५ रोजी शेअर करण्यात आली आणि तेव्हापासून त्याला ५.५४ लाख व्ह्यूज (views) आणि अनेक कमेंट्स मिळाल्या आहेत.

Google’s Nano Banana Pro : काय सांगता? गुगलचे नवे टूल हस्ताक्षरातील गणिताचे प्रश्न सोडवते!
Lakshya Sen : लक्ष्य सेनने उमटवली 'ऑस्ट्रेलियन ओपन'वर मोहोर

कमेंट्सचा आला पूर

X वापरकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त करत कमेंट्सचा पूर आणला. इतक्या सफाईने हस्ताक्षर हाताळणारे एआय मॉडेल त्यांनी यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. एका वापरकर्त्याने कमेंट केली, "अविश्वसनीय! आणि आपण अजूनही एआयच्या अगदी सुरुवातीला आहोत." तर एकाने लिहिले की, "हस्ताक्षर एकेकाळी ‘कष्टाचा पुरावा’ होता. ते प्रयत्नाची बायोमेट्रिक सही होती. आता ते फक्त एक ‘स्टाइल फिल्टर’ बनले आहे. आपण केवळ विचार करण्याचे काम स्वयंचलित केले नाही, तर मानवी अपूर्णता देखील स्वयंचलित केली आहे." अनेक वापरकर्त्यांनी या ‘स्मूथ आउटपुट’चे कौतुक केले आणि याला नेक्स्ट-लेव्हल टेक्नॉलॉजी, असेही म्हटलं आहे.

Google’s Nano Banana Pro : काय सांगता? गुगलचे नवे टूल हस्ताक्षरातील गणिताचे प्रश्न सोडवते!
Chandigarh Bill Row : चंदीगड अनुच्छेद २४० बाबत केंद्राने दिले स्पष्टीकरण, नेमकं प्रकरण काय?

विद्यार्थी काहीही शिकणार नाहीत!

काहींनी गुगलच्या नव्या टूलबाबत नकारात्मक प्रतिक्रियाही दिल्या आहेत. "आधीच मागे पडलेल्या शिक्षण प्रणालीसमोर आता एक मोठे आव्हान उभे राहिले आहे," असे एकाने म्हटले असून, "विद्यार्थी काहीही शिकणार नाहीत आणि फक्त एआयला त्यांचा गृहपाठ करायला लावतील," असे मत एका युजरने व्यक्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news