तुमच्या Mobileलाही हवाय ब्रेक ! जाणून घ्या फोन 'Restart' करण्याचे अविश्वसनीय फायदे
तुम्ही तुमचा मोबाईल फोन अनेक वर्षांपासून वापरत असाल, पण तुम्हाला माहित आहे का की, फोनला नियमितपणे रिस्टार्ट (Restart) करण्याचे खूप फायदे आहेत? फोन रिस्टार्ट करण्याने होणारे हे फायदे अनेक लोकांना अजूनही माहीत नाहीत. जर तुम्ही आठवड्यातून एकदा जरी तुमचा फोन रिस्टार्ट केला, तर तुमच्या फोनला अविश्वसनीय फायदा होऊ शकतो.
स्पीड अन् परफॉर्मन्स वाढतो
फोन रिस्टार्ट केल्याने त्याची रॅम मेमरी (Random Access Memory) साफ होते.
तुम्ही एखादे ॲप बंद केले तरी ते अनेकदा पार्श्वभूमीवर (Background) चालू राहते, ज्यामुळे फोनची रॅम भरते आणि फोन हळू होतो.
मोबाईल रिस्टार्ट (Restart) केल्यावर पार्श्वभूमीवर सुरू असलेले ॲप्स आणि प्रक्रिया बंद होतात, ज्यामुळे फोनचा स्पीड आणि परफॉर्मन्स खूप सुधारतो.
ज्याप्रमाणे काम करताना तुम्हाला आठवड्यातून एकदा विश्रांतीची (Break) गरज असते, त्याचप्रमाणे तुमच्या फोनलाही आठवड्यातून एकदा ब्रेक देणे आवश्यक आहे.
कनेक्टिव्हिटी समस्या दूर होतात
वाय-फाय (Wi-Fi), ब्लूटूथ (Bluetooth) किंवा सेल्यूलर डेटा (Cellular Data) कनेक्टिव्हिटीमध्ये समस्या येत असल्यास, बऱ्याच वेळा फक्त फोन रिस्टार्ट केल्याने ही अडचण दूर होते. उदाहरणार्थ, तुमचा फोन वाय-फायशी जोडलेला असूनही इंटरनेट चालत नसेल, तर एकदा रिस्टार्ट करून पाहा, समस्या लगेच सुटू शकते.
'फोन हँग' होण्याची समस्या कमी होते
जर तुमचा फोन खूप हँग (Hang) होत असेल, तर त्याला रिस्टार्ट करणे उपयुक्त ठरते. यामुळे काही काळासाठी ही समस्या दूर होऊ शकते. रिस्टार्ट केल्याने फोन तात्पुरत्या 'गोंधळातून' (Glitches) बाहेर पडतो. फोन रिस्टार्ट केल्याने त्याची मेमरी ताजीतवानी (Refresh) होते, ॲप्समधील लहान-सहान त्रुटी (Bugs) दूर होतात आणि सिस्टीम सुरळीत चालण्यास मदत होते. त्यामुळे तुमच्या सारखीच तुमच्या स्मार्टफोनला देखील ब्रेक हवाय, तर तो नक्की द्या.

