ChatGPT UPI Payments: AI चा जलवा! ChatGPT तुमच्या घराचा किराणा खरेदी करेल अन् UPI पेमेंटही, जाणून घ्या कसे?

या सुविधेमुळे तुम्ही चॅट करत असतानाच वस्तू खरेदी करू शकाल आणि पेमेंटही लगेच होईल
ChatGPT UPI Payments
ChatGPT UPI Payments
Published on
Updated on

आता तुम्हाला किराणा खरेदीसाठी कुठेही जाण्याची गरज नाही. कारण आता तुमचा किराणा माल ChatGPT खरेदी करेल आणि UPI द्वारे पेमेंट देखील करेल. भारताच्या रियल-टाइम पेमेंट सिस्टीमला (Real-Time Payment System) आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी (AI) जोडण्याचा हा एक मोठा प्रयत्न आहे. या सुविधेमुळे तुम्ही चॅट करत असतानाच वस्तू खरेदी करू शकाल आणि पेमेंटही लगेच होईल.

ChatGPT UPI Payments
ChatGPT युजर्समध्ये महिला आघाडीवर ! कोण कशासाठी वापरतंय AI?; जाणून घ्या आकडे काय सांगतात

किराणा खरेदीसाठी दुकानात जाण्याची सोडा, पण एखाद्या ग्रोसरी ॲपलाही उघडण्याची गरज नसेल, असा दिवस आता दूर नाहीये. कारण हे काम आता दुसरे कोणी नाही, तर स्वतः ChatGPT करणार आहे. खरं तर, OpenAI ने भारताच्या राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि फिनटेक कंपनी रेझरपे (Razorpay) यांच्या सहकार्याने एक 'पायलट प्रोग्राम' सुरू केला आहे. या प्रोग्राममुळे आता ChatGPT वर UPI पेमेंट करणे शक्य होणार आहे. AI चॅटबॉटला भारताच्या रियल-टाइम पेमेंट सिस्टमशी जोडण्याचा हा पहिला आणि मोठा प्रयत्न आहे.

ChatGPT UPI Payments
OpenAI India office: ChatGPT चं मोठं पाऊल; OpenAI चे भारतातील पहिले कार्यालय नवी दिल्लीत; कर्मचारी भरती सुरू

काय आहे उद्देश?

UPI आणि AI चॅटबॉटचे कॉम्बिनेशन सुरुवातीला धोकादायक वाटू शकते, कारण येथे पैशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो. तथापि, ChatGPT मध्ये UPI पेमेंटची सुविधा देण्याचा मुख्य उद्देश म्हणजे, चॅट इंटरफेसमध्येच संपूर्ण खरेदीची सोय उपलब्ध करून देणे हा आहे. यामुळे लोक ChatGPT शी बोलत असताना केवळ स्वतःसाठी वस्तू खरेदी करू शकणार नाहीत, तर ChatGPT च्या माध्यमातून पेमेंट देखील करू शकतील. कंपन्या ही सिस्टम सुरक्षित आणि मजबूत बनवण्यात गुंतल्या आहेत, जेणेकरून ती लवकरच लोकांपर्यंत पोहोचवता येईल.

ChatGPT UPI Payments
ChatGPT 5 launch: OpenAIचे GPT-5 लाँच, युजर्संनी विचारलेल्या प्रश्नांना आता तज्ज्ञाप्रमाणे उत्तर देणार, जाणून घ्या ChatGPT मधील 5 मोठे बदल

पेमेंट कसे करता येईल?

या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहे. त्यामध्ये दाखवले आहे की, एक शॉपिंग लिस्ट ChatGPT मध्ये अपलोड करताच AI चॅटबॉट ऑर्डर करण्याची प्रक्रिया सुरू करतो. यानंतर, व्हिडिओमध्ये दाखवले आहे की ChatGPT युजरकडून सामान आणि पेमेंट कोणत्या आयडीने होईल, याबाबत तपशील कन्फर्म (Confirm) करतो. एकदा सहमती मिळाल्यावर, ChatGPT युजरला स्टॉक नसलेल्या (Out of Stock) वस्तूंची माहिती देतो आणि त्याने अमूल तुपाचे ५०० मिलीचे पॅक १ लीटरच्या पॅकने कसे बदलले, हे सांगतो. यावर युजर्सची सहमती मिळाल्यावर, ChatGPT सर्व वस्तूंचा तपशील आणि एकूण रक्कम (Total Amount) सांगून युजरची ऑर्डर देण्याची अंतिम संमती घेतो. यानंतर पेमेंट होते आणि ChatGPT तुमचा माल रस्त्यात आहे, असे सांगतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news