Anthropic New Policy: AI ला शिवीगाळ करणं आता पडणार महागात; Anthropic ने केला नवा नियम

रोज रोज काही कारण नसताना AI ला उठता बसता शिव्या देणं ही AI विरूद्धची क्रुरता असून त्या वागणुकीबद्दल कारवाई होऊ शकते.
Anthropic New Policy
Anthropic New Policypudhari
Published on: 
Updated on: 

Anthropic New Policy: चॅट जीपीटी किंवा क्लाऊडचे उत्तर किंवा त्याने करून दिलेला फोटो आवडला नाही तर त्याला आपण तो आपला दोस्त असल्यासारखं शिवी हासडतो. मात्र ते मशिन आहे भावना नसल्या तरी तो तुमच्या मित्राएवढा तरी मुरदाड नाहीये. आता AI तुमची ही शिवीगाळ सहन करणार नाहीये. Anthropic कंपनीने एक नवा नियम बनवला आहे. या नियमाअंतर्गत आता जर AI ला शिवीगाळ केली तर तुमचे अकाऊंट बॅन होऊ शकते.

Anthropic New Policy
Anthropic IPO AI risk to humanity : एआयमुळे मानवाच्या अस्तित्वालाच धोका, ‘अँथ्रॉपिक’चा ‘आयपीओ’ दस्तावेजात गंभीर इशारा

कारण नसताना शिवी देता येणार नाही

रोज रोज काही कारण नसताना AI ला उठता बसता शिव्या देणं ही AI विरूद्धची क्रुरता असून त्या वागणुकीबद्दल कारवाई होऊ शकते. मात्र तुम्ही AI च्या कामगिरीवर नाराज आहात त्याच्यावर टीका करत आहेत आणि तुमचे अकाऊंट बंद होणार असं नाही.

विचार करा तुम्ही एका AI ला महत्वाचे काम करण्यास सांगितले. त्याने चुकीचं उत्तर दिलं. तुम्ही परत विचारलं तरी देखील त्याने योग्य उत्तर दिलं नाही. रागाच्या भरात तुम्ही त्याला शिवी दिली. आता AI कंपनी याकडे कशा प्रकारे पाहणार आहे. AI कंपनी तुमचं अकाऊंट बंद करणार का?

Anthropic New Policy
Anthropic AI Models | अमेरिकेकडून ‘अँथ्रोपिक’चे अत्याधुनिक मॉडेल्स जगासाठी बंद

Anthropic ची नवी पॉलिसी

हा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे. कारण क्लाऊड AI तयार करणारी कंपनी Anthropic ने आपल्या युजर पॉलिसीमध्ये AI मॉडेलचे कारण नसताना अपमानजनक किंवा क्रूर व्यवहार करण्यावर बंदी घातली आहे. कंपनीने ८ ऑक्टोबर २०२६ रोजी आपली नवीन पॉलिसी घोषित केली आहे. हे नियम आता १२ नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत.

Anthropic New Policy
Anthropic CEOs Prediction | ‘एआय’मुळे माणूस 150 वर्षे राहणार जिवंत?

शिवी दिल्यावर अकाऊंट होणार बॅन?

Anthropicने आपल्या पॉलिसीमध्ये सस्टेन्ड अँड नीडलेस क्रएल बिहेवेअर अर्थात अचानक अपमानजनक आणि क्रूर व्यवहार करण्यावर बंदी घातली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हा नियम फक्त अत्यंत गंभीर प्रकरणाच्या वेळीच वापरा जाणार आहे. युजर जर सारखं सारखं शिवीगाळ करत असेल तर त्याचा यामागे उद्देश चांगला नाहीये.

जर क्लाऊड तुम्हाला चुकीचे उत्तर देत असेल तर तुम्ही फक्त तुझे उत्तर चुकीचे आहे असं म्हणू शकतो. ते काही नियमाचे उल्लंघन ठरणार नाही. तुम्ही त्याच्याशी अहसहमती दर्शवू शकता. त्याच्या उत्तरावर प्रश्न उपस्थित करू शकता. चांगले उत्तर देण्यासाठी त्याला सांगू शकता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news