Philips smartphone: फिलिप्सचा पहिला स्मार्टफोन भारतात लॉन्च; 64MP कॅमेरा अन् 5700mAh बॅटरी, पाहा किंमत

फिलिप्स कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपला पहिला स्मार्टफोन लाँच केला आहे.
Philips S7221 5G
Philips S7221 5GFile Photo
Published on
Updated on

Philips smartphone

नवी दिल्ली: फिलिप्स कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपला पहिला स्मार्टफोन लाँच केला आहे. 'फिलिप्स S7221 5G' असे नाव असलेल्या या स्मार्टफोनला ६.६७ इंच डिस्प्ले, ५,७०० एमएएचची बॅटरी आणि ६४ मेगापिक्सेलचा कॅमेऱ्यासह अनेक आकर्षक फीचर्स देण्यात आली आहेत.

Philips S7221 5G या हँडसेटची सुरुवातीची किंमत २०,४९९ रुपये आहे. या किंमतीत ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळते. तर ८जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या दुसऱ्या व्हेरिएंटची किंमत २२,४९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन काळा, निळा आणि राखाडी या तीन रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे.

Philips S7221 5G
Nitin Gadkari: देशातील सर्व राज्यांमध्ये धावणार बाईक टॅक्सी? नितीन गडकरींची नवीन योजना तयार; वाहतूक नियमांबाबत मोठी घोषणा

फिलिप्स S7221 5G ची वैशिष्ट्ये

Philips S7221 5G मध्ये ६.६७ इंचांचा HD LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्क्रीनचे रिझोल्यूशन ७२० x १,६०० पिक्सेल असून, १२०Hz रिफ्रेश रेट मिळतो. त्यामुळे फोनवर स्क्रोलिंग आणि व्हिडीओ पाहण्याचा अनुभव अधिक चांगला मिळण्याची अपेक्षा आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोअर Spreadtrum T765 चिपसेट देण्यात आला आहे. फोनमध्ये LPDDR4 रॅमचा वापर करण्यात आला असून, हा स्मार्टफोन अँड्रॉइड १६ ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.

६४ मेगापिक्सलचा कॅमेरा

फिलिप्स S7221 5G मध्ये ६४ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि सेल्फी व व्हिडिओ कॉल्ससाठी १६-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात AI सीन डिटेक्शनची सुविधाही समाविष्ट आहे.

५,७००mAh ची दमदार बॅटरी

Philips S7221 5G मध्ये ५,७००mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी चार्ज करण्यासाठी २५W चा फास्ट चार्जर देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी फोनच्या बाजूला फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत Philips च्या या पहिल्या फोनची थेट स्पर्धा आधीपासूनच लोकप्रिय असलेल्या विविध कंपन्यांच्या स्मार्टफोनशी होणार आहे.

Philips S7221 5G
Apple CEO salary: ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस यांना किती मिळणार पगार?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news