Mirror Place Vastu Tips: घरात 'या' ठिकाणी लावला असेल आरसा तर त्वरित बदला... करावा लागू शकतो अडचणींचा सामना

Mirror Place Vastu Tips
Mirror Place Vastu Tipspudhari
Published on
Updated on

Mirror Place Vastu Tips: वास्तू शास्त्रानुसार घरात लावलेला आरसा हा ऊर्जा आणि घरातील वातावरण यावर मोठा परिणाम करतो. आरसा ही अशी वस्तू आहे जी ऊर्जा आकर्षित देखील करते आणि त्यात दुप्पट वाढ देखील करू शकते. त्यामुळं घरात आरसा योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी लावला तर घरात सुख शांती आणि समृद्धी येते. तसेच घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते.

मात्र हाच आरसा जर चुकीच्या ठिकाणी लावला तर नकारात्मक ऊर्जा, तणाव आणि आर्थिक संकटे घेऊन येऊ शकतो. त्यामुळं घरात योग्य ठिकाणी आरसा लावणे वास्तू शास्त्रानुसार महत्वाचं आहे. जेणेकरून घरात सकारात्मक ऊर्जा कायम टिकून राहील.

Mirror Place Vastu Tips
प्रगती थांबली आहे? तुम्ही दररोज सकाळ - संध्याकाळ 'या' ५ वास्तु चुका करत नाही ना?

योग्य दिशेला लावा आरसा

वास्तू शास्त्रानुसार आरसा हे नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला भींतीवर लावणे शुभ मानलं जातं. या दिशा नैसर्गिक उजेड आणि सकारात्मक उर्जेशी जोडल्या आहेत. यामुळं घरातील वातावरण चांगलं बनतं.

मुख्य दरवाजाच्या समोर लावू नये

घरातील मुख्य प्रवेशद्वाराच्या बरोबर समोर आरसा लावणे टाळावे. असं मानलं जातं की घरात येणारी सकारात्मक ऊर्जा ही परत जाते. त्याचा घरातील सुख शांतीवर परिणाम होतो.

Mirror Place Vastu Tips
बेडरूमची 'ही' दिशा पती-पत्नीमध्ये वाढवू शकते तणाव; त्वरित बदल करा, अन्यथा वाढेल मानसिक ताण

बेडच्या समोर आरसा लावणे टाळावे

बेडरूममध्ये आरसा लावताना तो अशा प्रकारे लावला पाहिजे की त्यात तुमचे प्रतिबिंब दिसणार नाही. यामुळं तुमची झोप प्रभावित होऊ शकते

फुटलेला आरसा दूर ठेवा

फुटलेला आरसा घरात नाकारात्मक ऊर्जा वाढवणार ठरतो. त्यामुळं असा आरसा त्वरित हटवला पाहिजे.

Mirror Place Vastu Tips
Vastu Tips Bathroom Mirror: बाथरूममध्ये आरसा लावणे योग्य की अयोग्य? वास्तुशास्त्र काय सांगते?

आरशात काय दिसतंय?

आरशातून कायम साफ आणि सकारात्मक गोष्टी रिफ्लेक्ट करायला पाहिजे. जर त्यात हिरवळ, उजेड या सुंदर गोष्टी दिसत असतील तर घरात चांगली ऊर्जा वाढते.

समोरासमोर आरसे लावू नयेत

दोन आरसे एकमेकांच्या बरोबर समोर लावण्यानं सतत प्रतिबिंब तयार होतं. यामुळं मानसिक अस्थिरता वाढू शकते. या प्रकारे समोरासमोर आरसे लावणं टाळावं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news