पुढारी वृत्तसेवा
बाथरूम हा घराचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. त्यामुळे त्याच्या स्वच्छतेसोबतच तिथे असलेल्या गोष्टींकडेही लक्ष देणे गरजेचे असते.
बाथरूममधील आरशाबाबत ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
बाथरूममधील आरसा तुमच्या दैनंदिन जीवनावर आणि ऊर्जेवर परिणाम करू शकतो. चुकीच्या ठिकाणी किंवा चुकीच्या डिझाइनचा आरशाचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो.
बाथरूममध्ये आरसा लावणे चुकीचे नाही, परंतु त्याची योग्य दिशा माहित असणे अत्यंत आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार, बाथरूमच्या दरवाजाच्या अगदी समोर आरसा लावू नये.
आरसा अशा ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करा जिथे आत गेल्यावर तुमची नजर थेट त्यावर पडणार नाही.
बाथरूमचा आरसा उत्तर किंवा पूर्व दिशेच्या भिंतीवर लावणे उत्तम ठरते, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.
बाथरूममधील आरशाचा आकारही महत्त्वाचा असतो. आयताकृती किंवा चौरस आकाराचा आरसा लावणे शुभ मानले जाते.
बाथरूममधील आरसा जर तुटलेला असेल, त्याला तडा गेला असेल, तर वास्तुशास्त्रानुसार ते योग्य मानले जात नाही. असा आरसा घरात तणाव, नकारात्मकता वाढवू शकतो.
तज्ज्ञांच्या मते, बाथरूममध्ये आरसा लावणे हानिकारक नाही, फक्त काही महत्त्वाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.