प्रगती थांबली आहे? तुम्ही दररोज सकाळ - संध्याकाळ 'या' ५ वास्तु चुका करत नाही ना?

घरातील आपल्या काही सवयींचाही आपल्या प्रगतीवर परिणाम होत असतो.
your progress stalled? Don't you make these 5 Vastu mistakes
प्रगती थांबली आहे? तुम्ही दररोज सकाळ - संध्याकाळ या ५ वास्तु चुका करत नाही ना? file photo
Published on
Updated on

Has your progress stalled? Don't you make these 5 Vastu mistakes every morning and evening?

पुढारी ऑनालाईन :

हिंदू धर्म आणि वास्तूशास्त्रानुसार सकाळ आणि संध्याकाळची वेळ संधीकाल मानला जातो, म्हणजे दिवस आणि रात्रीचा संगम होण्याचा क्षण. हा अतिशय पवित्र वेळ असतो, ज्यावेळी विश्वात सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते.

your progress stalled? Don't you make these 5 Vastu mistakes
Magical Drink Craze : मलायका असो वा दीपिका सकाळी उठल्यावर घेतात 'हे' खास ड्रिंक

वास्तूशास्त्रानुसार हा काळ घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आपल्या ज्येष्ठांनी नेहमी सांगितले आहे की, घराची भरभराट फक्त कमाईवर नाही तर चांगल्या सवयींवरही अवलंबून असते. अनेकदा आपण नकळत सकाळी उठताना किंवा संध्याकाळच्या वेळी काही चुका करतो, ज्यामुळे घरात नकारात्मकता आणि दरिद्रता वाढू शकते. जर तुम्हालाही वाटत असेल की मेहनत करूनही पैसा टिकत नाही किंवा घरात तणाव वाढतो आहे, तर खालील 5 वास्तू नियमांकडे लक्ष द्या:

सकाळी उशिरा उठणे

सूर्योदयानंतर उशिरापर्यंत झोपून राहणे आरोग्य आणि सौभाग्य दोन्हींसाठी अपायकारक मानले जाते. वास्तूनुसार, उशिरा उठणाऱ्या लोकांच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि अशा घरात लक्ष्मीचा वास होत नाही. त्यामुळे शक्यतो सूर्योदयाच्या आधी किंवा त्याच वेळी उठण्याचा प्रयत्न करा.

your progress stalled? Don't you make these 5 Vastu mistakes
Vastu tips: घरात कोळ्याचे जाळे असणे शुभ आहे की अशुभ? वास्तुशास्त्र काय सांगते...

संध्याकाळी झाडू लावणे

शास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी घरात झाडू लावणे टाळावे. असे मानले जाते की संध्याकाळी झाडू लावल्याने घरातील लक्ष्मी बाहेर जाते. जर झाडू लावणे अत्यावश्यक असेल, तर कचरा घराबाहेर टाकू नका, तो एका कोपऱ्यात साठवून ठेवा.

सूर्यास्ताच्या वेळी झोपणे

संध्याकाळी झोपणे टाळावे. या वेळी झोपल्यास शारीरिक आजार वाढू शकतात आणि घरात दरिद्रता येते असे मानले जाते. ही वेळ पूजा, प्रार्थना आणि ध्यानासाठी योग्य आहे.

मुख्य दरवाज्यावर अंधार ठेवणे

संध्याकाळ होताच घराच्या मुख्य दरवाज्यावर प्रकाश असणे आवश्यक आहे. अंधारामुळे नकारात्मक शक्ती आकर्षित होतात. प्रवेशद्वाराजवळ दिवा किंवा लाईट लावल्याने लक्ष्मीचा प्रवेश होतो आणि व्यवसाय व करिअरमध्ये प्रगती होते.

तुळशीजवळ घाण किंवा अंधार ठेवणे

सकाळ-संध्याकाळ तुळशीची योग्य देखभाल करणे महत्त्वाचे आहे. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा. मात्र सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडू नयेत किंवा तिला पाणी घालू नये. तुळशीच्या आसपास घाण ठेवणे हे धनहानीचे कारण ठरू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news