Womens Health and Yoga : महिलांचे आरोग्य आणि योग

महिलांचे आरोग्य आणि योग
महिलांचे आरोग्य आणि योग

[author title="प्राजक्ता कुलकर्णी" image="http://"][/author]

आज (दि. 21 जून) दहावा जागतिक योग दिवस साजरा होत आहे. यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. 'yoga for woman empowerment' योगाचा अभ्यास कुणी करावा, यासाठी काही बंधन नाही. फक्त साधारणपणे वयाच्या 8 व्या वर्षानंतर योग साधना करावी, असं म्हटलं जातं. स्त्री जीवनात योगाचं महत्त्व आपण बघू.

स्त्रीच्या आयुष्यात शारीरिकद़ृष्ट्या बघायला गेलं तर त्यांची harmonal system ज्याला endocrine system म्हटलं जातं, जिच्यामार्फत सर्व शरीरातील harmones ची पातळी नियंत्रित केली जाते. ही खूप महत्त्वाची यंत्रणा आहे. harmone secretion व्यवस्थित असले की, स्त्रीचं आरोग्य सुद़ृढ राहायला मदत होते. स्त्री ही भावनाप्रधान असल्यामुळं तिच्या आयुष्यात भावनिक संतुलन असणंदेखील तितकंच महत्त्वाचं आहे, ज्याला emotional quotiont म्हणतात. हल्ली सगळ्यांसाठीच यशस्वी होण्यासाठी भावनिक बुद्ध्यांक चांगला असणं खूप गरजेचं समजलं जातं. योगक्रिया शरीर आणि मनावर-भावनांवर सुपरिणाम करतात.

स्त्रियांना जाणवणारे सर्वसामान्य त्रास पुढील असतात. 1) पाळीच्या तक्रारी, 2) गर्भाशय संबंधित तक्रारी, 3) कंबरदुखी, पायदुखी, 4) वाढणारं वजन, 5) ताणतणाव, धावपळ इत्यादी. सध्याची स्त्री करिअर, मुलं हे सगळंच सांभाळत आहे, त्यामुळं थकवा, अशक्तपणा, रक्ताची, HB ची कमी अशा समस्या जास्त आहेत. या सर्वांसाठी योगामध्ये खूपच परिणामकारक उपाय सांगितले आहेत.

आसनं- खास स्त्रियांसाठी (पाळी विकारावर)

अ) पाळीपूर्व अभ्यासासाठी – 1) उत्थित त्रिकोणासन, 2) बद्धकोनासन, 3) सुप्त वीरासन, 4) सेतुबंधासन, 5) सर्वांगासन, 6) उपविष्ट कोनासन ही आसनं शिकून घेऊन नियमित करावीत.

ब) अल्पआर्तव – 1) सुप्त बद्धकोनासन, 2) बैठक वीरासन, 3) उत्थित पार्श्वकोनासन, 4) शशांकासन

क) पाळीमध्ये पोटात दुखणं – 1) शशांकासन, 2) शवासन

ड) अंगावर पांढरं जाणं – 1) सर्वांगासन, 2) हलासन, 3) विपरीत करणी

इ) गर्भाशय विकार – 1) चक्की संचलन, 2) अश्विनीमुद्रा, 3) अंतर्कुभक, 4) सेतुबंधासन याशिवाय बाळंतपणानंतर करायच्या क्रियाही आहेत, ज्यामध्ये ' Body Tone' पूर्ववत व्हायला मदत मिळते.

प्राणायाम

सर्व harmones चं कार्य सुरळीत चालण्यासाठी 1) भ्रामरी, 2) ॐ कार जप अत्यंत उपयुक्त आहे. यामुळं मानसिक ताण कमी होण्यास 100 टक्के मदत मिळते. तसेच मेंदूच्या तळाशी असणार्‍या Pituitary Gland ला उत्तेजना मिळून तिचं कार्य सुधारते. वजन कमी करण्यासाठी भस्त्रिका व कपालभाती, सूर्यभेदन यांचा उपयोग होतो. मनाच्या संतुलनासाठी नाडीशोधन परिणामकारक ठरते. सर्दी- खोकला विकारावर उद्जायी छान आहे. दीर्घ श्वसनामुळं भावनांवर नियंत्रण येतं. त्यामुळं भावनिक आंदोलन होऊन त्रास होत नाही.

योगातील ध्यान, सजगता, सकारात्मक विचार या त्रिसूत्रीमुळं स्त्रियांचे ताण कमी होऊन उत्साह, चैतन्य वाढते. मानसिक शांतीची जाणीव होत संयम वाढतो. नियमित योगासनं केल्यामुळं रक्तदाब, मधुमेह यासारखे विकार दूर राहतात. शरीर सुडौल, बांधेसूद राहते.

योग हे अनुभवाचं शास्त्र आहे. त्यामुळं फक्त माहिती वाचण्यापेक्षा चांगल्या योगशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली योग प्रात्यक्षिकं करावीत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news