Silk Saree : देखभाल सिल्क साडीची

Silk Saree : देखभाल सिल्क साडीची

सण-समारंभ असले की, सिल्कच्या साड्यांनाच प्राधान्य दिलं जातं. ही साडी दिसायला जेवढी सुंदर दिसते तेवढी त्याची देखभाल अवघड आहे. त्यासाठी काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. (Silk Saree)

घरी किंवा घराबाहेर एखाद्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला जायचं असेल तर भारतीय महिला सिल्कच्या साडीलाच प्राधान्य देतात आणि ते असणार का नाही? कारण या साडीमुळे स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळाच लूक येतो. दक्षिण भारतीय महिलांमध्ये या साडीशिवाय कोणताही सण-समारंभ पूर्णच होत नाही. ही साडी दिसायला जेवढी सुंदर दिसते तेवढीच त्याची देखभाल मात्र कठीण आहे. ही साडी रोज धुता येत नाही. त्यासाठी या साडीवर डाग पडले असतील, तर ते कसे निपटून काढावेत, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

Silk Saree : अशी घ्या सिल्क साडीची काळजी 

ही साडी नेहमी मलमलच्या किंवा सुती कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवावी. ज्या दिवशी ऊन पडेल त्या दिवशी थोडा वेळ साडी उन्हात वाळत घालावी. यामुळे साडीला दुर्गंध येणार नाही. शक्यतो ही साडी धुणं टाळावं. अनेकदा ड्रायक्लीनरही या साडीची योग्य देखभाल करू शकत नाहीत. सिल्क साडी कधीही लोखंड किंवा लाकडाच्या हँगरला अडकवून ठेवू नये. साडी धुण्याचीच वेळ आली, तर ती आधी साबणाच्या हलक्या फेसाने साफ करावी आणि थंड पाण्याने धुवावी. कधीही आपली ओली साडी उन्हामध्ये वाळवू नये. यामुळे तिचा रंग जातो. खासकरून निळ्या, मरून आणि हिरव्या रंगांच्या साड्यांना हा धोका जास्त असतो. इतर रंगांच्या साड्या असल्या तरी त्या धुऊन उन्हात वाळवू नयेत.

कधीही नेप्थलीन बॉलला कपाटामध्ये थेट साड्यांच्या आसपास ठेवू नये. कारण, त्यामुळे कपड्यांचं फॅब्रिक खराब होतं. त्यामुळे ते नेहमी एका वेगळ्या टोपलीत ठेवावं. कधी चुकून आपल्या साडीला लिपस्टीकचा डाग, तेलाचा किंवा कॉस्मेटिकचा डाग पडला, तर त्या ठिकाणी टॅल्कम पावडर लावून तो डाग सुकवावा. त्यानंतर तो डाग एखाद्या स्वच्छ कपड्याने किंवा टिश्यू पेपरने साफ करावा.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news