गोड पदार्थात थोडेसे मीठ का टाकावे? जाणून घ्या किचन टिप्स | पुढारी

गोड पदार्थात थोडेसे मीठ का टाकावे? जाणून घ्या किचन टिप्स

कणिक, रवा किंवा मसाले काहीही भाजताना मंद गॅसवर भाजा. गॅस मोठा करून भाजल्यास पदार्थांचा स्वाद कमी होतो.

स्वयंपाक करताना घाई करू नका. सर्व गोष्टी आधीपासून तयार ठेवा.

कोणत्याही गोड पदार्थात (खीर, हलवा वगैरे) थोडेसे मीठ टाकल्याने त्या पदार्थाला चव चांगली येते. पदार्थाला खारटपणा येणार नाही, इतपतच त्यात मीठ घाला.

कोणताही पदार्थ पूर्णपणे शिजवू नका. कमीत कमी दहा टक्के तरी तो कमी शिजला पाहिजे. कारण, गॅस बंद केल्यावर झाकणाखाली वाफेवर तो पदार्थ व्यवस्थित शिजत राहतो.

स्वयंपाक करताना एखादा चमचा हाताशी ठेवावा. आपण तयार करत असलेले पदार्थ वारंवार चाखून पाहावेत. एखादा पदार्थ बिघडला असेल, तर तो लगेच त्यामुळे दुरुस्त करणे सोपे जाते आणि कोणत्या टप्प्यावर पदार्थात काय टाकल्याने तो सुधारला हेही समजते.

स्वयंपाक आत्मविश्वासाने करा. गॅसवर ठेवलेल्या भांड्याचे झाकण किंवा मायक्रोवेवचे गेट वारंवार उघडून पाहण्याने पदार्थ शिजण्यास, तयार होण्यास अधिक वेळ लागेल आणि त्याची चवही बिघडेल.

सॉस, सूप तयार करून झाल्यावर गाळून घ्या. त्यामुळे ग्रेव्ही जास्त साफ मिळेल.

हेही वाचा : 

 

Back to top button