Japanese HPC Technique: जपानी तंत्रज्ञानाचीच चर्चा... स्टील सळी न वापरताही बांधता येतं दुप्पट मजबूत घर

पारंपरिक स्टीलच्या सळ्यांच्या ऐवजी कार्बन फायबरच्या सळ्यांचा वापर केला जात आहे. या खास तंत्रज्ञानामुळे काँक्रिकटची जाडी आणि वजन कमी करता येते.
Japanese HPC Technique
Japanese HPC Techniquepudhari
Published on: 
Updated on: 

Japanese HPC Technique: घर बांधायचं म्हणजे सर्वात महत्वाच्या गोष्टी म्हणजे सिमेंट, वाळू, विटा अन् स्टील! घराला मजबूती द्यायची म्हटलं की त्यात चांगल्या प्रतीचे स्टील वापरायल हवं अशी एक सर्वसाधारण धारणा असते. जर स्टील चांगलं असेल तर काँक्रिट मजबूत होते. घर दीर्घकाळ टीकतून राहते.

मात्र आता जपान मध्ये एका अशा तंत्रज्ञानावर काम होत आहे जे काँक्रिटच्या मजबूतीकरणासाठी पारंपरिक स्टीलच्या सळ्यांच्या ऐवजी कार्बन फायबरच्या सळ्यांचा वापर केला जात आहे. या खास तंत्रज्ञानामुळे काँक्रिकटची जाडी आणि वजन कमी करता येते. तसेच आता लोखंडी सळ्या गंजण्याची समस्या देखील सुटणार आहे. असं असलं तरी आता सर्वच घरे बांधताना या कार्बन फायबर सळ्यांचा वापर केला जाईल असं नाही. हे एक खास तंत्रज्ञान आहे. याचा वापर डिझाईन आणि इंडिनिअरिंग मानकांनुसारच केला जातो.

Japanese HPC Technique
Tawde Hotel Area Illegal Constructions | तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामांना अभय देण्याचा घाट?

काय आहे जपानी टेक्निक?

जपानमध्ये विकसित झालेल्या या तंत्रज्ञानाला हायब्रिड प्रीस्ट्रेस्ट काँक्रिट (HPC) असे म्हटलं जाते. याचात स्टील सळ्यांऐवजी कार्बन फायबरपासून तयार केलेल्या मजबूत सळ्यांचा वापर केला जातो. कार्बन फायबर एक विशेष आणि हलका मात्र मजबूत मटेरियल आहे. याचा वापर विमान, गाड्या आणि दुसऱ्या आधुनिक मशिन्समध्ये केला जातो. याची विशेष गुणवत्ता म्हणजे हे मटेरियल वजनाने कमी असते. मात्र हे टेन्शनचे प्रेशर जास्त प्रमाणात सहन करू शकते.

जपानी तंत्रज्ञानानुसार कार्बन फायबर सळ्यांना काँक्रिटच्या आत लावले जाते. या काँक्रिटला सपोर्ट देतात. यासाठी सामान्यपणे यासाठी लोखंडी सळ्या वापरल्या जात होत्या. मात्र आता कार्बन फायबरच्या सळ्या वापरून काँक्रिटची जाडी आणि वजन कमी केलं जाऊ शकतं.

Japanese HPC Technique
Pune Construction Site Safety: दिवाळीत पुण्यातील बांधकामांवर महापालिकेचा सुरक्षा वॉच; नियम मोडणारी कामे तातडीने बंद होणार!

कार्बन फायबरचाच वापर का?

सहसा घर बांधताना लोखंडी सळ्यांचा वापर केला जातो. काँक्रिटचा दबाव सहन करण्यासाठी मजबूत मानले जाते. मात्र टेन्शन वाढल्यास त्यात क्रॅक येऊ शकतात. अशावेळी सळ्या त्यांना अतिरिक्त सपोर्ट देते आणि तुटण्यापासून वाचवते. मात्र या सळ्यांबाबत एक अडचण असते. कालानुरूप आद्रता आणि पाणी हवा याचा संपर्क आल्यास त्या गंजू शकतात. ज्यावेळी काँक्रिकटच्या आतील सळ्या गंजतात त्यावेली काँक्रिकटमध्ये भेग पडू शकते. यामुळे इमारतीच्या मजबुतीवर परिणाम होऊ शकतो.

जपानने कार्बन फायबर सळ्यांचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे लोखंडासारखं या सळ्यांना गंज लागत नाही. त्यामुळे काँक्रिट आतून मजबूत राहते आणि दीर्घ काळ सुरक्षित राहण्यास मदत होते.

काँक्रिकट हलके आणि पातळ होते

जपानच्या या तंत्रज्ञानाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं कन्स्ट्रक्शन हे हलके आणि जाडीला कमी होते. जपान सरकारकडून प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार या तंत्रज्ञानापासून तयार करण्यात आलेल्या काँक्रिटची जाडी जवळपास ३८ मिलीमीटर पर्यंत कमी ठेवता येऊ शकते. मात्र असं असलं तरी हे काँक्रिट सामान्य काँक्रिट एवढेच मदतबूत राहते. त्यामुळे कार्बन फायबर सळ्यांमुळे इमारतीचे एकूण वजन कमी करता येते. तसेच डिझाईन अजून जास्त लवचिक करण्यात दखील मदत होते.

Japanese HPC Technique
Japan's MMX Mission | पहिल्यांदाच मंगळाच्या चंद्रावर उतरणार अंतराळयान

भूकंपात सुरक्षित राहणार?

जपानमध्ये भूकंपाचा धोका सर्वाधिक आहे. त्यामुळं इथं इमारत तयार करताना खूप काळजी घेतली जाते. निर्माण केली जाणारी इमारत ही भूकंपाचे झटके सहन करू शकणार का याची चाचणी केली जाते. कार्बन फायबर कन्स्ट्रक्शन तंत्रज्ञानात हलक्या आणि मजबूत मटेरियलचा वापर केला जातो. त्यामुळे इमारतीचे काही भाग मजबूत आणि हलके बनवण्यास मदत होते. मात्र या तंत्रज्ञानाला भूकंपरोधी म्हणता येणार नाही. यासाठी इमारतीचे संपूर्ण डिझाईन, पाया, भिंती आणि इतर भाग देखील भूकंपरोधी मापदंडानुसार तयार होणे गरजेचे आहे.

भारतात वापर होऊ शकतो?

भारतात घर तयार करताना या नव्या तंत्रज्ञानाचा आणि हलक्या मटेरियलवर काम होत आहे. मात्र जपानच्या या खास तंत्रज्ञानाची भारतात सामान्य इमारतीत वापर करण्यापूर्वी याची उपलब्धता, खर्च आणि भारतीय कन्स्ट्रक्शन मापदंडांनुसार परवानगीची माहिती असणे गरजेचे आहे. सध्याच्या घडीला तरी पारंपरिक लोखंडी सळ्यांना कार्बन फायबरवाल्या सळ्या पूर्णपणे पर्याय मानने योग्य ठरणार नाही. येणाऱ्या काळात अशा प्रकारच्या टेक्निक कन्स्ट्रक्शन जगतात मोठा बदल घडवून आणू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.