LPG cylinder : "तुमचा LPG सिलेंडर लवकर संपतोय? रोजच्या 'या' 10 सवयी बदला.. होईल मोठी गॅस बचत!"

LPG सिलेंडर पटकन रिकामा होण्यामागचे रहस्य; जाणून घ्या गॅस बचतीचे सोपे उपाय
LPG cylinder
LPG cylinder : "तुमचा LPG सिलेंडर लवकर संपतोय? रोजच्या 'या' 10 सवयी बदला.. होईल मोठी गॅस बचत!"file photo
Published on
Updated on

Is your LPG cylinder running out too quickly? Changing these 10 daily habits can lead to significant gas savings!

पुढारी ऑनलाईन : जर तुम्हाला तुमचा LPG सिलेंडर अधिक दिवस चालवायचा असेल, तर काही छोट्या चुका आणि सवयींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यामुळे गॅसची बचत होऊन सिलेंडर जास्त काळ टिकू शकतो.

LPG cylinder
Indian rupee fall | रुपया सावरणार कसा?

इराण-अमेरिका आणि इस्रायलमधील तणावामुळे निर्माण झालेल्या जागतिक परिस्थितीचा परिणाम भारतातील एलपीजी पुरवठा व्यवस्थेवरही होत असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या किंमती आणि बाजारातील मागणीमुळे लोक सिलेंडरची साठवणूक करत आहेत. अशा वेळी गॅसचा वापर जपून करणे अधिक महत्त्वाचे ठरते.

खरं तर, स्वयंपाकाच्या काही साध्या सवयी नकळत गॅसचा अपव्यय वाढवतात आणि सिलेंडर लवकर रिकामा होण्यास कारणीभूत ठरतात. या सवयी बदलल्यास गॅसची बचत करता येते.

LPG cylinder
LPG New Rules: तुमचं LPG कनेक्शन बंद होऊ शकतं... झटपट करा हे काम; काय आहे सरकारचा नवीन नियम?

स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी सर्व साहित्य तयार ठेवा

भाज्या चिरणे, मसाले काढणे किंवा इतर तयारी करताना गॅस सुरू ठेवला जातो. त्यामुळे गॅस वाया जातो. त्यामुळे गॅस पेटवण्यापूर्वी सर्व साहित्य तयार ठेवा.

भांड्यावर झाकण ठेवून स्वयंपाक करा

दूध गरम करताना किंवा कोणताही पदार्थ शिजवताना झाकण लावा. त्यामुळे उष्णता भांड्यात टिकून राहते आणि अन्न लवकर शिजते.

प्रेशर कुकरचा अधिक वापर करा

प्रेशर कुकरमध्ये वाफ आणि दाबामुळे पदार्थ कमी वेळात शिजतात. त्यामुळे गॅसची बचत होते.

योग्य आकाराचा बर्नर निवडा

लहान भांड्यासाठी मोठा बर्नर वापरल्यास उष्णता बाजूला पसरते आणि गॅस जास्त खर्च होतो. त्यामुळे भांड्याच्या आकारानुसार बर्नर वापरा.

बर्नर नियमित स्वच्छ ठेवा

बर्नरच्या छिद्रांमध्ये अन्नकण अडकले तर ज्वाळा योग्य प्रकारे पेटत नाही. त्यामुळे गॅस पूर्णपणे जळत नाही. दर 10-15 दिवसांनी बर्नर स्वच्छ करा.

सतत मोठ्या आचेचा वापर टाळा

प्रत्येक पदार्थ मोठ्या आचेवर शिजवल्यास गॅसचा वापर वाढतो. उकळी आल्यानंतर आच कमी केल्यास गॅसची बचत होते.

डाळी आणि कडधान्ये आधी भिजवा

भिजवलेल्या डाळी, हरभरे, राजमा इत्यादी लवकर शिजतात. त्यामुळे गॅस कमी खर्च होतो. राजमा आणि छोले 6-8 तास, तर डाळी 30 मिनिटे ते 2 तास आधी भिजवून ठेवा.

गॅस गळतीची नियमित तपासणी करा

अगदी किरकोळ गळतीही कालांतराने मोठ्या प्रमाणात गॅस वाया घालवू शकते. रेग्युलेटर, पाइप आणि जोडांची वेळोवेळी तपासणी करा. साबणाच्या पाण्याने बुडबुडे दिसल्यास गळतीचा संशय येऊ शकतो.

सपाट तळाची भांडी वापरा

वाकडे किंवा उंचवटे असलेल्या तळाच्या भांड्यांमध्ये उष्णता समान पसरत नाही. त्यामुळे अन्न शिजण्यासाठी अधिक वेळ आणि गॅस लागतो.

स्वयंपाकाचे नियोजन करा

वारंवार गॅस सुरू-बंद करण्याऐवजी शक्य असल्यास एकाच वेळी अनेक पदार्थ तयार करा. यामुळे अतिरिक्त गॅस खर्च टाळता येतो.

या गोष्टींकडेही लक्ष द्या

जर तुमचा सिलेंडर पूर्वीपेक्षा खूप लवकर रिकामा होत असेल, तर त्यामागे केवळ वापराच्या सवयीच कारणीभूत नसू शकतात. बर्नरमधील बिघाड, रेग्युलेटरची समस्या किंवा गॅस गळतीही कारण असू शकते. त्यामुळे वेळोवेळी तज्ज्ञ तंत्रज्ञाकडून तपासणी करून घेणे फायदेशीर ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news