Apple Event iPhone 18 Launch: आयफोन १८ आज लाँच होणार; फिचर्स काय, Live Stream कुठे पाहता येईल?

apple event 2026 ist time: भारतीय प्रमाणवेळेनुसार ९ सप्टेंबर रोजी बुधवारी रात्री १०.३० ला सुरू होण्याची शक्यता आहे.
iPhone 18 Launch Update
iPhone 18 Launch Updatepudhari
Published on: 
Updated on: 

iPhone 18 Launch Update: आयफोन प्रेमींसाठी यंदाचे वर्ष हे उत्सुकतेचं राहणार आहे. अॅप्पल आपला नवा फोन लाँच करणार आहे. विशेष म्हणजे आयफोन १८ लाँचभोवती एक रूमर फिरत असून चाहत्यांची फोल्डिंगची प्रतिक्षा आता संपणार असून नवे मॉडेल हे फोल्डिंगमध्ये येण्याची शक्यता आहे.

iPhone 18 Launch Update
Apple CEO salary: ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस यांना किती मिळणार पगार?

अॅप्पलच्या सप्टेंबर महिन्यात वर्षिक कार्यक्रमात नवीन आयफोन १८ लाँच होणार आहे. त्याला त्यांनी सप्राईत अँड शाईन असं नाव दिलं असून हा आयफोन लाँचिंग सोहळा ९ सप्टेंबर रोजी कॅलिफोर्नियामधील अॅप्पल पार्कमध्ये होणार आहे. अॅप्पलचे सीईओ जॉन टेरनस हे याचे प्रेझेंटेशन करणार आहेत. त्यांनी नुकतेच १ सप्टेंबर रोजी आपला पदभार स्विकारला आहे. अॅपल आयफोन १८ च्या लाँचिंगवेळी आपला जुना लाईव्ह इव्हेंट पुन्हा सुरू करण्याची शक्यता आहे. यापूर्वी प्री रेकॉर्डेड प्रेझेंटेशन असयाचे.

iPhone 18 Launch Update
Apple iPhone 18 Launch Event 2026: Appleचा मोठा धमाका! iPhone 18 येणार? भारतात कधी आणि कुठे पाहता येणार LIVE इव्हेंट?

आयफोन १८ लाँच २०२६ कुठं पाहायचा?

तुम्ही आयफोन १८ लाँचिंगचा सोहळा त्यांच्या अधिकृत वेबसाआटवर लाईव्ह स्ट्रीम पाहू शकता. अॅप्पल टीव्ही, अॅप्पल डेव्हलपर अॅप आणि कंपनीच्या युट्यूब चॅनलवर देखील याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. हे शेड्युल भारतीय प्रमाणवेळेनुसार ९ सप्टेंबर रोजी बुधवारी रात्री १०.३० ला सुरू होण्याची शक्यता आहे.

iPhone 18 Launch Update
Apple vs OpenAI | अ‍ॅपल-ओपनएआयमध्ये का जुंपलीय?

iPhone 18 मध्ये काय असणार खास?

सप्टेंबरमध्ये अॅप्पलचा मोठा इव्हेंट असतो. त्यात अॅप्पल आपले अनेक नवे हार्डवेअर प्रोडक्ट लाँच करतो. त्यात सर्वात आकर्षणाचा केंद्रबिंदू हा आयफोनची नवीन सीरिज हा असतो. यंदा कंपनी नवीन श्रेणीतील प्रोडक्ट देखील लाँच करणार आहे. याची घोषणा इव्हेंटच्या लाईव्ह स्ट्रीमिंगवेळी होण्याची शक्यता आहे.

iPhone Ultra - अॅप्पल पहिल्यांदाच आपला फोल्डेबल आयफोन लाँच करण्याची शक्यता आहे. या प्रोडक्टला आयफोन अल्ट्रा किंवा आयफोन फोल्ड असं नाव देण्याची शक्यता आहे. हाच फोन यंदाच्या लाँचिंग इव्हेंटमधील सर्वात मोठा लाँच असणार आहे.

iPhone 18 Launch Update
'Samsung Galaxy S24 Ultra'च्या किमतीत सर्वात मोठी कपात! 58,000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत

बूक स्टाईल आयफोन फोल्ड

या फोनचे डिझाईन हे बूक स्टाईल असण्याची शक्यता वर्तवली आहे. तो नुकतेच लाँच झालेल्या सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ८ सारखाच असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र आयफोन फोल्ड हा जास्त रूंद आणि कमी उंचीचा असेल.

आयफोन अल्ट्रा हा ५.५ इंचाच असण्याची शक्यता आहे. तो अनफोल्ड झाल्यावर ७.८ इंचाचा डिस्प्ले दिसेल. याची किंमत २००० ते २५०० डॉलर पर्यंत असण्याची शक्यता आहे. भारतीय रूपयात याची किंमत १ लाख ९० हजार ते २ लाख ३७ हजारापर्यंत असण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news