कार विकायची आहे, पण फास्टॅगच काय करायच? जाणून घ्या प्रक्रिया

FasTag on cars
FasTag on cars

पुणे: पुढारी वृत्तसेवा

वाहनावर फास्टॅग लावणे आता अनिवार्य आहे. आपल्या कारच्या विंडशील्डवर लावलेल्या फास्टॅगचे अनेक फायदे आहेत. कारण ते कॅशलेस आहे आणि त्यामुळे टोलनाक्यावर वेळ न घालवता, लगेच टोल भरला जातो. त्याचबरोबर मॉलसारख्या ठिकाणी पार्किंगमध्ये "आरएफआयडी"द्वारे पेमेंटची सुविधा देखील मिळते. म्हणजे थोडक्यात काय तर फास्टॅग नेहमी वाहन आणि बँक पेमेंट किंवा डिजिटल पेमेंट अॅपशी जोडलेला असतो. जर तुम्ही तुमची कार विकत असाल तर फास्टॅगच काय करायच? जर कारवर तुमचा फास्टॅग राहिला तर अप्रत्यक्षरित्या कारच्या नव्या मालकाचे टोलचे पैसे तुमच्या खात्यातून भरले जातील. असे होऊ नये, म्हणून आज आम्ही तुम्हाला यासाठीचे उपाय सांगणार आहोत.

तुमचा फास्टॅग रद्द करा

• कारच्या नव्या मालकाकडे चावी सुपूर्द करण्यापूर्वी तुमच्या कारवर लावलेला फास्टॅग रद्द करण्यासाठी योग्य पावले उचलली पाहिजेत. फास्टॅग रद्द करण्याचे विविध मार्ग आहेत. परंतु फास्टॅग रद्द करण्याचा योग्य मार्ग तो कोठून खरेदी केला यावर अवलंबून आहे.                • तुमच्याकडे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAI फास्टॅग असेल, तर NHAI 1033 या कस्टमर केअर नंबरवर कॉल करून फास्टॅग रद्द करण्याची विनंती करू शकतो.

• तुम्ही बँकेकडून फास्टॅग खरेदी केला असेल, तर तुम्ही बँकेच्या वेबसाइटवर किंवा मोबाइलवर अॅपवर लॉग इन करू शकता आणि बँकला फास्टॅग रद्द करण्याची विनंती करू शकता.
• जर तुम्ही फास्टॅग मोबाईल पेमेंट अॅप्लिकेशनद्वारे खरेदी केला असेल, तर तुम्ही त्या अॅपमधील फास्टॅग पर्याय निवडावा. सहसा जेथे पेमेंट हिस्ट्री दिलेली असते, तेथे रद्द करण्याचा पर्याय देखील असतो. तो पर्याय शोधून तुम्ही फास्टॅग रद्द करू शकता.

फास्टॅग ट्रांन्सफर करा

• फास्टॅग वाहनाच्या नव्या मालकाच्या खात्यात ट्रांन्सफर केला जाऊ शकतो. त्यासाठी वरील प्रक्रिया करताना 'रद्द करा' ऐवजी 'ट्रांन्सफर करा' हा पर्याय निवडावा. यासाठी नव्या मालकाचे बँक तपशील देखील आवश्यक असतात.

फास्टॅग फाडला तर?

तुम्हाला असे वाटेल की यावर सोपा उपाय म्हणजे फास्टॅग फाडणे, पण असे केल्याने एक अडचण निर्माण होऊ शकते ती म्हणजे  वाहनाचा नोंदणी क्रमांक फास्टॅगशी जोडलेला असतो. त्यामुळे नवीन मालकाला दुसरा फास्टॅग लावणे शक्य होणार नाही.

• त्यामुळे फास्टॅग रद्द करण्याचा पर्यायच योग्य ठरेल. असे केल्याने आधीचा मालक कोणतेही शुल्क देण्यास जबाबदार असणार नाही आणि नवीन मालक सहजपणे त्याच वाहनाचा नवा फास्टॅग स्वतःच्या बँक खात्याशी लिंक करू शकतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news