पुणे : पुढारी वृत्तसेवा
राज्य परिवहन विभागाने ग्राहकांना त्यांच्या जुन्या गाड्या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बदलण्याचा पर्याय आणला आहे. राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या जुन्या वाहनांना 'ईव्ही'मध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जुन्या पेट्रोल आणि डिझेल वाहनांनचे इलेक्ट्रिक किटसह रेट्रो फिटिंग फक्त अधिकृत केंद्रावरच केले जाणार आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या जुन्या वाहनांना ईव्हीमध्ये रूपांतरित करण्यासाठी इलेक्ट्रिक किट्सच्या उत्पादकांना पॅनेलमध्ये समाविष्ट केले आहे.
येत्या काही दिवसांत आणखी उत्पादकांना पॅनेलमध्ये टाकले जाण्याची शक्यता आहे. ज्या वाहनांचे आयुर्मान रस्त्यांवर चालण्यासाठी निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे, अशा वाहनांच्या मालकांसाठी हा एक उत्तम पर्याय असू शकतो. सध्या दिल्लीच्या रस्त्यावर १० वर्षांपेक्षा जुनी डिझेल वाहने आणि १५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची पेट्रोल वाहने चालवण्यास बंदी आहे
अशा वाहनाच्या मालकाला वाहन भंगार धोरणांतर्गत दुसऱ्या राज्यातील व्यक्तीला ते वाहन भंगारात विकण्याचा पर्याय असतो. तसेच इलेक्ट्रिक वाहनांची चर्चाही जोर धरू लागली आहे. आता नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करणे ही सध्या महागडी बाब आहे आणि मास-मार्केट सेग्मेंटमध्ये पर्याय खूपच मर्यादित आहेत. त्याऐवजी सध्याचे वाहन इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतरित केले जाऊ शकते.
इलेक्ट्रिक किटचा इन्स्टॉलरला इलेक्ट्रिक किटच्या निर्माता किंवा पुरवठादाराने अधिकृत करणे गरजेचे आहे. याशिवाय, वाहनात इलेक्ट्रिक किट बसवता येईल का, याचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी इंस्टॉलरची असते आणि जर ते बसवता येत असेल, तर वर्षातून एकदा अशा वाहनाची फिटनेस चाचणी करता येईल.
मागील अहवालात असे म्हटले होते की दिल्लीत सुमारे 28 लाख पेट्रोलवर चालणारी वाहने आहेत, जी 15 वर्षांपेक्षा जुनी आहेत. डिझेल वाहनांच्या बाबतीत ही संख्या दीड लाख आहे.
दिल्लीच्या रस्त्यांवरून जुनी पेट्रोल आणि डिझेल वाहने हटवण्याच्या मुख्य उद्देश हा वाहनांमधून होणारे विषारी वायूंचे उत्सर्जन कमी करणे हा आहे. पण यामुळे नवीन वाहनांची मागणीही वाढू शकते. इलेक्ट्रिक पॉवरमध्ये रूपांतरित करण्याचा पर्याय असून त्यांची किंमत सुमारे 4 लाख रुपये असू शकते.त्यामुळे ग्रीनघेण्याच्या उद्देशासाठी देखील मदत होऊ शकते.