Google Fitbit Edge: गुगलचा नवा फिटनेस ट्रॅकर 'फिटबिट एज' लाँच; पाहा फीचर्स आणि किंमत

गुगलने आपला नवा फिटनेस ट्रॅकर 'फिटबिट एज' (Fitbit Edge) बाजारात आणला आहे. यामध्ये स्मार्टवॉचसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.
Google Fitbit Edge
Google Fitbit EdgeFile Photo
Published on: 
Updated on: 

Google Fitbit Edge

नवी दिल्ली: गुगलने आपला नवा फिटनेस ट्रॅकर 'फिटबिट एज' (Fitbit Edge) बाजारात आणला आहे. यामध्ये स्मार्टवॉचसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. आकर्षक लुक आणि आरोग्याची अचूक काळजी घेणाऱ्या या डिव्हाइसमध्ये १.३४ इंचांचा AMOLED डिस्प्ले, बिल्ट-इन GPS, हार्ट रेट मॉनिटरिंग आणि ECG यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर हा ट्रॅकर सात दिवसांपर्यंत चालू शकतो.

Google Fitbit Edge ची किंमत किती?

या फिटनेस ट्रॅकरची सुरुवातीची किंमत १७९.९९ डॉलर म्हणजेच सुमारे १७,२०० रुपये आहे. यासोबत लहान आणि मोठ्या आकाराचे सिलिकॉन अ‍ॅक्टिव्ह बँड मिळणार आहेत. हा ट्रॅकर चार रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये मॅट ब्लॅक अ‍ॅल्युमिनियमसह ऑब्सिडियन बँड, सॅटिन सिल्व्हरसह फॉग बँड, सॅटिन पायराइटसह ऑलिव्ह बँड आणि शॅम्पेन गोल्ड अ‍ॅल्युमिनियमसह कॅन्यन बँडचा समावेश आहे. याशिवाय, कंपनीने याचा खास 'स्टीफन करी स्पेशल एडिसन' देखील लाँच केला असून, त्याची किंमत २१९.९९ डॉलर (अंदाजे २१,000 रुपये) आहे.

Google Fitbit Edge
Nicotine gum dangers: एका च्युईंगममुळे शरीरात जाते तब्बल चार सिगारेट इतके निकोटिन

४० हून अधिक स्पोर्ट्स मोड्स आणि हेल्थ फीचर्स

आरोग्य आणि व्यायामाची आवड असणाऱ्यांसाठी यात ४० हून अधिक स्पोर्ट्स मोड्स दिले आहेत. यात ऑटोमॅटिक ॲक्टिव्हिटी रिकग्निशन आणि अल्टीमीटरचा समावेश आहे, जो रनिंग किंवा पायऱ्या चढताना उंचीतील बदल अचूक मोजतो. यात ऑप्टिकल हार्ट रेट मॉनिटर, ईसीजी सेन्सर, SpO2 ट्रॅकिंग आणि स्किन टेम्परेचर मॉनिटरिंग यांसारखी आधुनिक फीचर्स आहेत.

डिस्प्ले

फिटबिट एजमध्ये १.३४ इंच साइजचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 'ऑलवेज-ऑन डिस्प्ले' फिचरला सपोर्ट करतो. गुगलच्या दाव्यानुसार, नव्या ट्रॅकरची स्क्रीन आधीच्या फिटनेस ट्रॅकरच्या तुलनेत ४६ टक्के अधिक व्ह्यूईंग एरिया देते. ट्रॅकरच्याबाजूला एक फिजिकल बटण देण्यात आले आहे. त्याच्या मदतीने वापरकर्ते व्यायामादरम्यान वर्कआउट थांबवू शकतात किंवा पुन्हा सुरू करू शकतात. गॅलिलिओ पोझिशनींगयुक्त बिल्ट-इन जीपीएसमुळे युजर्स स्मार्टफोन जोडल्याशिवायही स्वतःचा रूट आणि ॲक्टिव्हिटी सहज ट्रॅक करू शकतात.

बॅटरी

या डिव्हाइसमध्ये ६५mAh ची रिप्लेसेबल लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर हा ट्रॅकर ७ दिवसांपर्यंत चालतो, असा कंपनीचा दावा आहे. डिव्हाइस पूर्ण चार्ज होण्यासाठी अंदाजे ९० मिनिटे लागतात. केवळ ५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये २४ तास वापरता येऊ शकतो. स्मार्टफोन नोटिफिकेशन, क्विक टेक्स्ट रिप्लाय, म्युझिक कंट्रोल, अलार्म आणि गुगल मॅप्सचे बेसिक गाईडन्स यांसारख्या स्मार्ट फीचर्समुळे हा ट्रॅकर डेली युजसाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे.

Google Fitbit Edge
Old Monk FSSAI: ‘रम’ नको, ‘रम-लाइक’ म्हणा! एफएसएसएआयचा कडक पवित्रा; ‘ओल्ड मंक’ला ५०० कोटींचा फटका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news