New Gen Z Trend Rage Booking: जेन झींचा ऑफिस टेन्शनवर 'रेज बुकिंग'चा नवा फंडा... हा शब्द शोधून कोणी काढला?

एक नवीन संकल्पना Gen Z नी अस्तित्वात आणली आहे. ही संकल्पाना आहे Rage Booking!
New Gen Z Trend Rage Booking
New Gen Z Trend Rage Bookingpudhari photo
Published on
Updated on

New Gen Z Trend Rage Booking: गनरेशन झेडची भाषा अन् त्यांची प्राथमिकता याबाबत सतत चर्चा होत असते. ते प्रत्येक परिस्थितीला एक विशिष्ठ नाव देतात. आता ही Gen Z वर्कफोर्स म्हणून अनेक देशात कार्यरत आहे. तिथल्या त्यांच्या गंमत जमती अन् किस्से आपण सतत ऐकत असतो. तशीच एक नवीन संकल्पना Gen Z नी अस्तित्वात आणली आहे. ही संकल्पाना आहे Rage Booking!

New Gen Z Trend Rage Booking
Gen Z Voters Kolhapur | कोल्हापूर शहरात वाढले चार हजार ‘जेन झी’ मतदार

कल्पना करा की तुम्ही ऑफिसमध्ये बसला आहात आणि दुसऱ्या बाजूने क्लाइंटचा कॉल सुरू आहे. तुमच्यावर डेडलाईनचे प्रेशर आहे. त्यात तुमचा बॉस यावरून सारखं चिक-चिक करत आहे. अशावेळी राग आलेले तुम्ही थेट तुमचा फोन उचलता आणि थेट एखाद्या हिल स्टेशन किंवा नयनरम्य बीचच्या ठिकाणाचे तिकीट बुक करता. तुम्ही जर असं करत असाल तर तुम्ही असे करणारे एकटे नाहीत. सध्याच्या घडीला या रेज बुकिंगचा ट्रेंड चांगलाच वाढला आहे.

New Gen Z Trend Rage Booking
Gen Z Investment: Gen Z तरुणाई नक्की कुठे गुंतवणूक करतेय? जाणून घ्या नवे ट्रेंड्स!

रेज बुकिंग म्हणजे काय?

आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की हे ट्रेन तिकीट बुकिंग, हॉटेल रूम बुकिंग ऐकलं आहे आता हे रेज बुकिंग काय प्रकार आहे.

रेज बुकिंग ही अशीच हवेतून आलेली संकल्पना नाहीये. एका सर्व्हेमध्ये याबाबत धक्कादायक अशी आकडेवारी समोर आली आहे. अमेरिकेतील फेय ट्रॅव्हल्स या ट्रॅव्हल विमा प्लॅटफॉर्मने या रेज बुकिंग शब्दाचा वापर केला होता. त्यांच्या एका सर्व्हेनुसार प्रत्येक तीन व्यक्तीमधील एक व्यक्ती कामाच्या ठिकाणचा तणाव किंवा वर्कप्लेस बर्नआऊटपासून सुटका पाहिजे म्हणून अचानक सुट्टीचं प्लॅनिंग करत आहे.

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रेज बुकिंगचा अर्थ हा ऑफिसच्या तणावाला कंटाळून अचानक ट्रिप प्लॅन करणे. आजच्या घडीला २४ ते ४५ वर्षाचे तरूण व्हेकेशनला जाण्याकडे फक्त एक छंद म्हणून पाहत नाहीत तर रिफ्रेश होण्याचे आणि मानसिक स्थिती पुन्हा चांगली करण्यासाठीचा मार्ग म्हणून याच्याकडे पाहत आहे. ते हा प्रवास मजा म्हणून नाही तर शांततेच्या शोधात करतात.

New Gen Z Trend Rage Booking
Diya Binu: केरळची पहिली 'Gen Z' आणि भारतातील सर्वात तरुण नगरपालिका अध्यक्ष; कोण आहे दिया बिनू!

आकडे काय सांगतात?

भारतातील ट्रॅव्हल मार्केटशी संबंधीत आकडेवारी सांगिते की गेल्या काही काळापासून शेवटच्या क्षणी बुकिंग करण्याचे प्रमाण हे ३० टक्क्यांनी वाढले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोखोंच्या संख्येने फ्लाईट तिकीट हे रात्री ३ ते ४ वाजताच्या सुमारास बुक होत आहेत.

यावेळी मनुष्य गाढ झोपेत असतो किंवा आपल्या करिअर आणि कामाच्या चिंतेत तरी बुडालेला असतो. तरूणांची हीच अस्वस्थता त्यांना थेट एअरपोर्ट किंवा रेल्वे स्टेशनपवर घेऊन जात आहे.

New Gen Z Trend Rage Booking
Rahul Gandhi Republic Day parade: राहुल गांधी प्रजासत्ताक दिनी तिसऱ्या रांगेत... विरोधकांची टीका मात्र प्रोटोकॉल काय सांगतोय?

Gen z अन् मिलेनियल्सच का?

आजकालचे तरूण हे व्हेकेशनला जाण्यासाठी कोणत्या खास कारणाची वाच पाहत नाहीत. त्यांच्यासाठी फिरायला जाणं, ट्रॅव्हल करणं हा फक्त एक छंद नाहीये. त्यांच्यासाठी हा स्वतःला बर्नआऊटपासून वाचवण्याचा एक मार्ग आहे. तज्ज्ञांच्या मते ऑफिसमध्ये सगळ्या गोष्टी बॉसच्या म्हणण्यानुसार सुरू असतात.

त्यामुळे अशा या रेज बुकिंग किंवा ट्रिपचे बुकिंग या तरूणांना त्यांचा त्यांच्या आयुष्यावर अजूनही कंट्रोल आहे याची जाणीव करून देते. ते स्वतः कुठं जायचं आहे याचा निर्णय घेऊ शकतात. ते त्यांना कोणत्या वेळी काय करायचं आहे याचा निर्णय घेता येतो. त्यामुळेच आपल्या मानसिक शांततेसाठी तरूण पिढी सेव्हिंग्ज खर्च करण्यात आणि कर्ज काढून सर्व गोष्टी करण्यात जरा देखील संकोच करत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news