पुढारी वृत्तसेवा
लग्नानंतर नवविवाहित मुलं-मुली गुगलवर नेमकं काय सर्च करतात, याबाबत एका संशोधनातून रंजक माहिती समोर आली आहे.
पतीचे प्रेम कसे मिळवावे?
लग्नानंतर नवऱ्याचे प्रेम आणि लक्ष नेहमी स्वतःकडेच राहावे, अशी प्रत्येक नववधूची इच्छा असते. त्यामुळे पतीला आकर्षित कसे ठेवावे आणि प्रेम कसे टिकवावे, हे शोधण्याकडे महिलांचा मोठा कल असतो.
पतीच्या आवड-निवडी जाणून घेणे
आपल्या पतीला काय आवडते आणि काय नाही, हे जाणून घेण्यासाठी महिला गुगलची मदत घेतात.
पतीचे मन कसे जिंकावे?
लग्नाच्या नवीन बंधनात पतीचे मन कसे जिंकावे, नात्यात कायम गोडवा कसा ठेवावा आणि एकमेकांमधील जवळीक कशी वाढवावी, याचे उपाय नवविवाहिता इंटरनेटवर शोधत असतात.
सासरच्या मंडळींना खूश ठेवणे
सासरच्या लोकांचे मन जिंकणे हा नववधूसाठी महत्त्वाचा टप्पा असतो. छान-छान पदार्थ बनवण्यापासून ते सासू-सासऱ्यांना खूश ठेवण्याचे मार्ग महिला गुगलवर शोधतात.
कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे नियोजन
कौटुंबिक जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे कशा पेलाव्यात, घरातील कामांचे नियोजन कसे करावे आणि वाद टाळून कुटुंब एकत्र कसे ठेवावे, याचे मार्गदर्शनही नवविवाहिता गुगलकडून घेतात.
मुलं काय सर्च करतात?
पत्नीचा मूड कसा सांभाळावा आणि तिला खूश कसे ठेवावे, यासाठी तरूणही गुगलवर सर्च करत असतात.