Kachya Kelichi Bhaji: कच्च्या केळीची भाजी कशी बनवायची? एकदा 'या' पद्धतीने बनवून तर पाहा!

How to make raw banana sabzi: कच्ची केळी ही आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानली जातात. अनेकदा आपण केळीचे वेफर्स आवडीने खातो, पण या केळीची भाजी चवीला तितकीच छान लागते.
Kachya Kelichi Bhaji
Kachya Kelichi Bhajifile photo
Published on
Updated on

Kachya Kelichi Bhaji: कच्ची केळी ही आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानली जातात. अनेकदा आपण केळीचे वेफर्स आवडीने खातो, पण या केळीची भाजी चवीला तितकीच छान लागते. चपातीसोबत किंवा नुसती खायलाही ही भाजी उत्तम पर्याय आहे. आज आपण पाहणार आहोत, पारंपरिक पद्धतीने पण घरगुती मसाल्यांचा वापर करून केलेली कच्च्या केळीची चटपटीत भाजी.

Kachya Kelichi Bhaji
Indori Poha recipe: नाश्त्याला हॉटेलसारखे मऊ आणि चविष्ट 'इंदोरी पोहे' कसे बनवायचे?

साहित्य:

कच्ची केळी: ४ मध्यम आकाराची

कांदा: २ मध्यम (बारीक चिरलेले)

टोमॅटो: २ छोटे (बारीक चिरलेले)

आलं-लसूण पेस्ट: १ मोठा चमचा (जाडसर कुटलेली)

हिरव्या मिरच्या: २-३ (बारीक चिरलेल्या)

सुक्या लाल मिरच्या: २ नगा

शेंगदाण्याचा कूट: पाव वाटी

मसाले: अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धने-जिरे पूड, अर्धा चमचा गरम मसाला.

विशेष चवीसाठी: अर्धा चमचा आमचूर पावडर

तेल किंवा तूप, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर.

कच्च्या केळीची भाजी कशी बनवायची?

१. सर्वप्रथम केळी स्वच्छ धुवून घ्या. केळीचा देठाचा आणि पुढचा भाग सुरीने कापून टाकावा. केळीच्या सालीवर सुरीने उभ्या रेषा पाडून घ्याव्यात, जेणेकरून साल सहज निघते. केळी चिकट असल्याने हाताला थोडे तेल लावल्यास साल काढणे सोपे जाते.

२. सोललेली केळी लगेच पाण्यात टाकावीत, जेणेकरून ती काळी पडणार नाहीत. त्यानंतर केळीच्या पातळ गोल चकत्या करून घ्याव्यात.

३. गॅसवर कढई गरम करून त्यात आवश्यकतेनुसार तेल किंवा तूप घालावे. तेल तापल्यावर त्यात जिरे टाकावे. जिरे छान फुलले की हिरव्या मिरच्या आणि सुक्या लाल मिरच्या घालून परतावे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून तो हलका तांबूस होईपर्यंत परतून घ्यावा.

४. कांदा परतला की त्यात आलं-लसणाची पेस्ट घालून कच्चा वास जाईपर्यंत परतावे. आता त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून तो शिजवून घ्यावा. त्यात हळद, धने-जिरे पूड, गरम मसाला, आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मसाले एकजीव करावेत.

५. मसाल्याला तेल सुटू लागले की त्यात केळीच्या चकत्या आणि शेंगदाण्याचा कूट घालावा. गॅसची फ्लेम मध्यम ठेवून सर्व साहित्य नीट मिसळून घ्यावे. थोडी वाफ धरण्यासाठी कढईवर २-३ मिनिटे झाकण ठेवावे. केळी मऊ झाली की समजावे भाजी तयार आहे.

६. शेवटी भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाजी सर्व्ह करावी.

जर ही भाजी उपवासाला करायची असेल, तर कांदा, लसूण आणि हळद वगळून फक्त तूप, जिरे, हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कूट वापरून ही भाजी बनवता येते. आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस घातल्याने केळीचा चिकटपणा कमी होतो आणि भाजीला छान चटपटीत चव येते.

Kachya Kelichi Bhaji
Kulith soup recipe: प्राजक्ता माळीने सांगितलेली खास रेसिपी; पाहा कुळथाचं सूप कसं बनवायचं?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news