पुणे : पुढारी वृत्तसेवा
महिलांना दररोज पडणारा प्रश्न म्हणजे नाश्त्यासाठी काय बनवायचे. मुलांना रोज काहीतरी वेगळा नाश्ता हवा असतो. पण दररोज वेगळं काय बनवणार? आज आम्ही तुम्हाला एक झटपट होणारी चविष्ट आणि पौष्टिक रोसिपी सांगणार आहोत. ज्यामध्ये कॅलरीज सुद्धा कमी असतील आणि चवही सगळ्यांना आवडेल. नाश्त्याला उपमा सगळेच बनवतात, पण हाच उपमा आपण नविन पध्दतीने बनवणार आहोत, याच नाव आहे सोया चंक्स उपमा. चला तर मग जाणून घेऊया ही सोपी रेसिपी.
सर्विंग्स- 4
कॅलरीज- 65
खाद्यसंस्कृती- भारतीय
सोया चंक्स – 1 कप, रवा – 3 कप, गरम पाणी – 2 कप, तेल – 1 टीस्पून, मोहरी – 1/2 टीस्पून, आल्याचे काप- 1/2 टीस्पून, कढीपत्ता – 4 -5, उडीद डाळ – 1/2 टीस्पून, कांदा बारीक चिरून – 1
टोमॅटो बारीक चिरलेला -1, हिरवी ढोबळी मिरची चिरलेली – 1, मक्याचे दाणे- 1/4 कप, हिरवे वाटाणे – 1/4 कप
हिरव्या मिरचीचे काप चवीनुसार, मीठ – चवीनुसार, गार्निशिंगसाठी कोथिंबीर – १/२ कप
• सोया चंक्स 15 मिनिटे गरम पाण्यात भिजत ठेवा. नंतर हलक्या हातातने दाबून जास्तीचे पाणी काढून टाका.
• सोया ग्रेन्युल्स बनवण्यासाठी सोया चंक्सचे बारीक तुकडे करून गरम तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या आणि वाटीत काढून घ्या
• आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, आले, कढीपत्ता आणि उडीद डाळ टाका आणि 1 मिनिट परतून घ्या. यानंतर, पॅनमध्ये कांदा घाला आणि गुलाबी रंग होईपर्यंत तळा.
• मग त्यामध्ये ढोबळी मिरची, मक्याचे दाणे आणि मटार घालून 5 मिनिटे परतून घ्या. भाज्या जास्त शिजवू नका.
• भाजलेल्या भाज्यांच्या मिश्रणात रवा घालून २-३ मिनिटे परतून घ्या.
• आता यात हिरवी मिरची आणि टोमॅटो घालून 1 मिनिट परतून घ्या. मग यात गरम पाणी घाला, चवीनुसार मीठ घाला आणि पूर्ण पाणी शोषले जाईपर्यंत शिजवा.
• सर्व्ह करताना यात कोथिंबीर घाला आणि नारळ किंवा शेंगदाणा चटणीबरोबर गरमागरम सर्व्ह करा. चवीसाठी तुम्ही यावर शेव देखील घालू शकता.
तयार आहे आपला चविष्ट सोया चंक्स रवा उपमा केवळ 15 मिनिटांत. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा.