Personality test: तुम्ही मूठ कशी आवळता? यावरून ५ सेकंदांत ओळखा खरा स्वभाव 

या व्यक्तिमत्व चाचणीनुसार, तुम्ही दररोज सहजपणे मूठ कशी आवळता, यावरून खरा स्वभाव आणि तणाव व चिंतेचा सामना करण्याची तुमची पद्धत अवघ्या काही सेकंदांत स्पष्ट होऊ शकते.
Personality test
Personality testFile Photo
Published on
Updated on

Personality test:

नवी दिल्ली: 'व्यक्तिमत्व चाचणी' या नावातच दडल्याप्रमाणे, या साध्या आणि मजेशीर चाचण्या असतात ज्या एखाद्या व्यक्तीचा फारसा माहीत नसलेला आणि खरा स्वभाव काही सेकंदात समजू शकतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका व्यक्तिमत्त्व चाचणीची चर्चा सुरू आहे. या चाचणीनुसार, तुम्ही दररोज सहजपणे मूठ कशी आवळता, यावरून खरा स्वभाव आणि तणाव व चिंतेचा सामना करण्याची तुमची पद्धत अवघ्या काही सेकंदांत स्पष्ट होऊ शकते.

सोशल मीडियावर मरिना न्युरालियान यांनी ही मानसशास्त्रीय चाचणी शेअर केली आहे. मरिना यांच्या मते, ही चाचणी आपल्या शरीराच्या अनैच्छिक हालचालींवर आधारित आहे. आपण नकळतपणे ज्या शारीरिक हालचाली करतो, त्यातून आपले अंतर्मन आणि सुप्त भावना व्यक्त होत असतात. न्यूरोसायकोलॉजीनुसार, आपण आवळलेली मूठ ही केवळ एक शारीरिक हालचाल नसून, आपला मेंदू माहितीवर कशी प्रक्रिया करतो, ताणतणावाविरुद्ध कसा बचाव करतो आणि सभोवतालच्या जगाशी कसा संवाद साधतो, याचे ते एक प्रतिबिंब असते.

Personality test
Psychology of luck: काही लोकांना वारंवार नशीबाची साथ का मिळते?

तुमच्या मुठीची स्थिती तुमच्याबद्दल काय सांगते? पाहा ३ प्रकार:

१. अंगठा बाहेर आणि वरच्या दिशेने असल्यास

जर तुम्ही मूठ आवळताना अंगठा बाहेरच्या बाजूला आणि वरच्या दिशेने ठेवत असाल, तर तुमचा मेंदू नैसर्गिकरीत्या समस्या सोडवण्यात आणि नेतृत्व करण्यात कुशल असतो. असे लोक सहजतेने जबाबदारी स्वीकारतात; मात्र अनेकदा यामुळे त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण येतो. सतत काम, पैसा आणि भविष्याचा विचार केल्यामुळे यांची मज्जासंस्था नेहमी अलर्ट मोडवर राहते. परिणामी, अशा व्यक्तींमध्ये 'परफेक्शनिझम' (प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करण्याची वृत्ती) आणि 'मल्टीटास्किंग' (एकाच वेळी अनेक कामे करण्याची क्षमता) दिसून येते.

२. जर तुम्ही अंगठा बाहेरच्या बाजूला ठेवून तो बोटांभोवती गुंडाळला असेल तर...

जर तुम्ही अंगठा बाहेरच्या बाजूला ठेवून तो बोटांभोवती गुंडाळला असल्यास तुमच्यामध्ये खोलवर नातेसंबंध जपण्याची क्षमता असते. अशा व्यक्ती इतरांशी अत्यंत आपुलकीचे नातेसंबंध प्रस्थापित करू शकतात. मात्र, इतरांच्या भावना स्वतःमध्ये शोषून घेण्याच्या वृत्तीमुळे त्यांना मानसिक थकवा जाणवू शकतो. मेंदूच्या भावनिक केंद्रांवर अतिरिक्त ताण आल्याने अशा लोकांमध्ये चिंता आणि निद्रानाशाची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे या व्यक्तींनी वैयक्तिक सीमा जपणे आवश्यक मानले जाते.

३. जर तुम्ही तुमचा अंगठा मुठीत दुमडलात तर...

जर तुम्ही अंगठा मुठीच्या आत ठेवून बोटे वरून बंद करत असाल, तर तुमच्याकडे प्रचंड आंतरिक क्षमता असते; मात्र तुमचा स्वभाव अंतर्मुख असतो. अशा व्यक्तींचा मेंदू ताणतणावाबाबत अतिसंवेदनशील असतो. स्वतःचे कौशल्य किंवा गुणवत्ता सहजासहजी जगासमोर न आणणे ही त्यांच्या मज्जासंस्थेने स्वसंरक्षणासाठी विकसित केलेली एक पद्धत असते. यांचे आंतरिक जग अत्यंत समृद्ध असते, मात्र स्वतःला व्यक्त करण्यासाठी त्यांना सुरक्षित आणि विश्वासू वातावरणाची गरज असते.

Personality test
Psychology: प्रार्थना करताना अचानक रडू का येतं? जाणून घ्या ५ कारणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news