Elon Musk X Platform: मस्क यांचे 'एक्स' अल्पवयीन मुलांना Adult Content च्या जाळ्यात ढकलंतय, अभ्यासात काय आलं समोर?

Elon Musk X Platform
Elon Musk X Platformpudhari
Published on
Updated on

Elon Musk X Platform Controversy: युनायटेड किंगडममध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार एलन मस्क यांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स हा १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलांना लैंगिकदृष्ट्या संवेदनशील कंटेटेला एक्सपोज करत आहे. हे संशोधन सेंटर फॉर काऊंटरिंग डिजीटल हेट (CCDH) या संस्थेनं केलं होतं. त्यांनी अल्पवयीन मुले या प्लॅटफॉर्मवर कसे इंटरॅक्ट करतात आणि त्यांना कोणता कंटेट रेकमेंड केला जातो याचा अभ्यास करण्यात आला.

Elon Musk X Platform
Social Media Post Block: संरक्षण, परराष्ट्र अन् गृह मंत्रालयही करू शकणार सोशल मीडिया पोस्ट ब्लॉक.. सरकार मोठ्या तयारीत

संशोधनात काय आढळलं?

संशोधकांनी तोन १३ वर्षाचे वापरकर्ते आहोत असं भासवणारे अकाऊंट उघडली होती. हे या प्लॅटफॉर्मवर लॉग इन करण्यासाठीचे किमान वय आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार त्यांनी नेहमी सर्च होणारे s*x आणि p**n या टर्म्सचा वापर केला.

त्यांना असं आढळून आलं की दहापैकी आठ सर्चमध्ये लैंगिक कृत्य करताना, नग्न आणि त्या संदर्भातील कंटेट समोर आला होता. एवढंच नाही तर एक्स प्लॅटफॉर्मचे रेकमेंडेशन सिस्टम देखील अशाच पद्धतीचा कंटेट अतिरिक्त सर्च न करता समोर आणत होती. फॉर यू फीडमध्ये जवळापस ३०.५ टक्के पोस्ट या उत्तेजनात्मक मटेरियलचा कंटेट दाखवणारे अकाऊंट होते. यात लैंगिक कृत्य असणारे फोटो व्हिडिओ विशेष करून यात अल्पवयीन मुलांचा देखील समावेश असलेला कंटेट दाखवत होते.

Elon Musk X Platform
Australia Social Media Ban |१६ वर्षांखालील मुलांवरील सोशल मीडिया बंदीचे कंपन्यांकडून उल्लंघन : नव्या रिपोर्टमधून माहिती उघड

डिफॉल्ट सेटिंग बदलता येतं

या अहवालात किशोरवयीन मुलांसाठी मुलांबाबतच्या कंटेट नियंत्रणासाठी असलेल्या उपाययोजनांमध्ये मोठे गॅप्स असल्याचं दिसून आलं आहे. १८ वर्षाखालील युजर्ससाठी बाय डिफॉल्ट ते जे अकाऊंट फॉलो करतात त्यांचाच कंटेट दाखवण्याचे सेटिंग आहे. मात्र युजर हे सेटिंग बदलू शकतो.

अभ्यासात असंही दिसून आलं आहे की, एकदा का हे डिफॉल्ट सेटिंग बदलले की त्यांना अडल्ट कंटेटचे मेसेज देखील मिळतात. एकदा तर १३ वर्षाच्या मुलीच्या नावाने उघडलेल्या अकाऊंटवरून एक पुरूष हस्तमैथून करत असलेला व्हिडिओ दिसत होता. दुसऱ्या एका मेसेजमध्ये अश्लील फोटो आणि अशा प्रकारचा कंटेट ऑफर करणारे फोटो आले होते.

Elon Musk X Platform
Algorithm | ‘विघातक अल्गोरिदम’ला दणका

कमकुवत सुरक्षा

CCDH ने आपल्या अहवालात सांगितलं की अल्पवयीन मुलांना अडल्ट कंटेटचे एक्सपोजर हे एक्स प्लॅटफॉर्मच्या अल्गोगिदमचा भाग आहे. त्यासाठीचे सुरक्षा कवच कमकुवत आहे. यामुळं अल्पवयीन मुलांबाबतचा धोका वाढतोय आणि ऑनलाईन सेफ्टी अॅक्टचे उल्लंघन देखील होऊ सकते. या कलमानुसार या प्लॅटफॉर्मनी लहान मुले अशा प्रकारचा धोकादायक कंटेट अॅक्सेस करू शकणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news