Campus To Career: 'पुढारी'चे बारावीनंतरचे कॅम्पस टू करिअर 6 जूनपासून; सेमिनारमध्ये सहभागी कसे व्हाल?

Career guidance in marathi: CET, NEET व प्रवेश प्रक्रियेवर 6 ते 29 जूनदरम्यान तज्ज्ञांचे सविस्तर मार्गदर्शन सेमिनार
Campus to Career
Campus to CareerPudhari
Published on
Updated on

Career guidance in marathi Pudhari Initiative for student

पुणे: बारावीनंतर योग्य करिअरची निवड, प्रवेश परीक्षा, कॉलेज निवड आणि प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर अचूक मार्गदर्शनाची संधी आता एकाच व्यासपीठावर मिळणार आहे. विद्यार्थ्यांची मोठी गरज ओळखून ‌‘पुढारी माध्यम समूहा‌’तर्फे ‌‘पुढारी कॅम्पस टू करिअर‌’ हा विशेष उपक्रम आयोजित केला जात आहे. या विशेष उपक्रमांतर्गत बारावीनंतर करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी 6 ते 29 जून यादरम्यान सीईटी, नीट व विविध पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेवरील सविस्तर मार्गदर्शन सेमिनार घेतले जाणार आहे.

Campus to Career
Pune Rain Alert: पुण्यात मुसळधार पावसाचा दिलासा; तापमानात तब्बल 7 अंशांची घसरण

बारावीच्या विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरच्या संधींबाबत संभ्रम असतो. कोणत्या कॉलेजला कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा, यासंदर्भात माहितीचा अभाव असतो. शैक्षणिक क्षेत्रात उपलब्ध असलेल्या नवीन संधींची माहिती नसते. त्यामुळे बारावीनंतर करिअर निवडताना होणाऱ्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे नुकसान होते. ते होऊ नये म्हणून ‌‘पुढारी कॅम्पस टू करिअर‌’ या चर्चासत्रात सहभागी होऊन मोफत मार्गदर्शन घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून योग्य कोर्सची निवड व योग्य करिअरची दिशा निवडण्याचा मार्ग सापडणार आहे. ‌‘करिअर निवडीसाठी योग्य मार्गदर्शन‌’ हा या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग असून विद्यार्थ्यांची आवड, क्षमता, शैक्षणिक पार्श्वभूमी आणि भविष्यातील संधी यांचा विचार करून तज्ज्ञांकडून वैयक्तिक मार्गदर्शन दिले जाणार आहे. यामध्ये प्रवेश प्रक्रिया नेमकी किती फेऱ्यांमध्ये पार पडणार आहे, त्यासाठी कटऑफ किती असेल, कॉलेज निवडताना बेटरमेंट आणि फ्रीज यांसारख्या पर्यायांचे सविस्तर स्पष्टीकरण दिले जाणार आहे.

Campus to Career
Pune Free Hospital Beds: पुण्यात गरीबांसाठीचे मोफत बेड वापराविना; खासगी रुग्णालयांच्या योजनेवर प्रश्नचिन्ह

याशिवाय खासगी विद्यापीठे, डीम्ड विद्यापीठे आणि स्वायत्त महाविद्यालयांसाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षा, त्यांची प्रक्रिया आणि संधी याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती दिली जाणार आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय, बी. फार्मसी, व्यवस्थापन तसेच इतर सर्व पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा असेल, तर नेमकी प्रक्रिया काय आहे याची माहिती अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितली जाणार आहे. तसेच शासन व खासगी शिष्यवृत्ती योजना तसेच शैक्षणिक कर्ज मिळविण्याची प्रक्रिया यावरही सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमात बँकांचा सहभाग असल्याने कर्ज प्रक्रियेसही मदत मिळू शकेल. सर्व प्रवेश प्रक्रियांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, त्यांची अचूकता, तपासणी आणि वेळेत सादरीकरण यासाठीही विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन मिळणार आहे.

Campus to Career
Pune Crime: पुण्यात पत्नीच्या डोक्यात सिलिंडर मारून खून; आरोपी पती स्वतःच पोलिस ठाण्यात हजर

या संपूर्ण प्रक्रियेसाठी अनुभवी तज्ज्ञ, शिक्षक, करिअर कौन्सिलर्स आणि प्रवेश मार्गदर्शक उपलब्ध असतील. स्पर्धात्मक प्रवेश प्रक्रियेच्या काळात योग्य माहिती आणि योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने ‌‘पुढारी कॅम्पस टू करिअर‌’अंतर्गत आयोजित हे सेमिनार करिअर घडविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी निर्णायक ठरणार आहेत. प्रवेश प्रक्रियेच्या काळात विद्यार्थ्यांची अनेकदा फसवणूक होण्याची शक्यता असते. परंतु ही फसवणूक टाळण्यासाठी आणि खरेखुरे मार्गदर्शन मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना हा उपक्रम एक सुवर्णसंधी ठरणार आहे.

‌‘पुढारी कॅम्पस टू करिअर‌’: नेमके काय मिळेल?

  • बारावीनंतर करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी संपूर्ण प्रवेश मार्गदर्शन

  • इंजिनिअरिंग सीईटी, नीट, बी. फार्मसी, मॅनेजमेंटसह सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठीप्रक्रिया समजावून देणार

  • करिअर निवडीसाठी तज्ज्ञांकडून वैयक्तिक मार्गदर्शन

  • सीईटी व नीट परीक्षा तसेच प्रवेश फेऱ्यांसाठी स्टेप बाय स्टेप माहिती

  • खासगी, डीम्ड विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षांची माहिती

  • शासन व खासगी शिष्यवृत्ती योजनांची सविस्तर माहिती

  • शैक्षणिक कर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन

  • प्रवेशासाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची तपासणी व मदत

  • अपार आयडी तयार करण्यासाठी प्रत्यक्ष सहाय्य

नोंदणीसाठी खालील वेबसाईटवर क्लिक करा (How To Register Online)

https://pudhari.campusdekho.ai/

अधिक माहितीसाठी संपर्क: 9570017003

सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी...

  • विद्यार्थ्यांनी व पालकांनी नोंदणी करणे आवश्यक.

  • पुढारी कार्यालयात उपलब्ध असलेला फॉर्म भरून देता येईल.

  • https://pudhari.campusdekho.ai/ या लिंकवर क्लिक करुन ऑनलाईन नोंदणी करता येईल.

  • सेमिनारमध्ये सहभागी विद्यार्थ्यांपैकी निवडक विद्यार्थ्यांना मिळणार नामांकित विद्यापीठांमध्ये कॅम्पस भेटीची सुवर्णसंधी.

Campus to Career
Pune Water Crisis: पुण्याच्या पाणीपुरवठ्याचे तीन तेरा! 77 लाख लोकांसाठी पाणी अपुरे

येथे होणार सेमिनार

  • कोल्हापूर: 6 जून

  • बिद्री: 7 जून

  • गडहिंग्लज: 8 जून

  • इस्लामपूर: 12 जून

  • सांगली: 13 जून

  • कराड :14 जून

  • वाई: 19 जून

  • सातारा: 20 जून

  • बारामती: 21 जून

  • इंदापूर: 22 जून

  • अहिल्यानगर: 26 जून

  • छत्रपती संभाजीनगर: 27 जून

  • श्रीरामपूर: 28 जून

  • नाशिक: 29 जून

‌‘पुढारी कॅम्पस टू करिअर‌’ हा उपक्रम विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी खूपच उपयुक्त व मार्गदर्शक ठरणारा आहे. बारावीनंतर काय करावे, हे विद्यार्थ्यांना नेमकेपणाने समजत नसते. पालकांनी पाहिलेली स्वप्ने, त्यांच्या इच्छा-आकांक्षांची पूर्तता करण्याच्या दृष्टीनेच तो आपल्या करिअरची दिशा निश्चित करीत असतो. परंतु, अभ्यासाची ही शाखा, हा मार्ग आपल्याला खरोखरीच पेलवेल का, त्यासाठी कोणत्या परीक्षा द्याव्या लागतील, त्यांची तयारी कशी करावी, असे अनेक प्रश्न त्यांच्यापुढे व त्यांच्या पालकांपुढे असतात. दै. ‌‘पुढारी‌’चा ‌‘पुढारी कॅम्पस टू करिअर‌’ हा उपक्रम अशा विद्यार्थी व पालकांसाठी उपयुक्त व मार्गदर्शक ठरणार आहे. सीईटी, नीट, विविध पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया याविषयीचे सविस्तर मार्गदर्शन त्यातून मिळणार आहे. अशा प्रकारच्या मार्गदर्शक व उपयुक्त उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल ‌‘पुढारी माध्यम समूहा‌’ला शुभेच्छा.

डॉ. स्मितादेवी जाधव, प्र-कुलगुरू, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ

बारावीनंतर कोणत्या विद्याशाखेत प्रवेश घ्यावा, तो कसा घ्यावा, त्यासाठी कधी, केव्हा व कुठे अर्ज भरावेत याबाबत बहुसंख्य विद्यार्थी व त्यांचे पालक अनभिज्ञ असतात. अशा पालकांना सहाय्यभूत ठरेल असाच उपक्रम ‌‘पुढारी माध्यम समूहा‌’ने आयोजित केला आहे. या उपक्रमाद्वारे बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय, बी. फार्मसी, व्यवस्थापन तसेच इतर विविध पदवी अभ्यासक्रमांसाठी लागणारी प्रवेश प्रक्रिया तज्ज्ञांद्वारे सोप्या भाषेत समजावून देण्याचे ‌‘पुढारी माध्यम समूहा‌’ने ठरविले आहे. त्यामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांची मोठीच सोय होणार आहे. अशा प्रकारचा उपक्रम आयोजित केल्याबद्दल ‌‘पुढारी माध्यम समूहा‌’ला खूप खूप शुभेच्छा.

ज्ञानेश्वर लांडगे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड एज्यु. ट्रस्ट

बारावीनंतर करिअरच्या वाटा निवडण्याच्या दृष्टीने ‌‘पुढारी माध्यम समूहा‌’ने आयोजित केलेला ‌‘पुढारी कॅम्पस टू करिअर‌’ हा उपक्रम अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरणार आहे. विद्यार्थ्यांची आवड, क्षमता, शैक्षणिक पार्श्वभूमी आणि भविष्यातील संधी, यांचा साकल्याने विचार करून त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा ‌‘पुढारी माध्यम समूहा‌’चा मानस आहे. विद्यार्थी व त्यांच्या पालकांना तो निश्चितच मार्गदर्शक ठरेल, अशी खात्री वाटते. ‌‘पुढारी माध्यम समूहा‌’च्या या उपक्रमाला खूप साऱ्या शुभेच्छा.

भरत अग्रवाल, अध्यक्ष, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news