सेवाव्रती करिअर वाट | पुढारी

सेवाव्रती करिअर वाट

एखाद्या विशिष्ट सेवेचे ध्येय मनात ठेवले असेल तर ते ध्येय पूर्ण करण्यासाठी संस्था उभारली जाते, ती अर्थातच बिगर सरकारी असते.
एखादी सामाजिक समस्या डोळ्यासमोर ठेवून ही संस्था कार्य करते. अशा बिगर सरकारी संघटनेत काम करून समाजसेवेची आस आपण करिअर रूपाने पूर्ण करू शकतो. आवडत्या क्षेत्रात करिअर घडवता येते म्हणून मानसिक समाधानही मिळते.

बिगर सरकारी संघटना अर्थात एनजीओ स्थापन करताना एक विशिष्ट सामाजिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेले असते. समाजातील काही समस्या सोडवण्यासाठी आणि काही क्षेत्रांचा विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील राहण्यासाठी या बिगर सरकारी संघटना अर्थात एनजीओ प्रयत्नशील असतात. बिगर सरकारी संघटना या विविध क्षेत्रांत कार्यरत असतात. जसे शेती, शिक्षण, पर्यावरण, संस्कृती, मानवाधिकार, आरोग्य, महिलांच्या समस्या, बालविकास आदी कोणत्याही क्षेत्राची निवड कामासाठी करू शकतो.

पुणे : पीएमपी चालकाच्या खूनाचा छडा चौघे जेरबंद

संबंधित बातम्या

एनजीओ हे एक असे क्षेत्र आहे, जिथे मानसिक समाधान आणि प्रतिष्ठा दोन्ही गोष्टी मिळू शकतात. एनजीओ या क्षेत्राला आता खूप प्रतिष्ठा आणि वलय लाभते आहे.

पूर्वी स्वतःचा पैसा, संसाधने, समाजाकडून मिळणारी मदत, दान यांच्यावर अवलंबून राहून समाजसेवा केली जात असे. संघटना चालवल्या जात असत. सध्याच्या एनजीओ या रोजगार संधी देऊ करतात. इतर क्षेत्रांच्या तुलनेत एनजीओमध्ये वेतनही चांगले मिळू शकते. एखाद्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील एनजीओमध्ये नोकरी मिळाली तर करिअर उत्तम आकार घेऊ शकते आणि समाजासाठी कार्यरत राहिल्याचे समाधानही मिळतेच.

अर्थात या क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी शिक्षणासह समाजसेवेची, समाजहिताची भावना असणेही महत्त्वाचे आहे. ज्या व्यक्‍ती सामाजिक समस्यांविषयी संवेदनशील असतात, सामाजिक प्रश्‍नांच्या विविध पैलूंविषयी आस्था, निष्ठा, कामाप्रती आस्था असणार्‍या व्यक्‍तींना या क्षेत्रामध्ये खूप वाव आहे.

* एनजीओमधील करिअर विस्तार

आपल्या देशात सध्या सक्रिय असलेल्या एनजीओंची संख्या 33 लाखांच्या आसपास असल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे. सुमारे 365 भारतीयांपाठी एक एनजीओ आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक एनजीओ आहेत सुमारे 4.8 लाख. त्यानंतर दुसर्‍या क्रमांकावर आहे तो आंध्र प्रदेश. तिथे 4.6 लाख एनजीओ आहेत. उत्तर प्रदेशात 4.3 लाख एनजीओ आहेत.

केरळमध्ये 3.3 लाख एनजीओ आहेत. कर्नाटकात 1.9 लाख, गुजरात आणि पश्‍चिम बंगालमध्ये प्रत्येकी 1.7 लाख, तामिळनाडूमध्ये 1.4 लाख, ओडिशामध्ये 1.3 लाख तसेच राजस्थानमध्येही 1 लाख एनजीओ सक्रिय आहेत. इतरही राज्यात मोठ्या प्रमाणावर एनजीओ काम करत आहेत.

जगभरात भारतातच सर्वाधिक एनजीए सक्रिय आहेत. दान, सहकारी संस्था आणि विविध फंडिंग एजन्सी यांच्याकडून या बिगर सरकारी संघटनांना अब्जावधी रुपये मिळतात.

एनजीओची देशातील व्यापकता मोठी आहे. देशातील अनेक संस्था, विद्यापीठे आहेत, जिथे एनजीओ किंवा बिगर सरकारी संघटना व्यवस्थापन असे अभ्यासक्रम चालवले जातात. 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण पदवीधारक विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. अनुभवी एनजीओ व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ता आणि स्वयंसेवक देखील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतात. या अभ्यासात काही विशिष्ट विषयांचे ज्ञान दिले जाते.

त्यामध्ये सामाजिक विकास, सामाजिक उद्योग, जागतिक प्रश्‍नांची समज, पर्यावरणाचे शिक्षण, ज्ञान, माहिती व्यवस्थापन, प्रशासकीय आणि आर्थिक व्यवस्थापन, नेतृत्व क्षमता आदींचे सखोल ज्ञान दिले जाते. एनजीओ चालवण्यासाठी विशेष शैक्षणिक योग्यता अनिवार्य नाही. परंतु कार्यकुशलता, व्यवस्थापन आदींचा विचार करता विशेषतः नोकरीच्या संधींच्या संदर्भात तर एनजीओ व्यवस्थापनाशी निगडित अभ्यासक्रम पूर्ण केल्यास त्याचा फायदा होतो.

एनजीओमध्ये उत्तम वेतन मिळत असले तरीही सामाजिक प्रश्‍नांची जाण आणि समाजासाठी काही ठोस कऱण्याची तळमळ असणेही महत्त्वाचे असते. त्यामुळे दोन्ही गोष्टींचा मेळ घालून मानसिक समाधान आणि करिअर दोन्ही साधता येईल.

Back to top button