‘पुढारी’ एज्यु-दिशा : डॉ. पी. एस. पाटील यांचे व्याख्यान पहा लाईव्ह | पुढारी

‘पुढारी’ एज्यु-दिशा : डॉ. पी. एस. पाटील यांचे व्याख्यान पहा लाईव्ह

पुढारी ऑनलाईन डेस्क : संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत ‘पुढारी’ एज्यु-दिशा ऑनलाइन 2021 हे शैक्षणिक प्रदर्शन आणि वेबिनार मार्गदर्शनाची गुरुकिल्लीच ठरत आहे. ‘पुढारी’ एज्यु-दिशा प्रदर्शनात आज १० ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता डॉ. पी. एस. पाटील (प्र.कुलगुरु शिवाजी विद्‍यापीठ ) यांचे ‘नॅनो टेक्‍नॉलॉजी : नव्‍या युगाचे तंत्रज्ञान’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

दहावी-बारावीनंतर नेमके कोणते करिअर निवडायचे आणि त्यासाठी मार्गदर्शन कोण करणार, या संभ्रमात असलेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी ‘पुढारी’ एज्यु-दिशा ऑनलाइन 2021 हे शैक्षणिक प्रदर्शन आणि वेबिनार मार्गदर्शनाची गुरुकिल्लीच ठरत आहे.
एज्यु-दिशा प्रदर्शन करिअरसाठी ठरतेय गुरुकिल्ली

विद्यार्थ्यांना एकाच व्यासपीठावर करिअर घडविण्यासाठीचे मार्गदर्शन आणि त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम शिकविणार्‍या शैक्षणिक संस्था यांची ओळख होत आहे. त्यामुळे प्रदर्शनाला विद्यार्थी आणि पालकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. प्रदर्शनाचे सहयोगी प्रायोजक एमआयटी-एडीटी युनिव्हर्सिटी पुणे, तर सहप्रायोजक डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ पुणे व पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट पुणे हे आहेत.

प्रदर्शनाच्या माध्यमातून शैक्षणिक करिअरचा महत्त्वाचा प्रश्न सुटत असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी प्रदर्शनाचा कालावधी वाढविण्याची मागणी केली होती. त्यांच्या आग्रहास्तव १० ऑगस्टपर्यंत ११ ते सायंकाळी ६ या वेळेत सर्वांसाठी हे प्रदर्शन विनामूल्य असणार आहे.

असे पाहता येईल एज्यु-दिशा प्रदर्शन

प्रदर्शनात दरवर्षीप्रमाणे निरनिराळ्या विद्या शाखांची 35 हून अधिक दालने आहेत. www.pudhariexpo.com या वेबसाइटवर क्लिक केल्यानंतर प्रदर्शनात सहभागी होता येणार आहे. यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर प्रदर्शन हॉल व लेक्चर हॉल, असे दोन पर्याय असतील. यात प्रदर्शन हॉलमध्ये शैक्षणिक संस्थांचे स्टॉल दिसतील. त्यामध्ये विविध शिक्षण संस्थांची माहिती, व्हिडीओ तसेच इतर माहिती मिळेल. त्याचबरोबर संबंधित शिक्षण संस्थेस ऑडिओ व व्हिडीओ कॉल करता येणार आहे.

पहा व्हिडीओ : प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळतंच : विश्वास नांगरे -पाटील

Back to top button