

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गुळवेवस्ती, भोसरी येथे एका अनोळखी तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला.
सोमवारी (दि. १७) रात्री ही घटना उघडकीस आली. हा प्रकार ताजा असताना आज मावळ तालुक्यातील सांगावडे येथे आणखी एका पंचवीस वर्षीय तरुणाचा मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील सांगावडे गावच्या हद्दीत एका पडक्या खोलीमध्ये पंचवीस वर्षीय तरुणाचा मृतदेह पडल्याची माहीती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
त्यावेळी पोलिसांना मृताच्या अंगावर खरचटल्याच्या खुणा दिसून आल्या. तसेच, बाजूच्या रस्त्यावरील मातीवर फरफटल्याचे निशाण दिसून आले.
त्यामुळे आरोपींनी तरुणाचा खून केल्यानंतर मृतदेह सांगावडे गावात फेकून दिला असण्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. शिरगाव पोलिस तपास करीत आहेत.