Criminal Caught By Mistake | तो एक धागा... जो बनला फास!

Crime Detection | "गुन्हेगारीतील सराईतपणा फसवतो; जगमोहनच्या छोट्याशा चुकेमुळे उघडकीस आली हत्या"
Criminal Caught By Mistake
Murder Case InvestigationFile Photo
Published on
Updated on
Summary

कितीही सराईत गुन्हेगार असला, तरी त्याच्या हातून छोटीशी का हाईना चूक होते आणि ही चूकच पोलिसांच्या पथ्यावर पडते. शवविच्छेदनाच्या कामात अत्यंत निष्णात असलेल्या जगमोहनने छायाचा खून करून तिच्या ओळखीची सगळी नामोनिशाण मिटवून टाकली; पण त्याच्या हातूनसुद्धा एक चूक झालीच आणि ही चूक त्याच्यासाठी कारागृहाचे दरवाजे उघडणारी ठरली, त्याची ही कहाणी...

सुनील कदम

जगमोहन राठोड हा नागपूर शहराच्या एका उपनगरात आपली बायको आणि दोन मुलांसह राहत होता. नागपूरच्या मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात जगमोहन हा शवविच्छेदनाचे काम करायचा. दिवसभरात साधारणत: चार ते पाच मृतदेहाचे त्याला विच्छेदन करायला लागायचे. शवविच्छेदनानंतर वेगवेगळ्या कारणांनी संबंधिताचे नातेवाईक जगमोहनला हजार-पाचशे रुपये द्यायचे शिवाय सरकारी पगार होताच. त्यामुळे जगमोहनला कधी पैशाची कमतरता भासली नाही; मात्र शवविच्छेदनाच्या कामामुळे त्याला दारू पिण्याचे जबरदस्त व्यसन व्यसन लागले होते. दर तास-दोन तासांनी एखादी क्वाटर रिचवल्याशिवाय त्याला चैन पडायचे नाही. त्यासाठी या शासकीय रुग्णालयापासून जवळच असलेल्या एका देशी दारू दुकानात तो दारू पिण्यासाठी जायचा. याच ठिकाणी त्याची छाया नावाच्या महिलेशी ओळख झाली. छाया हिलासुद्धा दारू पिण्याचे व्यसन असल्यामुळे तिच्या सासरच्या आणि माहेरच्याही लोकांनी तिच्याशी संबंध तोडून टाकले होते. त्यामुळे ती तशी विनापाशच होती.

जगमोहनची आणि छायाची ओळख झाल्यानंतर छायाचा दारूचा खर्च जगमोहनच भागवू लागला. त्यामुळे त्यांच्यात हळूहळू अनैतिक संबंध निर्माण झाले. आपल्या कुटुंबीयांना याचा थांगपत्ता लागू नये म्हणून जगमोहनने छायाला शहराच्या दुसर्‍या टोकाला एका भाड्याच्या घरात नेवून ठेवले. हा दुसरा घरोबा झाल्यानंतर हळूहळू जगमोहनचे आपल्या घराकडे दुर्लक्ष होऊ लागले. चार-चार दिवस तो आपल्या घराकडेच जात नसे. या काळात त्याचा आणि छायाचा एकमेकांसोबत दारू पिऊन नुसता धांगडधिंगा चालू असायचा. राहण्या-खाण्यासह दारूचीही फुकटात सोय होत असल्यामुळे छाया जगमोहनला सोडायला तयार नव्हती आणि ऐन उतारवयात एक तरुण बाई जीवनात आल्यामुळे जगमोहनही हळूहळू तिच्यात गुंतत चालला होता. होता होता जगमोहनच्या या लफड्याची बातमी जगमोहनच्या बायकोच्या कानावर गेली आणि दररोज उठून भांडणाचा नुसता येळकोट सुरू झाला. जगमोहनची बायको त्याला रोज शिव्या घालायचीच शिवाय त्याने छायाला ज्या ठिकाणी नेऊन ठेवले होते, त्या ठिकाणी जाऊन छायाशी भांडणे काढायची. ही भांडणे हळूहळू भांडणे न राहता दोघींमध्ये भररस्त्यात हाणामार्‍याही सुरू झाल्या. या सगळ्यामुळे जगमोहन पुरता भंडावून गेला होता.

Criminal Caught By Mistake
Crime Diary | सूडचक्र!

याच दरम्यान छायाचे दारू पिणे प्रमाणाच्या बाहेर जाऊ लागले आणि तिने जगमोहनकडे आपल्यासाठी स्वतंत्र घर विकत घेऊन देण्यासाठी तगादा लावला. भरीस भर म्हणून छायाचा बाहेरख्यालीपणाही वाढला आणि दारूच्या नशेत ही बया कुणाबरोबरही फिरू लागली. जगमोहनने त्याचा जाब विचारला, तर ती त्याच्याच मर्दानगीची खिल्ली उडवायची. त्यामुळे तर जगमोहनचे टाळकेच सटकले. हिच्यासाठी आपण घरदार सोडून आलो, हिला आसरा दिला आणि आज ही आपल्यावर उलटली म्हणून त्याच्या अंगाचा नुसता तिळपापड व्हायचा. त्यामुळे आता कोणत्याही स्थितीत छायाचा काटा काढायचा त्याने प्लॅन केला. एकेदिवशी रात्रीच्या वेळेस त्याने गोड बोलून छायाला गावाबाहेर दूर अंधारात नेले. तिला भरपूर दारू पाजली आणि ती दारूच्या नशेत असतानाच तिचा गळा आवळला. छायाचा खून केल्यानंतर कोणताही पुरावा मागे राहू नये म्हणून जगमोहनने सगळी जय्यत तयारी केली होती. तो पोस्टमार्टेमचे काम करीत असल्यामुळे ती हत्यारे नेहमी त्याच्या मोटारसायकलच्या डिक्कीत असायची. त्याचप्रमाणे कोणकोणत्या कारणांनी मृतदेहाची ओळख पटते हेही त्याला पुरते ठाऊक होते. त्यामुळे त्याने आपल्याकडील ब्लेडने छायाच्या चेहर्‍याची सगळी त्वचा काढून टाकली. काही प्रमाणात तिचे नाक विद्रुप केले.

Criminal Caught By Mistake
Crime Diary : गुन्हेगारांचा सणकीपणा! वाचा ‘इम्पल्स कंट्रोल डिसॉर्डर’विषयी

हातावरील गोंदण कापून काढले. ओळखीच्या सगळ्या खाणाखुणा नष्ट करून टाकल्या. त्यानंतर त्याने तिची सगळी कपडे काढून जवळच टाकून दिली, जेणेकरून कुणीतरी या महिलेवर अत्याचार करून तिचा खून केल्याचा भास निर्माण केला आणि निश्चिंत मनाने तो आपल्या मूळ घरी परतला. दुसर्‍या दिवशी पोलिसांना छायाचा मृतदेह मिळाला; पण जगमोहनने तो इतका विद्रुप करून टाकला होता की, कुणालाही या मृतदेहाची ओळख पटविणे अशक्य झाले होते. ओळख न पटल्यामुळे जवळपास आठवडाभर छायाचा मृतदेह शवागारातच पडून होता. विशेष म्हणजे, छायाच्या मृतदेहाचे विच्छेदनही जगमोहननेच केले होते. छायाच्या मृतदेहाचा पंचनामा करताना त्या ठिकाणी पोलिसांना एक कुलपाची चावी मिळाली होती; पण त्यावरून काही सुगावा लागला नव्हता; मात्र पोलीस आपल्या पद्धतीने तपास करीतच होते. दरम्यान, ज्या भाड्याच्या घरात जगमोहन आणि छाया राहत होते, त्या घराच्या मालकाने पोलिसांना खबर दिली होती की, आपल्या घरातील भाडेकरू आठवडाभरापासून बेपत्ता झाली आहे.

पूर्वार्ध

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news