Underworld Gangster Dawood Ibrahim | दाऊद इब्राहिमचा 'गेम ओव्हर' होणार, भारतीय यंत्रणांची करडी नजर

India Most Wanted | दाऊद सध्या पाकिस्तानात लपून बसला आहे.
India Most Wanted
Dawood Ibrahim(File Photo)
Published on
Updated on
नरेंद्र राठोड, ठाणे
Summary

Underworld Gangster Dawood Ibrahim

दाऊद इब्राहिम कासकर... मुंबईतील एक कुख्यात गुंड..! मुंबईतल्या डोंगरी भागात आपला गुन्हेगारी प्रवास सुरू करून आंतरराष्ट्रीय कीर्तीचा ठरलेला गुंड. त्याने एकेकाळी मुंबईच्या गुन्हेगारी जगतावर वर्चस्व गाजवले होते. पुढे तो परदेशात पळून गेला. त्यानंतरही त्याने १९९२ मध्ये मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यास आतंकवाद्यांना मदत केली. या घटनेनंतर भारताने दाऊदला आतंकवादी घोषित केले. तेव्हापासून दाऊदवर भारतीय गुप्तचर व तपास यंत्रणा सतत करडी नजर ठेवून आहेत. दाऊद सध्या पाकिस्तानात लपून बसला आहे. या पुढेही भारताने जर पाकिस्तानातील आतंकवाद्यांविरोधात कारवाई सुरूच ठेवली, तर त्यात दाऊदचा देखील 'गेम ओव्हर' होऊ शकतो.

मुंबईतील डोंगरी भागात राहणारा दाऊद इब्राहिम कासकर हा एका पोलिसाचा मुलगा. ४ डिसेंबर १९७४ रोजी त्याने साथीदारांच्या मदतीने कर्णाक बंदर येथे एका व्यापाऱ्याकडून लाखोंची रोकड लुटली. त्यात तो पकडला गेला. ही दाऊदवर पडलेली पहिली पोलिस केस. त्यानंतर दाऊदने गुन्हेगारी जगतात एकावर एक इमले चढत थेट मुंबई अंडरवर्ल्डचे डॉन पद गाठले, धमकी, खंडणी, खून, तस्करी असे अनेक गुन्हे त्याने मुंबईत केले, पण दाऊदने एक अक्षम्य अपराध केला, तो म्हणजे १९९३ मध्ये मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा.

India Most Wanted
Thane Crime | बोलण्यात गुंतवून लांबवायची प्रवाशांकडील ऐवज

१२ मार्च १९९३ हा मुंबईच्या इतिहासातील एक काळा दिवस. या दिवशी मुंबईत वेगवेगळ्या बारा ठिकाणी बॉम्बस्फोट करण्यात आले. या हल्ल्यांत २५७ निष्पाप लोकांनी आपला प्राण गमावला. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, शिवसेना भवन, सेंच्युरी बाजार, एअर इंडिया बिल्डिंग, हॉटेल जुहू सेंटॉर, झवेरी बाजार, प्लाझा सिनेमा, पासपोर्ट ऑफिस वरळी, काथा बाजार वरळी, हॉटेल सी रॉक, सहार विमानतळ (आताचं छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ) या ठिकाणी हे बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोट मालिकेचा कट रवणारा होता मुंबईचाच कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम.

India Most Wanted
Thane Crime | मौजमजेसाठी चोरट्यांचा प्रवाशांच्या दागिन्यांवर डल्ला

दाऊदने मुंबई बॉम्बस्फोटाचा कट हा पाकिस्तानातील दहशतवादी व टायगर मेमन याच्याशी हातमिळवणी करून आखला होता. हा कट रचला गेला तेव्हा दाऊद दुबईमध्ये राहत होता. दुबईतील त्याच्या बंगल्यावरच स्फोटांचा हा सर्व प्लॅन आखला गेला. मुंबई बॉम्बस्फोट मालिकेनंतर भारताने दाऊदला आतंकवादी घोषित केले. याचदरम्यान अमेरिकेने जाहीर केलेल्या जागतिक आतंकवाद्यांच्या यादीत देखील दाऊदचे नाव आले. ९/११ च्या अमेरिकेवरील हल्ल्यात दाऊदने कुख्यात जागतिक आतंकवादी ओसामा बिन लादेन यास मदत केली होती, असा आरोप अमेरिकेने केला होता. या घटनेनंतर भारताची गुप्तचर एजन्सी रॉ, इस्रायलची मोसाद व अमेरिकेच्या एफबी आय या तीन गुप्तचर एजन्सीज दाऊदच्या मागावर आहेत; परंतु दाऊदला पकडण्यात अजून त्यांना यश आलेले नाही.

India Most Wanted
Thane Crime Update | अजब ! पोलीस कर्मचार्‍याच्या शेतातच ड्रग्ज कारखाना

दाऊद सध्या पाकिस्तानात लपून बसला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कराची शहरात क्लिफ्टन रोडवर व्हाईट हाऊस नावाचा दाऊदचा आलिशान बंगला आहे. याव्यतिरिक्त कराचीत डिफेन्स हौसिंग कॉलनीमध्येही दाऊदचा बंगला आहे. या परिसरात पाकिस्तानी रेंजर्सचा कडक पहारा असतो. दाऊदच्या या सर्व ठिकाणांची माहिती भारतीय तपास यंत्रणांनी पाकिस्तानला यापूर्वीच दिली आहे. मात्र त्यावर पाकिस्तानने आजपर्यंत काहीही कारवाई केलेली नाही. कराची येथील बंगल्यातून दाऊद आपला राईट हँड छोटा शकीलच्या मदतीने आपले गुन्हेगारीचे साम्राज्य आजही बिनदिक्कतपणे चालवतो.

भारतीय तपास यंत्रणांच्या अहवालानुसार दाऊद तब्बल चाळीस हजार कोटींचा मालक आहे. त्याच्या काळ्याधंद्यांच्या कमाईतून मोठी मदत पाकिस्तानच्या आयएसआयला होते. त्यामुळेच पाकिस्तानने दाऊदला आपल्या देशात लपवून ठेवले आहे, असे मुंबई पोलिस दलातील एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने सांगितले.

पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांची निघृण हत्या केली. त्यानंतर दोन देशांत निर्माण झालेला तणाव पूर्णपणे निवळलेला नाही. मात्र पाककडून परत कुरघोड्या करण्याचा प्रयत्न झाला तर भारत पुन्हा पाकस्थित आतंकवादी ठिकाणांवर स्ट्राईक करू शकतो, असे पाकिस्तानला ठणकावून सांगण्यात आले आहे. पाकिस्तानातील दहशतवाद्यांची सर्व लोकेशन भारतीय सैन्याच्या टार्गेटवर आहेत. त्यात दाऊदचे कराची येथील घरदेखील भारतीय सैन्याच्या निशाण्यावर आहे. भारताने यापुढेही पाकिस्तानातल्या आतंकवाद्यांविरोधात कारवाई सुरूच ठेवली तर, त्यात दाऊदचा देखील 'गेम ओव्हर होऊ शकतो. याची कल्पना दाऊदला देखील आहे. त्यामुळेच तो पाकिस्तानातून इतर देशांत पळून जाण्याच्या तयारीत आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. दाऊद भारताच्या हाती लागू नये म्हणून पाक सरकार व आयएसआय त्यास कराची येथून इतर ठिकाणी हलवू शकतात, अशी देखील चर्चा आहे. दाऊदचा भाऊ म्हणतो, मला माहीत नाही

दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर यास ठाणे पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यात काही वर्षांपूर्वी अटक केली होती. तेव्हा ठाणे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत 'दाऊद कुठे राहतो हे आपणास माहीत नाही', असा जवाब इकबालने दिला होता. ठाणे पोलिसांनी इकबालला न्यायालयासमोर उपस्थित केल्यानंतर दाऊद व तुमचे नातेवाईक कुठे आहेत, असा सवाल न्यायालयाने त्यास विचारला. त्यावेळी आपला भाऊ दाऊद कुठे आहे, हे मला माहीत नाही, पण त्याचा कधीतरी फोन येतो. मात्र त्याचा क्रमांक दिसत नाही, असे इकबाल याने न्यायालयात सागितले होते.

दाऊद भारतात का परतला नाही?

मुंबई गुन्हेगारी जगतातील सर्वच मोठे गुंड आज जेलमध्ये आहेत. परदेशात पळून गेलेले छोटा राजन, अबू सालेम व इतर बड्या गुंडांना देखील भारताने इतर देशांतून आपल्या ताब्यात घेतले आहे, पण मुंबई अंडरवल्ड्रचा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम गेली चार दशके भारताच्या हाती लागलेला नाही. काही वर्षांपूर्वी दाऊदने आत्मसमर्पण करून स्वतः भारतात परतण्याची तयारी दर्शवली होती, अशी जोरदार चर्चा होती. मात्र दाऊदचे भारतातील अनेक राजकीय नेते, चित्रपट कलाकार, उद्योजक आदी क्षेत्रांतील मोठमोठ्या, नामांकित व्यक्तींसोबत असलेले संबंध बाहेर येतील या भीतीपोटी त्यास भारतात आणले गेले नाही अशा चर्चेचे वादळदेखील वेळोवेळी उठले आहे. आता मात्र दाऊदला त्याच्या कर्माची फळे मिळण्यास सुरुवात झाली आहे. अनेक निष्पाप लोकांचे जीव घेणारा नराधम आज स्वतःच मरणाच्या भीतीने बंकरमध्ये लपून बसला आहे. 'अल्लाह के घर देर है, मगर अंधेर नहीं' हे अखेर त्याला आता नक्कीच कळले असावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news