..म्हणून त्यांनी फेकले रॉकेल बॉम्ब | पुढारी

..म्हणून त्यांनी फेकले रॉकेल बॉम्ब

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

तिघांना अटक; दोन अल्पवयीन ताब्यात

वाढदिवसाचा केक न कापल्याचा राग आल्याने पाच जणांनी मिळून आ. लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या कार्यालयावर रॉकेल बॉम्ब फेकल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. ही घटना 23 नोव्हेंबर रोजी पिंपळे गुरव येथे घडली. तन्मय रामचंद्र मदने (19 रा. पिंपळे गुरव), विक्रम विजय जवळकर (20, रा. रेल्वे समोर, कासारवाडी), प्रद्युम्न किशोर भोसले (23, पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या कार्यालयावर रॉकेल बॉम्बचा हल्ला झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेज मिळून आले. यामध्ये आरोपींनी तोंडाला मास्क, गाडीच्या नंबर प्लेटवर चिकटपट्टी लावल्याचे दिसून येत होते; मात्र पोलिसांनी गाडीच्या रंगावरून शोध सुरू केला. काही तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.

वीज बिल भरणार नाही, कनेक्शन तोडाल तर…राजू शेट्टींचा सरकारला इशारा

आरोपी प्रद्युम्न भोसले याचा 7 सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त मास्टरमाईंड असे लिहिलेला केक कापण्यासाठी आरोपी तन्मय आणि आरोपी प्रद्युम्न हे त्यांच्या मित्रांसोबत चंद्ररंग डेव्हलपर्स या कार्यालयात शंकर जगताप यांच्याकडे गेले; मात्र शंकर जगताप हे त्यांच्या कामाच्या गडबडीत केक न कापताच त्यांच्या कार्यकर्त्यासोबत गाडीत बसून निघून गेले. याचा राग आल्याने आरोपींनी शंकर जगताप यांचे कार्यालयात पेटवून देण्याचा कट रचला.

शिवसेना- भाजप एकत्रित सत्तेत येतील : रामदास आठवले

गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आरोपी विक्रम जवळकर याने उपलब्ध केली होती. काम झाल्यानंतर ती दुचाकी त्याच्या गोठ्यात लपवण्याचा प्लॅन ठरला होता. ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल टोणपे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल तांबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे, दिलीप जाधव, कर्मचारी नितीन काळे, गणेश धामणगावकर, विजय मोरे, प्रविण पाटील, विवेक गायकवाडड, प्रमोद गोडे, सागर सुर्यवंशी, हेमंत हांगे, अनिल देवकर, विनायक डोळस, विश्वनाथ असवले, नुतन कोंडे यांनी. झटपट पैसे मिळण्याचा मोह

http://इंद्रायणीत बुडून सख्ख्या भावांचा मृत्यू

दीड वर्षापूर्वी चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिवंगत नगरसेवक दत्ता साने यांचे ऑफिस काही गुंडांनी फोडले होते. या गुन्हयात प्रद्युम्न याचा वर्गमित्र सॅमसंग अ‍ॅमेट, देवेंद्र बिडलान हे सहभागी होते. या गुन्हयात दत्ता साने यांच्या राजकीय विरोधक नेत्याचे नाव न घेण्यासाठी त्यांना 20 लाख रुपये मिळाल्याची माहिती आरोपींकडे होती. तशाच प्रकारे या गुन्ह्यातसुध्दा जर तन्मय मदने व त्याचे साथीदार पकडले गेल्यास तोच फॉर्मुला वापरून शंकर जगताप यांच्या विरोधकांकडे नाव न घेण्यासाठी मोठ्या रक्कमेची मागणी करण्याचा प्लॅन आरोपींनी केला होता. आरोपींचा इतिहास आरोपी तन्मय मदने हा सुखवस्तु कुंटुंबातील आहे.

त्याचे वडील डोळ्यांचे डॉक्टर आहेत. तन्मय त्यांचा तसेच विधी संघर्षित बालके, विक्रम जवळकर, प्रद्युम्न भोसले याचा हा पहिलाच गुन्हा असून त्याचा गुन्हेगारी इतिहास नाही. परंतु गुन्हेगारी इतिहास असलेले सॅमसग अ‍ॅमेंट, देवेंन्द्र बिडलान यांच्यावर पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरामध्ये गुन्हे दाखल आहेत.

Back to top button