

China Silver Export Control: चीनने पुन्हा एकदा आपल्या निर्णयानं सर्वांना हैराण करून सोडलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चीनने रेअर अर्थ एलिमेंट्स बाबत मोठे आणि आश्चर्यकारक निर्णय घेतले आहेत. आता त्यांनी चांदीबाबत देखील वेगला नियम लागू केला आहे. चीनेच्या या नव्या नियमामुळं चांदीच्या दरात झपाट्यानं वाढ होण्याची शक्यता आहे. जाणकारांच्या मते आता चांदी स्वस्त होण्याची शक्यता फारच कमी आहे. चीनच्या नव्या चालीमुळे जगभरातील चांदीचा पुरवठा कमी होऊ शकतो आणि मागणी वाढू शकते.
चीन ग्लोबल चांदी सप्लायमधील एक सर्वात मोठा नियंत्रक आहे. जगभरातील चांदीचा एक मोठा हिस्सा चीनच्या जवळ उपलब्ध आहे. चीन सध्या फक्त १३ टक्के मायनिंग करतोय. मा चांदी शुद्धीकरण आणि रिप्रोड्युस करण्यात चीनची जागतिक हिस्सेदारी ही ६० ते ७० टक्के इतकी आहे.
चीनने चांदीच्या बाबतीत जगातं त्यांच्यावर असलेलं मोठं अवलंबत्व पाहून त्याचा फायद उचलला आहे. त्यांनी चांदीबाबत एक मोठी खेळी केली आहे. चीनने १ जानेवारी २०२६ पासून चांदीचे नियंत्रण करण्याबाबत नियम लागू केले आहेत. या नियमानुसार आता सरकारी लायसन्स असलेली कोणतीही कंपनी चीनच्या बाहेर चांदी निर्यात करू शकणार नाहीये. या निर्णयामुळं अख्ख जग हैराण झालं आहे. चीनने रेअर अर्थ मिनरल्सबाबत जसं केलं होतं त्याचप्रमाणे ते चांदीच्या बाबतीत देखील करत आहेत.
चांदी निर्यात करण्याबाबत चीनने काही अटी ठेवल्या आहेत. फक्त काहीच सरकारी मान्यता प्राप्त कंपन्यांनाच चांदी निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यांना देखील सरकारी लायसन्स घेणं गरजेचं आहे. हे लायसन्स मिळवण्यासाठी उत्पादन, क्रेडिट लाईन सारखे मोठे मापदंड असणार आहेत. आतापर्यंत फक्त ४४ कंपन्यांना अशी परवानगी मिळाली आहे.
जागतिक स्तरावर चीन ६० ते ७० टक्के चांदी नियंत्रित करतो. जर चीनने चांदीचा एक्सपोर्ट नियंत्रित केला तर चांदीची जागतिक बाजारातील उपलब्धता कमी होईल आणि मागणी सतत वाढत जाईल. आधीच जगात चांदीची इंडस्ट्रीयल डिमांड वेगानं वाढत आहे. अशा परिस्थितीत चांदीच्या किंमतीत मोठा उसळी येईल. चांदीच्या किंमती सध्या रेकॉर्ड पातळीवर आहेत. त्यात पुन्हा तेजी येण्याची शक्यता आहे.
चीनसाठी चांदी फक्त उद्योग आणि गुंतवणूक करण्याची गोष्ट नाहीये. ती त्यांच्या रणनितीचा देखील भाग आहे. या जोरावर चीन इतर देशांशी चांगली डीट करू शकतो. तसेच आपल्या गोष्टी मनवून घेऊ शकतो. जाणकारांच्या मते यामुळेच चीन चांदीवरील आपलं नियंत्रण वाढवत आहे. एवढंच नाही तर चीनमध्ये स्थानिक बाजारात देखील चांदीची चांगली मागणी आहे.
चीन जगातील सर्वात मोठे सोल पॅनल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इव्ही निर्माता आहे. या सर्व गोष्टीत चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. यामुळे चीनने इंडस्ट्रियल डिमांड वाढवली आहे आणि चांदीच्या पुरवठ्यावर नियंत्रण आणलं आहे. त्यामुळे या सेक्टरमध्ये चीनचा दबदबा वाढवण्याचा त्यांचा मानस आहे.