Dating Trend: चॅटिंगवर बोलताना वाटतो परफेक्ट पार्टनर, पण प्रत्यक्षात असतो वेगळाच; काय आहे 'चॅटफिशिंग'?

What is Chatfishing: ऑनलाइन चॅटिंगमध्ये रोमँटिक आणि गोडगोड बोलणारी व्यक्ती प्रत्यक्ष भेटल्यावर वेगळीच निघतेय? डेटिंगमधील 'चॅटफिशिंग' हा नवा ट्रेंड काय आहे आणि तो कसा ओळखावा, जाणून घ्या.
Dating Trend
Dating TrendFile Photo
Published on: 
Updated on: 

Chatfishing AI Dating Trend

नवी दिल्ली: समजा, तुम्हाला सोशल मीडिया किंवा एखाद्या डेटिंग साइटवर एक मेसेज आला. तो वाचून तुमच्या चेहऱ्यावर एक मोठे हास्य उमटले. समोरच्या व्यक्तीचे प्रत्येक उत्तर इतके गोडगोड, रोमँटिक आणि मनोरंजक असते की तुम्हाला वाटते, "मला अगदी योग्य जोडीदार मिळाला आहे."

पण, अनेक दिवस ऑनलाइन चॅटिंग केल्यानंतर, जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात त्या व्यक्तीला भेटता, तेव्हा तुम्हाला मोठा धक्का बसतो. तुमच्या लक्षात येते की, मेसेजमध्ये दिसणारे त्याचे ते प्रभावी आणि मोहक व्यक्तिमत्व प्रत्यक्षात अजिबात नाही. जर तुमच्यासोबतही असे कधी घडले असेल, तर सावध व्हा! व्यक्तिचे ऑनलाइन बोलणं आणि प्रत्यक्ष व्यक्ती यांच्यातील या मोठ्या तफावतीला डेटिंगच्या जगात आता 'चॅटफिशिंग' असे म्हटले जात आहे.

'चॅटफिशिंग' म्हणजे काय?

हा डेटिंगमधील एक अगदी नवीन प्रकार आहे. अनेकदा लोकांना आपल्या भावना शब्दांत मांडणे कठीण जाते किंवा नेमक्या वेळी काय उत्तर द्यावे हे सुचत नाही. अशा वेळी ते एआयची मदत घेतात. ते चॅटचा स्क्रीनशॉट घेतात, तो एका AI टूलमध्ये टाकतात आणि तिथून मिळालेले सुसंस्कृत उत्तर कॉपी-पेस्ट करतात. यामुळे, काही क्षणातच ती व्यक्ती अत्यंत रोमँटिक आणि हुशार असल्याचे भासते.

Dating Trend
Gen Z dating trends: जेन झी मुले सिंगल, तरुणींना मात्र आवडतात मिलेनियल; नेमकं कारण काय? अहवालात मोठा खुलासा

ही सवय धोक्याची कधी ठरते?

एखादे चतुर वाक्य सुचण्यासाठी किंवा एखादी गोष्ट अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी AI चा वापर करण्यात काहीही चुकीचे नाही. खरी समस्या तेव्हा निर्माण होते, जेव्हा एखादी व्यक्ती आपले संपूर्ण व्यक्तिमत्व घडवण्यासाठीच AI वर अवलंबून राहते. जेव्हा संपूर्ण बोलणे AI द्वारे तयार केले जाते, तेव्हा ती व्यक्ती नकळतपणे स्वतःची एक खोटी प्रतिमा निर्माण करत असते. म्हणूनच, जेव्हा दोन व्यक्ती प्रत्यक्ष आयुष्यात भेटतात, तेव्हा चॅटिंगद्वारे बोलणारी व्यक्ती प्रत्यक्षात वेगळीच वाटते.

मेसेज माणसाने लिहिला आहे की AI ने, कसं ओळखायचं?

हे ओळखणे थोडे कठीण असले, तरी अशक्य नक्कीच नाही. रोजच्या बोलण्यात लोक सहसा साधी भाषा वापरतात; ते आपल्या रोजच्या अनुभवांबद्दल, पाहिलेल्या वेब सीरिज किंवा नवीन चित्रपटांबद्दल बोलतात. याउलट, जर तुम्हाला मिळणारा प्रत्येक संदेश अतिशय मोजका, शुद्ध आणि कदाचित काहीसा अति-परिपूर्ण वाटत असेल, तर तुम्ही असे समजू शकता की ते मेसज एआय द्वारे तयार केले जात आहेत.

दिशाभूल होऊ नये म्हणून काय करावे?

दिशाभूल होऊ नये म्हणून, प्रत्यक्ष भेटणे हा सर्वात सरळ मार्ग आहे. जर तुम्हाला संदेशांच्या स्वरूपाबद्दल थोडीही शंका असेल, तर प्रत्यक्ष भेटण्याचे नियोजन करा आणि काही वेळ एकत्र घालवा. एकदा का तुम्ही समोरासमोर भेटलात की, चॅटमध्ये दिसणारे प्रभावी व्यक्तिमत्व खरोखर अस्सल आहे, की केवळ एआयने विणलेले एक जाळे आहे, हे लगेच स्पष्ट होईल.

Dating Trend
Gen Z dating trends: झेन् झी मध्ये 'क्रश रिसेशन'; प्रेम पाहिजे, पण डेटिंग नको? काय आहे हा नवा ट्रेंड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.