

Shocking News Office Friendship: ऑफिसमधील मैत्री आणि वैयक्तिक जीवनातील नाती यात खूप फरक असतो. याबाबतचा एक भन्नाट किस्सा एका युवतीसोबत झाला. या युवतीने आपल्यासोबत काम करणाऱ्या आपल्या साथीदारांना आपल्या लग्नसोहळ्यात खूप मोठ्या आशेनं अन् अगत्यानं आमंत्रण दिलं होतं. मात्र तिची घोर निराशा झाली. यामुळे तिला भावनिक धक्का बसला अन् तिनं एक धक्कादायक निर्णय घेऊन सर्वांनाच मोठा धक्का दिला.
ही कहानी चीनच्या युवतीची आहे. सोशल मीडियावर सध्या या चिनी महिलेची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या पाच वर्षापासून ती एकाच कंपनीत काम करत होती. तिला वाटलं की तिच्या ऑफिसमध्ये काम करणारे तिचे सर्व सहकारी हे तिचे खूप चांगले मित्र आहे.
या चीनच्या युवतीनं आपल्या लग्नसोहळ्यासाठी आधी फक्त आपल्या जवळच्या मित्रांनाच बोलवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तिला भीती होती की काही ऑफिसमधील लोकांना लग्नाला बोलवलं नाही तर त्यांचा गैरसमज होऊ शकतो. त्यामुळे तिने आपल्या विभागातील सर्व ७० लोकांना लग्नाचं आमंत्रण दिलं. विशेष म्हणजे तिनं दोन महिने आधीच हे आमंत्रण दिलं होतं.
तिने लग्नापूर्वीच ऑफिसमधील अनेक लोकांना गिफ्ट देखील दिले होते. मात्र लग्नाचा दिवस आला अन् तिची घोर निराशा करून गेला. या तरूणीनं आमंत्रण दिलेल्या ७० लोकांपैकी फक्त एकजण लग्नासाठी आला. तो देखील तिचा ज्युनिअर होता. वरिष्ठांची नाराजी ओढवून घेऊ नये म्हणून कदाचित तो आला असेल.
या तरूणीने आपल्या ऑफिसमधील लोकांसाठी ६ मोठे डेबल बुक केले होते. मात्र लग्नात हे टेबल रिकामेच राहिले. खूप सारं जेवण वाया गेलं. सर्वात महत्वाचं म्हणजे तिचे कुटुंबिय आणि सासरकडच्या मंडळींसमोर लज्जास्पद भावना निर्माण झाली. यामुळे या तरूणीला भावनिक धक्का बसला.
तरूणाला वाटलं की तिनं ज्या लोकांसोबत ५ वर्षे काम केलं त्यांनी तिच्या भावनेला अजिबात किंमत दिली नाही. पुढच्याच दिवशी ही तरूणी ऑफिसला गेली अन् तिनं नोकरीचा त्वरित राजीनामाच दिला. चीनच्या तरूणीच्या या कहानीमुळं आता खरंच ऑफिसमधील मैत्री ही खरोखरची मैत्री असते का... लग्नासारख्या वैयक्तिक कार्यक्रमााला ऑफिसमधील सहकाऱ्यांकडून इतक्या अपेक्षा ठेवणं योग्य आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे.