Tomato : टॉमेटोच्या रोपांची निगराणी कशी कराल? जाणून घ्‍या सविस्‍तर | पुढारी

Tomato : टॉमेटोच्या रोपांची निगराणी कशी कराल? जाणून घ्‍या सविस्‍तर

कोणत्याही पिकाला चांगला दर्जा आणि चांगला भाव मिळण्यासाठी त्याची योग्य निगराणी घेणे गरजेचे आहे. रोजच्या आहारातील टोमॅटोही ( Tomato ) त्याला अपवाद नाही. त्यामुळे त्याच्या रोपांची निगराणी कशी राखावी, हे जाणून घेणे अगत्याचे आहे. ( Tomato )

टोमॅटोची लागवड केल्यानंतर साधारपणे 1 ते 1.5 महिन्यानंतर झाडांवर फळे वाढू लागतात. त्यानंतर फळांच्या वजनामुळे झाडाच्या फांद्या जमिनीला टेकतात. त्यामुळे झाडावरील काही फळांचा जमिनीशी संपर्क येतो. त्यामुळे झाडांवर किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊन वरच्या बाजूंची फळे उघडी पडतात. यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने टोमॅटोच्या झाडांना आधार देण्याची स्वस्त पद्धत सुचवली आहे.

सध्या मोठ्या प्रमाणात वापरात असलेली तारा आणि बांबू या पद्धतीत सरीच्या दोन्ही बाजूला 150 ते 180 सें.मी. लांबीच्या तुकड्याचे डांब तिरपे रोपावेत. अशा 60 सेंटीमीटर लांबीच्या तुकड्याचे एक टोक घट्ट आवळून बांधावे आणि तो दगड डांबापासून 30 सेंटीमीटर अंतरावर खोल खड्डा घेऊन घट्ट गाडावा. नंतर प्रत्येक वाफ्याच्या आडव्या वरंब्यावर प्रत्येक सरीवर 180 सेंटीमीटर उंचीचा एक बांबू रोवावा आणि 14 गेज जाडीची जी. आय. तार कडेच्या डांबाला बांधावी. अशाप्रकारे झाडांच्या उंचीनुसार तारा बांधाव्यात. या तारांना झाडांच्या फांद्या जशा वाढतील त्याप्रमाणे सुतळीने बांधून घ्याव्यात.

Tomato :  वाहतुकीचे साधन लक्षात घेऊन फळांची तोडणी करावी

लागवडीनंतर साधारणत: 60 ते 75 दिवसांनी जातीपरत्वे फळे काढणीस तयार होतात. बाजारपेठेचे अंतर आणि वाहतुकीचे साधन लक्षात घेऊन फळांची तोडणी करावी. लांबच्या बाजारपेठेसाठी डोळा पडण्यास सुरुवात झालेली फळे तोडावीत तर जवळच्या बाजारपेठेच्या मागणीनुसार वर्गवारी करावी. खराब, सडलेली, फुटलेली, दबलेली फळे निवडून काढावीत. चांगली निवडलेली फळे लाकडी खोक्यात लिंबाचा पाला, वर्तमानपत्राचा वापर करून आकर्षक दिसतील अशा पद्धतीने एकावर एक थर देऊन भरावीत.

अनिल विद्याधर

 

हेही वाचा : 

Back to top button