शेती हीच ‘इंडस्ट्री : रामपूरमधील शशिकांत काळगी यांचे वार्षिक 2000 टन फळभाज्यांचे उत्पादन | पुढारी

शेती हीच ‘इंडस्ट्री : रामपूरमधील शशिकांत काळगी यांचे वार्षिक 2000 टन फळभाज्यांचे उत्पादन

शेतीची वार्षिक 2 कोटींची उलाढाल, 20 पुरुष आणि 50 स्त्री असे एकूण 70 जणांची परमनंट नेमणूक, तेजी-मंदी रोग हवामान गृहीत धरून वार्षिक 4 टक्के नफ्याचे टार्गेट ही भाषा आणि वर्णन आहे, रामपूर येथील जुने जाणते अनुभवी तज्ज्ञ प्रगतीशील शेतकरी शशिकांत काळगी यांचे. 80 एकर क्षेत्रात त्यांची फळभाज्या आणि द्राक्षशेती विस्तारली आहे. पैकी 26 एकर द्राक्षे तर 54 एकर तीन-चार प्रकारच्या फळभाज्या रोटेशन नुसार घेणारे हे मोठे शेतकरी. शेती ही आपली इंडस्ट्री आहे आणि माझ्या शेतीत 70 जणांना नोकरी आहे कायमची. असे ते अभिमानाने सांगतात.

ढोबळी मिरचीत वृषाल पाटील हेच मास्टर : काळगी

फळभाज्या दराने साथ दिली नाही. रोग हवामान यांचाही विचार फारसा करीत नाही कारण ते गृहीत आहे. अभ्यास करून सर्व बाबी गृहीत धरून एव्हरेज आणि उत्पादन यांचा सरासरी विचार करून किमान त्या 70 लोकांचा रोजगार तरी निघावा इतकी किमान अपेक्षा असते. तर किमान उत्पादन खर्च वजा जाता किमान 4 टक्के नफा सरासरी तिन्ही चारही पिकांत एकत्रित मिळून जरी मिळाला तरी आमची शेती यशस्वी झाली असे आम्ही मानतो असेही शशिकांत काळगी सांगतात.

वार्षिक 2000 टन फळभाज्यांचे उत्पादन

54 एकर क्षेत्रात भाजीपाला फळभाज्या मध्ये ढोबळी मिरची, कारली, दोडका व टोमॅटो या पिकांचा समावेश असतो. 2016 पासून प्रतिवर्षी 600 टन ढोबळी मिरची, 300 टन टोमॅटो, 100 टन कारली व दोडका कमीत कमी हे उत्पादनाचे गणित या पिकांसाठी आमचे गृहीत असते. सध्या ढोबळी मिरचीचा साडेतीन एकरवरील जुन्या प्लॉटमध्ये 14 तोडे झाले असून अजून किमान दोन तोडे होतील. सहा ते सात महिन्यात 125 टन इतके हे उत्पादन घेतले आहे. यात थोडी वाढ पुढील दोन तोड्यात होईल. दुसर्‍या प्लॉटला सोमवारी पहिला तोडा सुरू होत आहे. त्यांचे क्षेत्र 3 एकर असून जाग्यावर आपल्याला 50 रु. दर प्रतिकिलो मिळाला आहे. जुन्या प्लॉटला सुद्धा 65 रु. किलो असाही दर मिळाला होता. नवीन प्लॉट 52 व्या दिवशी पहिली तोड सुरू होत आहे. हा प्लॉट असेपर्यंत दर चांगला देऊन जाईल, असा अंदाज आहे. दर पडले म्हणून आम्ही कोणतीच शेती थांबवत नाही. उन्हाळ्यात प्लॉट नवीन असला आणि थ्रीप्स लाल कुळी रोगावर स्प्रे देऊन नियंत्रण ठेवले तरी प्लॉट दीर्घकाळ टिकतो. पुढील तीन महिने दर चांगले टिकतील : सध्या पालघर भागातील मिरची उत्पादन अत्यंत फेल गेले आहे. ऊन व अवकाळीमध्ये तेथील प्लॉट यशस्वी झाले नाहीत परिणामी सांगली जिल्ह्यातील ढोबळी मिरचीला दरवर्षीपेक्षा उन्हाळ्यात चांगले दर मिळतील, असा अंदाज काळगी यांनी व्यक्‍त केला.

दुष्काळ हे वरदान
रामपूर गाव आणि आमचा दुष्काळी जत तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो. पण भाजीपाला व फळभाजी उत्पादनमध्ये पावसाने अनेक भागात व जिल्ह्यातील पिके, फळभाज्या प्लॉट नष्ट होतात. पण पाण्याचा निचरा, ऊन यामुळे प्लॉट टिकून राहतो. रोगराईचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे आपसूक उत्पादन वाढते. तर ज्यावेळी मालाची आवक कमी होते त्यावेळी जत तालुक्यातील फळभाज्या टिकून तग धरून असतात. त्यामुळे दुष्काळ हे नाव ठेवण्यासाठी शब्द संबोधला जात असला तरी आम्ही प्रयत्नपूर्वक दुष्काळला वरदान बनवितो, असेही ते आत्मविश्वासपूर्वक सांगत होते.

वृषाल पाटील ‘मास्टर’ : ढोबळी मिरची या पिकांत वृषाल पाटील यांचे ज्ञान आणि माहिती अगाध आहे. या पिकाबाबतीत वृषाल पाटील हेच मास्टर आहेत. त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. त्यामुळे त्यांनी दिलेल्या शेड्युल व टेबलप्रमाणे आम्ही व्यवस्थापन करीत आहोत. त्याचा चांगला फायदा आम्हाला होताना दिसत आहे. वीरा अ‍ॅग्रोची टीम व वृषाल पाटील सवडीने 10 ते 15 दिवसांनी व्हिजिट करतात त्यामुळे अपेक्षित उत्पादन वाढलेले दिसून येते, असेही काळगी यांनी सांगितले. त्यांनी सांगतील ती वीरा अ‍ॅग्रोची व अन्य नामांकित कंपन्यांची उत्पादने सुद्धा आम्ही वापरतो.
(संपर्क – शशिकांत काळगी,शेतकरी : 9022048851)

 

Back to top button