

Bank Holiday March 2026: मार्च महिन्यात एकूण १८ दिवस बँका राहणार बंद... जाणून घ्या तुमच्या शहरात कधी आहे सरकारी सुट्टी भारतीय रिझर्व बँक अर्थात RBI ने मार्च महिन्यातील बँकांना असणाऱ्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या लिस्टनुसार मार्च महिन्यात १८ दिवस बँक बंद राहणार आहेत. पुढच्या महिन्यात बँकेसंदर्भात काही काम असेल तर तुम्हाला या सुट्ट्यांची लिस्ट नक्की पहावी लागणार आहे.
आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या सुट्ट्यांच्या यादीत मार्च महिन्यात सर्व रविवारी आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँक बंद राहणार आहेत. त्याचबरोबर आरबीआयने 2,3,4,,13,17,19,20,21,26,27 आणि 31 मार्च या दिवशी देखील बँक हॉलिडेची घोषणा केली आहे. मार्च महिन्यात ५ रविवार येतात. म्हणजे १,८,१५,२२ आणि २९ मार्च रोजी बँक बंद राहणार आहेत. जरी बँक ब्रांच बंद असल्या तरी तुम्ही तुमची बँकेसंदर्भातील कामे ऑनलाईन पद्धतीनं करू शकता.
१ मार्च रविवार साप्ताहिक सुट्टीसंपूर्ण भारत
२ मार्च सोमवार होलिका दहनकानपूर, लखनौ
३ मार्च मंगळवार होली (धुळवड) १५ राज्यांमधील शहरे
४ मार्च बुधवार होली (दुसरा दिवस)/ या ओसांग १७ राज्यांमधील शहरे
८ मार्च रविवार साप्ताहिक सुट्टी संपूर्ण भारत
१३ मार्च शुक्रवार चापचर कुटऐझॉल
१४ मार्च शनिवार दुसरा शनिवार संपूर्ण भारत
१५ मार्च रविवार साप्ताहिक सुट्टी संपूर्ण भारत
१७ मार्च मंगळवार शब-ए-कद्र जम्मू आणि श्रीनगर
१९ मार्च गुरुवार गुढीपाडवा, उगादी आणि नवरात्री प्रारंभ ११ राज्यांमधील शहरे
२० मार्च शुक्रवार ईद-उल-फित्र आणि जुमात-उल-विदा ५ राज्यांमधील शहरे
२१ मार्च शनिवार रमजान ईद आणि सरहुल संपूर्ण भारत
२२ मार्च रविवार साप्ताहिक सुट्टी संपूर्ण भारत
२६ मार्च गुरुवार श्री रामनवमी १३ राज्यांमधील शहरे
२७ मार्च शुक्रवार श्री रामनवमी ६ राज्यांमधील शहरे
२८ मार्च शनिवार चौथा शनिवार (दुसरा शनिवार प्रमाणे सुट्टी) संपूर्ण भारत
२९ मार्च रविवार साप्ताहिक सुट्टी संपूर्ण भारत
३१ मार्च मंगळवार महावीर जयंती १५ राज्यांमधील शहरे