Tata CURVV EV कारची पहिली झलक पाहिली का? हे आहेत फिचर्स

Tata CURVV EV
Tata CURVV EV

पुढारी ऑनलाईन डेस्क : टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक कन्सेप्ट कर्व (Concept CURVV) ही नवी कार लवकरच लॅान्च करणार असल्याची घोषणा केली आहे. आकर्षक डिझाईनसह सुसज्ज असलेली ही नवी कार ईव्ही (EV) आर्किटेक्चरवर आधारित असेल. टाटा मोटर्सकडून सांगण्यात आले आहे की, कन्सेप्ट कर्व इलेक्ट्रिक कार अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी सज्ज असेल. अगदी प्रगत सनरूफसारखे आधुनिक वैशिष्टय़ही यात पाहायला मिळणार आहे. Tata Motors ने नवीन कॅानसेप्ट कर्व्ह EV कारचे (Tata Curvv EV Car) फोटो वेबसाईटवर  सादर केले आहेत.

Tata CURVV EV चे फिचर्स

या EV कारमध्ये मागील विंडस्क्रीन हे  इलेक्ट्रिक SUV कूप (Coupe SUV) सारखेच असेल. या SUV मध्ये आकर्षकता वाढवण्यासाठी कूप मॅाडेलच्या फिचर्सप्रमाणे रूफलाइन आणि व्हील कव्हर्ससह या इलेक्ट्रिक कारमध्ये उत्कृष्ट रूफ रेलदेखील पहायला मिळते.

नेक्सॅानच्यावरचे मॅाडेल

टाटा कंपनीची कॅान्सेप्ट कर्व ही एसयुव्ही कार ग्राहकांना आकर्षक करणारी कार आहे. जी सिएरा (Sierra) एसयुव्ही कारवर आधारित बनविलेली आहे. ही सिएरा कार 2020 च्या ऑटो एक्सपो दरम्यान अनावरण केली होती. तसेच कर्व्ह ही कार लॅान्च झाल्यानंतर टाटा कंपनीच्या नेक्सॅानच्या पुढचे मॅाडेल असणार आहे.

टाटाने तिच्या आगामी नव्या कॅान्सेप्ट कर्व्हच्या पॅावरट्रेन, बॅटरी आणि परफॅारमन्स बाबत कोणतीही माहिती अजून दिलेली नाही. त्याचबरोबर कंपनीकडून असेदेखील सांगण्यात आले आहे की, कर्व फुल चार्जिंगवर 400 किलोमीटर ते 500 किलोमीटर एवढे अंतर पार करेल.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news