

सूर्य या वर्षी उच्च भावात असल्याने काही क्षेत्रांत प्रगती आणि वैभव मिळेल, मात्र राहु, शनी आणि मंगळ यांची युती २०२५ पेक्षाही अधिक नुकसानकारक ठरण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
World Crisis Prediction
नवी दिल्ली : "मुलाचे पाय पाळण्यात दिसतात", या म्हणीप्रमाणे २०२६ वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, २०२६ मध्ये ग्रहांची चाल आणि राशींमधील त्यांचे गोचर सामाजिक, राजकीय आणि आर्थिक वातावरणावर गंभीर परिणाम करण्याची शक्यता आहे. विशेषतः सत्ताधीशांच्या निर्णयांचा जगावर विपरीत परिणाम होऊन मोठे संघर्ष ओढवण्याची चिन्हे आहेत.
सनातन परंपरेनुसार, येत्या दोन महिन्यांत चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नवीन संवत्सर सुरू होत आहे, त्याचे नाव 'दुर्मति संवत्सर' असे आहे. ६० संवत्सरांच्या चक्रातील हे ५५ वे संवत्सर असून ते 'रुद्रविंशति' गटात येते. नावाप्रमाणेच हे संवत्सर अशुभ मानले जाते. या काळात राज्यकर्त्यांची बुद्धी विचलित होऊन ते निरंकुश होण्याची शक्यता असते. यामुळे राष्ट्रांमध्ये संघर्ष वाढतो आणि प्रजा असंतुष्ट राहते.
या वर्षाच्या सुरुवातीलाच शुक्र आणि मंगळ यांची युती झाली आहे. ज्योतिषशास्त्रात मंगळ हा युद्धाचा कारक मानला जातो. अमेरिकेने वेनेझुएलावर हल्ला करून राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना बंदी बनवल्याची घटना ही याच संघर्षाची नांदी मानली जात आहे. १३ जानेवारी २०२६ रोजी शुक्र मकर राशीत प्रवेश करेल आणि त्यानंतर तीन दिवसांनी मंगळही तिथे पोहोचेल. ही युती जागतिक स्तरावर तणाव आणि लष्करी संघर्षाला खतपाणी देणारी ठरू शकते.
ज्योतिषशास्त्रानुसार, २३ फेब्रुवारी ते २ एप्रिल २०२६ या काळात राहु आणि मंगळ यांची युती होऊन 'अंगारक योग' निर्माण होणार आहे. फेब्रुवारी संपूर्ण महिला मंगळ कुंभ राशीत राहुसोबत असेल. एप्रिलमध्ये मंगळ मीन राशीत जाऊन शनीसोबत युती करेल (११ मे पर्यंत) ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, मंगळाचा राहु आणि शनीशी होणारा हा संबंध जागतिक नेत्यांसाठी अत्यंत कठीण काळ असेल. यामुळे सत्ता पालट, राजकीय दबाव आणि लष्करी हालचाली वेगवान होतील.
२०२६ मध्ये एकूण चार ग्रहणे होणार आहेत, त्यापैकी सुरुवातीची दोन ग्रहणे १५ दिवसांच्या अंतराने एकाच महिन्यात येत आहेत. १७ फेब्रुवारी २०२६: सूर्यग्रहण (भारतात दिसणार नाही). तर ३ मार्च २०२६: पूर्ण चंद्रग्रहण (होलिका दहन दिवशी, भारतात दृश्यमान). एकाच महिन्यात दोन ग्रहणे होणे ही स्थिती ज्योतिषशास्त्रात शुभ मानली जात नाही. यामुळे भीषण संघर्ष, नैसर्गिक आपत्ती आणि सामाजिक अस्थिरतेचे योग जुळून येतात. विशेषतः १७ फेब्रुवारी आणि ३ मार्च या तारखा संघर्ष आणि आर्थिक मंदीचे संकेत देत आहेत. सूर्य या वर्षी उच्च भावात असल्याने काही क्षेत्रांत प्रगती आणि वैभव मिळेल, मात्र राहु, शनी आणि मंगळ यांची युती २०२५ पेक्षाही अधिक नुकसानकारक ठरण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.