Hanuman Chalisa rules
नवी दिल्ली: तुम्ही जर बजरंगबलीचे भक्त असाल, तर तुम्ही 'संकटमोचन' हनुमान चालीसा नक्कीच वाचली असेल. हनुमंताची कृपा व्हावी यासाठी हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग मानला जातो. चालीसातील 'जो सत बार पाठ कर कोई, छूटहि बन्दि महा सुख होई' ही चौपाई आपण सर्वांनीच वाचली असेल. मात्र, वाचल्यानंतर चालीसाचे वाचन सलग ७ वेळाच का करावे, असा प्रश्न अनेकदा मनात उपस्थित होतो.
धार्मिक मान्यता आणि ज्योतिषशास्त्रानुसार, पूर्ण संकल्प, शुद्ध मन आणि योग्य पद्धतीने सलग २१ दिवस रोज ७ वेळा हनुमान चालीसाचे वाचन केल्यास वर्षांनुवर्षे अडकलेली कामेही मार्गी लागू शकतात.
१ वेळा पठन: दैनंदिन सामान्य पूजेसाठी १ वेळा पठन केले जाते.
३ वेळा पठन: आयुष्यात अचानक एखादे मोठे संकट आल्यास ३ वेळा पठन करणे लाभदायक ठरते.
७ वेळा पठन: हे शरीराच्या ७ चक्रांना शुद्ध करते आणि नवग्रहांचे दोष शांत करते. सामान्य माणसासाठी '७' ही संख्या अत्यंत संतुलित मानली जाते.
११ आणि १०८ वेळा पठन: एखादी मोठी मनोकामना पूर्ण करण्यासाठी ११ वेळा, तर विशेष सिद्धी प्राप्त करण्यासाठी १०८ वेळा चालीसाचे अनुष्ठान केले जाते.
बजरंगबलीच्या पूजेसाठी पहाटेचा 'ब्राह्ममुहूर्त' (सकाळी ४ ते ६ वाजेदरम्यान) सर्वात उत्तम मानला जातो. सकाळी वेळेभावी हे शक्य नसल्यास, रात्री ८ नंतरही ७ वेळा पठन करता येते. रात्री पठन केल्याने भीतीदायक आणि वाईट स्वप्नांपासून मुक्ती मिळते. अमावस्या, पौर्णिमा आणि हनुमान जयंतीला याचे फळ अनेक पटींनी जास्त मिळते. मंगळवारसोबतच शनिवार हा दिवसही मारुतीरायाला समर्पित आहे.
स्नानानंतर लाल किंवा पिवळे स्वच्छ वस्त्र परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते.
मारुतीरायासमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा आणि बुंदी किंवा गूळ-चण्याचा नैवेद्य दाखवावा.
थेट चालीसा सुरू न करता आधी 'श्री गणेशाय नमः' आणि 'सीताराम' असा जप करावा.
सलग ७ वेळा पठन करावे. या काळात मोबाईल पाहणे किंवा कोणाशीही बोलणे टाळावे.
मांसाहार आणि मद्यपानापासून दूर राहावे, मनात कोणाबद्दलही वाईट विचार आणू नयेत आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे.
टीप: या लेखातील उपाय आणि सल्ले हे केवळ सामान्य माहितीवर आधारित आहेत. ही माहिती विविध माध्यमे, ज्योतिषी, पंचांग, धार्मिक ग्रंथ आणि मान्यतेच्या आधारे संकलित केली आहे. वाचकांनी या माहितीचा वापर आपल्या विवेकबुद्धीने करावा.