wedding muhurat 2026 : विवाह इच्छुकांनो तयारीला लागा! या वर्षी आहेत 59 शुभ दिवस, जाणून घ्या सविस्तर यादी

गृहप्रवेशासाठी 37 तिथी शुभ, वाहन खरेदीसाठी 88 शुभ दिवस
wedding muhurat 2026 : विवाह इच्छुकांनो तयारीला लागा! या वर्षी आहेत 59 शुभ दिवस, जाणून घ्या सविस्तर यादी
Published on
Updated on

जानेवारी महिन्यात लग्नासाठी एकही शुभ मुहूर्त नसल्याने, सनई-चौघड्यांचा आवाज थेट फेब्रुवारी महिन्यापासून ऐकू येणार आहे.

wedding muhurat 2026 : नवीन वर्षात शुभ कार्यांचे नियोजन करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंचांगानुसार, यावर्षी विवाह इच्छुकांसाठी एकूण ५९ शुभ मुहूर्त आहेत. विशेष म्हणजे, जानेवारी महिन्यात लग्नासाठी एकही शुभ मुहूर्त नसल्याने, सनई-चौघड्यांचा आवाज थेट फेब्रुवारी महिन्यापासून ऐकू येणार आहे. केवळ विवाहच नव्हे, तर घर आणि गाडी घेणाऱ्यांसाठीही यंदा अनेक शुभ संधी आहेत.

गृहप्रवेशासाठी ३७ दिवस शुभ

नवीन घरात प्रवेश करण्यासाठी वर्षात एकूण ३७ दिवस शुभ आहेत. गृहप्रवेशाचा पहिला मुहूर्त फेब्रुवारीमध्ये असेल. मात्र, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांत गृहप्रवेशासाठी एकही शुभ योग नाही. जमीन किंवा घर खरेदी-विक्रीच्या व्यवहारांसाठी वर्षात ६८ दिवस शुभ मानले गेले आहेत. तसेच नवीन गाडी खरेदी करण्यासाठी यंदा ८८ दिवस उपलब्ध आहेत. यासाठी जानेवारी आणि ऑगस्ट हे महिने सर्वाधिक उत्तम असून, या दोन्ही महिन्यांत प्रत्येकी १० शुभ मुहूर्त मिळतील.

wedding muhurat 2026 : विवाह इच्छुकांनो तयारीला लागा! या वर्षी आहेत 59 शुभ दिवस, जाणून घ्या सविस्तर यादी
New Year 2026 celebration|चित्तवेधक आतषबाजीचा नेत्रदीपक सोहळा : न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे अपूर्व जल्लोषात स्वागत

जाणून घ्या वर्षभरातील विवाह मुहूर्तांच्या तारखा

जानेवारी महिन्यात लग्नासाठी एकही शुभ मुहूर्त नाही. तसेच ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातही सनई-चौघड्यांचा आवाज ऐकू येणार नाही. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक विवाहाचे मुहूर्त आहेत.

  • फेब्रुवारी (कंसात वार) : ५ (गुरुवार), ६ (शुक्रवार), ८ (रविवार), १० (मंगळवार), १२ (गुरुवार), १४ (शनिवार), १९ (गुरुवार), २० (शुक्रवार), २१ (शनिवार), २४ (मंगळवार), २५ (बुधवार), २६ (गुरुवार).

  • मार्च : २ (सोमवार), ३ (मंगळवार), ४ (बुधवार), ७ (शनिवार), ८ (रविवार), ९ (सोमवार), ११ (बुधवार), १२ (गुरुवार).

  • एप्रिल : १५ (बुधवार), २० (सोमवार), २१ (मंगळवार), २५ (शनिवार), २६ (रविवार), २७ (सोमवार), २८ (मंगळवार), २९ (बुधवार).

  • मे : १ (शुक्रवार), ३ (रविवार), ५ (मंगळवार), ६ (बुधवार), ७ (गुरुवार), ८ (शुक्रवार), १३ (बुधवार), १४ (गुरुवार).

  • जून : २१ (रविवार), २२ (सोमवार), २३ (मंगळवार), २४ (बुधवार), २५ (गुरुवार), २६ (शुक्रवार), २७ (शनिवार), २९ (सोमवार).

  • जुलै : १ (बुधवार), ६ (सोमवार), ७ (मंगळवार), ११ (शनिवार).

  • नोव्हेंबर : २१ (शनिवार), २४ (मंगळवार), २५ (बुधवार), २६ (गुरुवार).

  • डिसेंबर : २ (रविवार), ३ (सोमवार), ४ (मंगळवार), ५ (बुधवार), ६ (गुरुवार), ११ (शुक्रवार), १२ (शनिवार).

wedding muhurat 2026 : विवाह इच्छुकांनो तयारीला लागा! या वर्षी आहेत 59 शुभ दिवस, जाणून घ्या सविस्तर यादी
Maharashtra Public Holidays 2026: २०२६ मध्ये नोकरदारांना दिलासा; १२५ सुट्ट्यांचा लाभ

गृहप्रवेशासाठी २०२६ मधील शुभ मुहूर्त

  • फेब्रुवारी (कंसात वार) : ६ (शुक्रवार), ११ (बुधवार), १९ (गुरुवार), २० (शुक्रवार), २१ (शनिवार), २५ (बुधवार), २६ (गुरुवार).

  • मार्च : ४ (बुधवार), ५ (गुरुवार), ६ (शुक्रवार), ९ (सोमवार), १३ (शुक्रवार), १४ (शनिवार).

  • एप्रिल : २० (सोमवार).

  • मे : ४ (सोमवार), ८ (शुक्रवार), १३ (बुधवार).

  • जून : २४ (बुधवार), २६ (शुक्रवार), २७ (शनिवार).

  • जुलै : १ (बुधवार), २ (गुरुवार), ६ (सोमवार).

  • नोव्हेंबर : ११ (बुधवार), १४ (शनिवार), २० (शुक्रवार), २१ (शनिवार), २५ (बुधवार), २६ (गुरुवार).

wedding muhurat 2026 : विवाह इच्छुकांनो तयारीला लागा! या वर्षी आहेत 59 शुभ दिवस, जाणून घ्या सविस्तर यादी
Calendar 2026 : इंग्रजी कॅलेंडर आणि हिंदू दिनदर्शिकेमध्ये नेमका फरक कोणता? जाणून घ्या सविस्तर

वाहन खरेदीसाठी शुभ मुहूर्त

  • जानेवारी (कंसात वार) : १ (गुरुवार), २ (शुक्रवार), ४ (रविवार), ५ (सोमवार), ११ (रविवार), १२ (सोमवार), १४ (बुधवार), २१ (बुधवार), २८ (बुधवार), २९ (गुरुवार).

  • फेब्रुवारी : १ (रविवार), ६ (शुक्रवार), ११ (बुधवार), २६ (गुरुवार), २७ (शुक्रवार).

  • मार्च : १ (रविवार), ५ (गुरुवार), ६ (शुक्रवार), ८ (रविवार), ९ (सोमवार), १५ (रविवार), १६ (सोमवार), २३ (सोमवार), २५ (बुधवार), २७ (शुक्रवार).

  • एप्रिल : १ (बुधवार), २ (गुरुवार), ३ (शुक्रवार), ६ (सोमवार), १२ (रविवार), १३ (सोमवार), २० (सोमवार), २४ (शुक्रवार), २९ (बुधवार).

  • मे : १ (शुक्रवार), ४ (सोमवार), १० (रविवार), ११ (सोमवार), १४ (गुरुवार).

  • जून : १७ (बुधवार), २२ (सोमवार), २४ (बुधवार), २५ (गुरुवार).

  • जुलै : २ (गुरुवार), ३ (शुक्रवार), ५ (रविवार), ८ (बुधवार), १२ (रविवार), १९ (रविवार), २४ (शुक्रवार), २९ (बुधवार), ३० (गुरुवार).

  • ऑगस्ट : ७ (शुक्रवार), ९ (रविवार), १० (सोमवार), १६ (रविवार), १७ (सोमवार), २० (गुरुवार), २६ (बुधवार), २७ (गुरुवार), २८ (शुक्रवार), ३१ (सोमवार).

  • सप्टेंबर : ४ (शुक्रवार), ६ (रविवार), ७ (सोमवार), १३ (रविवार), १४ (सोमवार), १६ (बुधवार), १७ (गुरुवार), २४ (गुरुवार).

  • ऑक्टोबर : २१ (बुधवार), २२ (गुरुवार), २५ (रविवार), २८ (बुधवार), ३० (शुक्रवार).

  • नोव्हेंबर : १ (रविवार), ६ (शुक्रवार), २५ (बुधवार), २६ (गुरुवार), २९ (रविवार).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news