

मंगळ आणि प्लूटो एकमेकांपासून ३० अंशांच्या कोनात असतात, तेव्हा 'द्विद्वादश दृष्टी योग' तयार होतो
१८ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजून १ मिनिटांनी हा योग जुळून येत आहे
तीन राशींच्या जातकांना होणार विशेष लाभ
Dwi Dwadash Rajyog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांच्या स्थितीत होणारे बदल मानवी जीवनावर मोठा प्रभाव टाकतात. तब्बल १७ वर्षांनंतर 'मंगल' आणि 'यम' (प्लूटो) यांच्या संयोगातून 'द्विद्वादश दृष्टी योग' निर्माण होत आहे. या अत्यंत दुर्मिळ योगामुळे काही ठराविक राशींच्या व्यक्तींना विशेष लाभ मिळण्याचे संकेत असून, त्यांना समाजात पद आणि प्रतिष्ठा प्राप्त होण्याची शक्यता आहे.
ग्रहांचा सेनापती मानला जाणारा मंगळ सध्या धनु राशीत विराजमान आहे, तर यम मकर राशीत आहे. जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून ३० अंशांच्या कोनात असतात, तेव्हा 'द्विद्वादश दृष्टी योग' तयार होतो. १८ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजून १ मिनिटांनी हा योग जुळून येत आहे. चंद्र राशीवर आधारित केलेल्या विश्लेषणानुसार, खालील राशींसाठी हा काळ सुवर्णकाळासारखा ठरू शकतो. जाणून घेवूया या राशींविषयी...
तूळ राशीच्या जातकांसाठी हा योग अत्यंत फलदायी ठरेल. यम चौथ्या स्थानी आणि मंगळ तिसऱ्या स्थानी असल्याने तुमच्या आत्मविश्वासात आणि धैर्यात कमालीची वाढ होईल. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. परदेश प्रवासाचे योग आहेत. धनलाभाचीही शक्यता असून आर्थिक बाजू भक्कम होईल. कुटुंबात सुख-शांती नांदेल आणि जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. मान-सन्मानात वाढ होईल.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मंगळ-यम संयोग अनेक समस्यांतून सुटका करणारा ठरेल. कामाच्या निमित्ताने केलेले प्रवास भविष्यात फायदेशीर ठरतील. बराच काळ रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. शेअर बाजारातून चांगला नफा मिळण्याची चिन्हे आहेत. उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण होतील. संवाद प्रभावशाली ठरेल.
मकर राशीच्या जातकांसाठी हा बदल भाग्योदयाचा ठरू शकतो. यम याच राशीच्या लग्न भावात तर मंगळ बाराव्या स्थानी आहे. व्यापाऱ्यांना मोठा नफा मिळण्याची चिन्हे आहेत. नोकरीत असलेल्या व्यक्तींची बदली होऊ शकते किंवा नवीन नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध होतील. तुम्ही योग्य नियोजन करून काम केले, तर यश निश्चित आहे. आर्थिक स्थिती सुधारेल आणि कुटुंबासोबत आनंदात वेळ व्यतीत होईल.
टीप: वरील ज्योतिषशास्त्रावरील माहिती ही इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. ही माहिती ज्योतिषशास्त्रातील गृहीतकांवर आधारित असल्याने त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. वैयक्तिक प्रगतीसाठी मेहनतीला पर्याय नाही. महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या.