

Vasant Panchami 2026
मुंबई : येत्या २३ जानेवारी रोजी वसंत पंचमीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळणार आहे. दरवर्षी माघ शुद्ध पंचमीला साजरा केला जाणारा हा सण यंदा विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, वसंत पंचमीचा दिवस हा स्वयंसिद्ध मुहूर्त मानला जातो. या दिवशी कोणत्याही शुभ कार्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नसते. ज्योतिष अभ्यासकांच्या मते, या शुभ योगांचा सकारात्मक प्रभाव पाच विशिष्ट राशींवर पडणार असून, त्यांच्यासाठी प्रगतीचे नवे दरवाजे उघडणार आहेत. जाणून घेवूया या राशींविषयी...
वृषभ राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची संधी मिळेल. प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील आणि कार्यक्षेत्रात अचानक यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरतील. जुन्या समस्यांपासून सुटका मिळून कौटुंबिक आनंदात वाढ होईल.
कन्या राशी जातकांना व्यापाऱ्यांच्या नफ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक नातेसंबंधांत दृढता येईल आणि घरातील वातावरण सकारात्मक राहील. नोकरीत मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत असून जोडीदारासोबत पर्यटनाचे योग आहेत.
धनु राशीसाठी हा सण नवी उमेद घेऊन येईल. धनधान्याची प्राप्ती होईल आणि उत्पन्नाचे स्रोत वाढल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण येईल. आयुष्यात सकारात्मक बदल घडतील आणि मित्रपरिवारासोबत आनंदाचे क्षण व्यतीत करता येतील.
मकर राशीत सूर्य, चंद्र, मंगळ, बुध आणि शुक्र यांची युती होत असल्याने प्रगतीचे प्रबळ योग आहेत. नवीन प्रकल्प, दुकान किंवा कारखाना सुरू करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. कुटुंबासोबत घालवलेला वेळ नात्यांमधील ओलावा वाढवण्यास मदत करेल.
कुंभ रास: आर्थिक दृष्टीने कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल. धनप्राप्तीचे उत्तम योग असून वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य आहे. खर्च वाढले तरी उत्पन्नाची बाजू भक्कम असल्याने चिंता नसेल.
टीप: वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची पत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या.