Vaidhriti Yog 2026 : जूनमध्ये वैधृति योग; 'या' ५ राशींना मिळणार नशीबाची 'साथ'!

प्रलंबित कामांसह आर्थिक समस्‍यांवर तोडगा निघण्‍याची शक्‍यता
Vaidhriti Yog 2026
प्रतीकात्मक छायाचित्रPudhari
Published on
Updated on

Vaidhriti Yog 2026

वैदिक ज्योतिषशास्त्रात वैधृति योग अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा मानला जातो. असे मानले जाते की, जेव्हा हा योग जुळून येतो तेव्हा अनेकांच्या आयुष्यातील रखडलेली कामे पुन्हा वेगाने सुरू होतात. कौटुंबिक अडचणी कमी होतात. तसेच आर्थिक समस्यांमधूनही दिलासा मिळू लागतो. जून २०२६ मध्ये हा शुभ योग पुन्हा एकदा निर्माण होत असून, याचा सकारात्मक प्रभाव काही राशींवर प्रामुख्याने पाहायला मिळू शकतो.

कधी निर्माण होणार वैधृति योग?

पंचांगानुसार, ४ जून २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजून ९ मिनिटांनी वैधृति योग सुरू होईल. हा योग दुसऱ्या दिवशी म्हणजेच ५ जून रोजी मध्यरात्री १२ वाजून ५५ मिनिटांपर्यंत असेल. हा योग काही राशींच्या लोकांसाठी अत्यंत शुभ संकेत घेऊन येऊ शकतो.

Vaidhriti Yog 2026
Gajkesari Rajyog 2026 | १८ मे पासून 'गजकेसरी राजयोग'; वृषभसह 'या' ५ राशींचे नशीब उजळणार!

मेष राशीच्‍या जातकांची प्रलंबित कामे पूर्ण होण्‍याचे संकेत

मेष राशीच्या लोकांसाठी वैधृति योग एक नवी उमेद घेऊन येऊ शकतो. दीर्घकाळापासून रेंगाळलेले एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होण्याचे संकेत आहेत. नोकरी आणि व्यवसायात तुमच्या मेहनतीचे उत्तम फळ मिळू शकते. कुटुंबासोबतचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक दृढ होतील आणि मानसिक शांतता लाभेल. पैशांशी संबंधित चिंताही हळूहळू कमी होईल.

Vaidhriti Yog 2026
Mars Jupiter Conjunction 2026 |मंगळ-गुरुची युती घडवणार कमाल! 'या' ४ राशींना धनलाभासह मिळणार प्रगतीची सुवर्णसंधी

वृषभ राशीचे जातक अनुभवतील कौटुंबिक सुख

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ मोठा दिलासा देणारा ठरू शकतो. घरातील वातावरण पूर्वीपेक्षा आनंदी राहील. कुटुंबात सुरू असलेले जुने वाद मिटण्याची शक्यता आहे. जर तुम्ही एखादा नवीन व्यवसाय किंवा काम सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ उत्तम मानला जात आहे. आर्थिक आघाडीवरही चांगला फायदा होऊ शकतो.

Vaidhriti Yog 2026
Gajalakshmi Rajyog 2026: 'गजलक्ष्मी राजयोग' जुळून येणार! 'या' ५ राशींना विवाह, नोकरी आणि धनलाभाचे प्रबळ योग

सिंह राशीच्‍या जातकांना मिळणार नवी संधी

सिंह राशीच्या लोकांसाठी जून महिन्यातील हा योग एखादी आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो. घरात विवाह ठरण्याची किंवा विवाहाची बोलणी पुढे सरकण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना नवीन काम किंवा नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळून फायदा होण्याचे संकेत आहेत. आर्थिक स्थिती आधीपेक्षा अधिक मजबूत होईल.

Vaidhriti Yog 2026
Guru Gochar 2026 | गुरुची चाल बदलणार; 'या' ४ राशींना मिळणार नशिबाची 'साथ'

धनु राशीचे जातकांच्‍या आरोग्‍यात होईल सुधारणा

धनु राशीच्या लोकांसाठी वैधृति योग अनेक बाबतीत दिलासादायक ठरेल. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अडचणी आता हळूहळू कमी होऊ लागतील. जे लोक आपल्या नातेसंबंधांबद्दल किंवा विवाहाबद्दल प्रतीक्षेत आहेत, त्यांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. आरोग्यातही सकारात्मक सुधारणा पाहायला मिळेल.

मीन राशीच्‍या जातकांच्‍या आर्थिक बाबींमध्‍ये होईल सुधारणा

मीन राशीच्या लोकांना या योगाच्या प्रभावाने रखडलेल्या कामांमध्ये यश मिळू शकते. वारंवार प्रयत्न करूनही जी कामे पूर्ण होत नव्हती, त्या कामांमधील अडथळे आता दूर होतील. घरातील वातावरण उत्साही राहील आणि मानसिक तणाव कमी होईल. आर्थिक बाबींमध्येही हळूहळू सुधारणा होताना दिसेल.

टीप: वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची पत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news